आवृत्ती १२ : घर / Edition 12 : Home
February 2021
आवृत्ती १२ : घर / Edition 12 : Home
हाकारा । hākārā-ची १२वी आवृत्ती ‘घर’ ह्या विषयाला वाहिलेली आहे. सदर आवृत्तीत लेखकांनी व कलाकारांनी, ‘घर’ काय असते? जवळीक आणि दुरावा, एकत्र येणे, विस्थापन आणि स्थलान्तर, भूतकाळ आणि वर्तमान, ह्या साऱ्यांतून घराचा अवकाश आणि विचार कसा आकाराला येतो? बदलत्या आर्थिक आणि सामाजिक रचनेत घराच्या संकल्पनेत कसे बदल होत गेले आहेत? घरामुळे आपल्याला कुटुंब, नातेसंबंध, बालपण, लिंग-जात-धर्म-व्यवस्था ह्यांबद्दल नव्याने विचार करण्याची दिशा व संधी कशी मिळते? ह्या आणि इतर काही प्रश्नांना समोर ठेवून मांडणी केली आहे.
हाकारा । hākārā’s twelfth edition explores the theme of ‘Home’. Artists and writers in this edition address the following questions: What does home mean to us? How is it shaped by intimacies and distances, displacements and migrations, and the past and the present? How has the concept of home transformed over the years? Does the home create ways and possibilities for us to think through the preconceived notions of family, caste, religion, and gender anew?