आवृत्ती २ : बाहेर-आत / Edition 2 : Outside Inside
October 2017
आवृत्ती २ : बाहेरचं, आतलं, अधलं-मधलं / Edition 2 : Outside Inside, In-between
नानाविध रंग-रूपं, ऋतुमानानुसार बदलत जाणारे पोत, सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातले विविध संदर्भ ह्या साऱ्यांतून ‘बाहेरचं’ जग आपल्या समोर येत असतं. पण, न दिसणारं, न वाचता येणारं, अ-स्पर्श असं काही तरी ‘आतलं’ असतं. ते काय असतं ? ‘आतलं’ जग आणि ‘बाहेरचं’ जग असं सुटंसुटं पाहता येईल का ? बदलत्या भवतालानुसार ‘आतलं’ किंवा ‘बाहेरचं’ असणं तसंच राहतं की बदलत जातं वा त्यांची अदलाबदल होते ? ‘बाहेर’ आणि ‘आत’ होत असताना ‘अधल्या-मधल्या’ अवस्थेतही हे जग खेळ खेळत असतं. मग, ‘अधल्या-मधल्या’ अवस्थेतील खेळाचं आविष्करण काय असू शकतं ? बाहेरच्या आणि आतल्या जगात होणाऱ्या ह्या खेळाचा ठाव घेणाऱ्या कोणकोणत्या पद्धती असू शकतात? ह्या आणि इतर प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून हाकारा । hākārā-च्या २ऱ्या आवृत्तीत ‘बाहेरचं, आतलं, अधलं-मधलं’ ह्या विषयावरील निवडक लेखनाचा / कलाकृतींचा समावेश केला आहे.
The ‘outside’ world evolves through natural processes and contexts of socio-political changes. But, there is something deep ‘inside’ that one can not easily read, touch or share. Contributions in हाकारा । hākārā’s second edition are an attempt to articulate the intriguing ‘Outside, Inside, In-between’ dynamic processes.