आवृत्ती ३ : आता / Edition 3 : Now
January 2018
आवृत्ती ३ : आता / Edition 3 : Now
हाकारा । hākārā-च्या ‘आता’च्या आवृत्तीतील कलात्म तसेच चिंतनात्मक लिखाण आणि दृश्य रूपे ‘आता’पणाच्या विविध अंगांना मांडणारी आहेत. नावीन्यपूर्ण तऱ्हांनी वेगवेगळ्या माध्यमांत निर्मिती करणारे कलाकार, लेखक, संशोधक ‘आता’ म्हणजे काय ह्या प्रश्नाला अपरिहार्यपणे सामोरे जात असतात. ‘आता’ म्हणजे असं काहीतरी की ज्याचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहातं, पण त्याला हातात पकडता येत नाही किंवा ते ‘आता-पण’ जे आपल्याला साठवून ठेवता येत नाही. ‘आता’कडे पाहण्याची विचारवंतांची, कलाकारांची तसेच लेखकांची दृष्टी आणि मांडणी हाकारा । hākārā-च्या ह्या ०३ऱ्या आवृत्तीतून आपल्याला दिसून येईल. कलारूपे, कलाभान आणि सौंदर्यदृष्टी ह्यांचे दर्शन घडवण्याबरोबर ‘काळ’ ह्या संकल्पनेविषयीचे लवचीक आणि बदलते भान हाकारा ।hākārā-ची ३री आवृत्ती मांडते.
The question of what is there in ‘now’ is persuasive. We cannot ‘touch’ now, we can only feel it. Thus, now is not real though it ‘exists’. Never a singular experience, ‘now’ is being shaped and re-shaped through contentions, assemblages and appropriations. हाकारा । hākārā’ third edition is an exploration into simple, complex, layered as well as unusual ways of understanding ‘Now’.