आवृत्ती १५ : प्रवास / Edition 15 : Journey
April 2022

आवृत्ती १५ : प्रवास / Edition 15: Journey
आपल्या आयुष्यात आपण भौतिक आणि लाक्षणिक स्वरूपाचे पुष्कळ प्रवास करीत असतो. आपले आयुष्य हे भौतिक आणि लाक्षणिक स्वरूपाच्या प्रवासांनी व्यापलेले असते. हे प्रवास घटनांनी भरगच्च असलेले महत्त्वपूर्ण प्रवास असू शकतात, तसेच ते क्षुल्लक कारणांनी केले जाणारे नीरस, कंटाळवाणे प्रवासही असू शकतात. काही वेळा, प्रवास स्वतःहून, त्यांच्याद्वारे पोहोचावयाच्या ठिकाणांहून अधिक महत्त्वपूर्ण असू शकतात. पुष्कळ संस्कृतींमध्ये, प्रवास सुखरूप-सुरक्षित होण्याकरिता केले जाणारे विधी, किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात सोबत बांधून नेली जाणारी शिदोरी इत्यादी प्रवासाशी संबंधित आपापल्या खास परंपराही घडत गेलेल्या दिसतात. हाकारा । hākārā-च्या १५व्या आवृत्तीत, लेखक-कलाकारांनी आणि अभ्यासकांनी ‘प्रवास’ ह्या संकल्पनासूत्राच्या अशा विविध मितींचा धांडोळा घेतला आहे.
Our lives are full of physical and figurative journeys, both eventful, and highly mundane. Sometimes they can be more significant than the destinations themselves. Several cultures have even developed traditions surrounding these journeys through rituals that promote safe travels, or common foods that are carried over long distances. In this edition, artists, writers, and scholars explore the many dimensions of our theme, ‘Journey.’
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram