आवृत्ती ८ : काळं/पांढरं / Edition 8 : B/W
September 2019
आवृत्ती ८ : काळं/पांढरं / Edition 8 : B/W
‘काळं/पांढरं’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जुने सिनेमे, जुने फोटो, गतकाळातील छापील मजकूर तसेच आठवणी येतात. आपल्या संवेदना, जाणिवा आणि सौंदर्यविचार हे काळ्या/पांढऱ्या रंगांतून उमटत राहतात. ह्यांपलीकडे, हे दोन रंग दोन टोकाच्या भूमिका आणि दृष्टिकोन सूचित करत असतात. ह्यातून, आपण नैतिक-अनैतिक, चूक-बरोबर, सुष्ट-दुष्ट, सत्य-असत्य, चांगलं-वाईट ह्या द्वंदातून जगाकडे बघू लागतो. पण, रंगांचे हे दुहेरीपण कायम, स्थिर असतंच असं नाही. ते प्रवाही आणि विस्तारणारं असतं. काळ्या-पांढऱ्याचे आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न हाकारा । hākārā-च्या ८व्या आवृत्तीत लेखकांनी आणि कलाकारांनी केला आहे.
Black and white (B/W) could be a visual experience, or a representation of memories, or, for some, it could be a metaphor representing dark and light, war and peace, or good and evil. Further, when black and white are kept in a continuous spectrum, they produce shades of grey, and thus, change their dual perception. In हाकारा । hākārā’s 8th edition, contributors reflect upon the varied ways and languages of perceiving ‘B/W’.