Skip to content Skip to footer
Picture of Saee Pawar

Saee Pawar

Saee Pawar (she/her) is an interdisciplinary researcher, writer, translator, and illustrator based in Mumbai. Her work engages questions of gender, labour, and cultural production, with a particular focus on land, care, and everyday forms of knowledge among farming and pastoral communities in India. Working across research and creative art practice, she attempts  to bring together qualitative methods, feminist evaluation, translation, and visual storytelling. Her interests lie in making research accessible and situated, attending to language, context, and the textures of lived experience. She currently works as an independent researcher and translator.

सई पवार ह्या एक आंतरविद्याशाखीय संशोधक, लेखक, अनुवादक आणि चित्रकार आहेत. त्यांचे संशोधन हे लिंगभाव, श्रम आणि सांस्कृतिक निर्मिती ह्यांच्याशी संबंधित प्रश्नांचा वेध घेते. माध्यमे, अनुवाद, स्त्रीवाद, जमीन-हक्क आणि भारतातील शेतकरी-पशुपालक समुदायांमधील दैनंदिन ज्ञान ह्या विषयांवर त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. संशोधन तसेच सर्जनशील कलाक्षेत्र ह्यांत त्या गुणात्मक संशोधनपद्धती, स्त्रीवादी मूल्यमापन, अनुवाद आणि दृश्य कथाकथन ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक विज्ञानामधील संशोधनाला अधिक सुगम आणि सांदर्भिक बनवण्यात त्यांना विशेष रुची आहे; ह्यासाठी भाषा, संदर्भ आणि प्रत्यक्ष जगलेल्या अनुभवांचे विविध पैलू ह्यांकडे त्या बारकाईने लक्ष देतात. सध्या सई स्वतंत्र संशोधक आणि अनुवादक म्हणून कार्यरत आहेत.