Pritam Das
Pritam Das (b. 1996) is a multidisciplinary artist based between Singur and Santiniketan. He holds an MFA in Painting from Kala Bhavana, Visva Bharati University (2022). His practice investigates Singur’s socio-political and ecological realities, shaped by forced industrialization and land movement aftershocks. He re-translates oral histories, archives, and memory through a reconstructive methodology involving site-responsive installations, drawings, videos, and material explorations to reveal human-land relationships within post-movement, post-truth landscapes. Since 2024, his independent projects include The Roast Potato Party, Shelf Life, and Alter Restaurant. Between 2022 and 2026, his work was displayed at Harvard University, Serendipity Arts Festival, Art Mumbai, Dhoomimal Gallery, Students' Biennale, and Lalit Kala Akademi. He participated in a residency organized by Goethe-Institut, Raqs Media Collective, and Saagwala. Awards include the 2026 Inlaks Fine Art Award and 2019 Camlin Zonal Award. He was featured in the February 2026 issue of Art India Magazine.
प्रीतम दास (जन्म १९९६) हे सिंगूर आणि शांतिनिकेतन येथे कार्यरत असलेले बहुआयामी कलाकार आहेत. त्यांनी २०२२ साली विश्वभारती विद्यापीठाच्या कलाभवनमधून चित्रकलेत एम.एफ.ए. ही पदवी मिळवली. त्यांच्या कलाकृतींमध्ये सिंगूरमधील सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय वास्तवाचा शोध घेतला जातो — असे वास्तव, जे सक्तीच्या औद्योगिकीकरणामुळे आणि जमीन-आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिणामांमुळे घडले आहे. मौखिक इतिहास, संग्रहित नोंदी आणि स्मृती ह्यांना ते नव्याने उलगडण्याचा प्रयत्न करतात. ह्यासाठी ते पुनर्रचना करणारी कार्यपद्धती वापरतात. त्यात जागेशी संवाद साधणारी मांडणशिल्पे (इन्स्टॉलेशन्स), रेखाटने, चित्रफिती (व्हिडिओ) आणि विविध माध्यमांतील प्रयोग ह्यांचा समावेश असतो. ह्या माध्यमांतून आंदोलनानंतरच्या आणि ‘सत्योत्तर (पोस्ट-ट्रुथ)’ वास्तवातल्या माणूस आणि जमीन ह्यांच्या नात्याचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. २०२४पासूनच्या त्यांच्या स्वतंत्र प्रकल्पांमध्ये द रोस्ट पोटॅटो पार्टी, शेल्फ लाइफ आणि अल्टर रेस्टॉरंट ह्यांचा समावेश आहे. २०२२ ते २०२६दरम्यान त्यांच्या कलाकृती हार्वर्ड युनिव्हर्सिटी, सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल, आर्ट मुंबई, धूमीमल गॅलरी, स्टुडंट्स बिएनाले आणि ललित कला अकादमी येथे प्रदर्शित झाल्या आहेत. त्यांनी गोएथे-इन्स्टिट्यूट, रॅक्स मीडिया कलेक्टिव्ह आणि सागवाला ह्यांनी आयोजित केलेल्या रेसिडेन्सीमध्येही सहभाग घेतला होता. त्यांना २०२६ सालचा इनलॅक्स फाइन आर्ट पुरस्कार आणि २०१९ सालचा कॅम्लिन झोनल पुरस्कार मिळाला आहे. फेब्रुवारी २०२६मध्ये आर्ट इंडिया ह्या मासिकात त्यांच्याविषयी लेख प्रकाशित झाला होता.