Skip to content Skip to footer

आवार आणि इतर कविता: अनिरुध्द आचार्य

Discover An Author

  • Poet, Screenwriter, and Visual Artist

    अनिरुध्द आचार्य हे कवी, पटकथा लेखक आणि दृश्यकलाकार असून त्यांना २०१८ मध्ये ‘एन. एस. बेंद्रे’ फाउंडेशनच्या पारितोषिकाने पुरस्कारीत करण्यात आले. त्यांनी चित्रपट संकलन आणि पटकथा लेखन याचे प्रशिक्षित घेतले आहे.

    Aniruddha Acharya writes short stories, poems and essays in Marathi. He has published his poetry in Deepavali, Kavita-Rati, Chaturanga, Varnmudra and other journals. Also, he is trained in film editing and screen-play writing.

प्रवाहात

कागदी होडी
पाण्यात सोडतो आहे
उलगडून वाचू नको;
फक्त निर्विकार पहा
काळी शाई फुटली, तरी
जाणिवा संपत नाहीत
प्रतिध्वनी विस्तारतील
– अंतहीन; डोहात खोल
माझे शब्द पुन: उच्चारतील
त्यांच्याच संचितातून
वल्हवत नेशील होडी
दुज्या तीरावर –
कोरा कागद गळलेला
हळूच बाहेर घेशील.

***

आवार

मंदिराचे विछिन्न पांढरे घुमट
तुझ्या काजळभारल्या आवारात।
मला अंधूक आठवते
– दगडानं ठेचलेली निळी गाय
वीज चमकून बगळे उडून गेले स्वार्थी
वासरू रात्रभर रडलं अंधारात
– तुझ्या काजळभारल्या आवारात।
काळ्या पाण्याचे तलाव
या कुमारिक जमिनीवर
हॅट घालणारा म्हातारा
मासे पकडायला रोज येतो
घोटीव पांढर्‍या दगडांवर
मूठभर कळ्या ठेवून जातो
कोणासाठी?
– तुझ्या काजळभारल्या आवारात।
तावदानांतून पाझरणारा प्रकाश
– धुळीचे चमकणारे काजवे
लहानपणी मी साठवायचो हातात
ते दिवस जपून ठेवले आहेत
– उजळलेल्या आठवणींत
तुझ्या काजळभारल्या आवारात।

***

एका हरवलेल्या कवितेस

या ठिकाणी
केव्हा तरी कविता सुचली होती

ती हरवली
मात्र तिचे अवशेष
मनात अस्पष्ट आहेत

मला भीती वाटते
तेव्हाचं
मनही हरवलंय का कुठे?

तर
कवितेच्या अवशेषांवरून मी
मनाची पुनर्बांधणी करेन.

***

कवितेनंतरची कविता

बरेचजण हसतात कवितेला, कुचेष्टेने
किंवा भुवया आणि ओठांना,
प्रतिबिंबित अर्धचंद्रासारखा देतात आकार

काहीजण करतात फक्त ‘हं’
प्रदीर्घ श्वास सोडून..
किंवा ठेवतात हनुवटीखाली
बोटं एकमेकांत गुंफून

बरेचदा ऐकू येते टाळी, मध्येच
जणू कविता संपलीच होती.
मात्र संपत नाही कधीच कविता, कधीही..

वाचून संपल्यावर कविता,
एक मृत शांतता पसरते..
आणि थोड्या वेळानंतर पडतात
बळजबरीच्या टाळ्या

***

तू मला कसं पाहशील

          i
समजा या खोलीतून
बाहेर बाल्कनीत गेलो
तर समोर धुक्यांत डोंगर दिसतो
अन् पुसट तळव्यांना धुकं जाणवतं
          ii
असं लिहावसं वाटलं
यात काही चूक नाही
म्हणजे शब्दांचे अर्थ
नाही लागले या नंतर तरी
किंवा एका शब्दाचा दुसऱ्याशी काही संबंध नसला तरी
अन् मग शब्द
धुक्यात विरघळतील
          iii
म्हणजे कवितेत शब्दांचे अर्थ नकोत
कवितेला शब्दांचे अर्थ नको
          iv
या बाल्कनीच्या रेलिंग्स थंडीत साचल्यात
स्पर्शात पाणी जाणवतंय
असं वाटतं –
मी खरंतर गेलोच नाही अजून बाल्कनीत
अन् पडलोय पालथ्या खोलीत
प्राजक्त विझवत निपचित
          v
नाहीतरी ही कविता
तुला दिसणार नाही
धुकं वाढत जातंय तर खोलीत
मला पण व्हायचंय सामील धुक्यात
जेणेकरून माझ्यात शब्दांचे अर्थ नकोत

***

पारिजातक

फुलं वेचायला मुली रोज येतात
अंगणात बसून फुलं परकरात जमवतात
गळलेली फुलं, मी जमवलेली सुद्धा त्यांनाच देतो
झाड हलवू मात्र देत नाही

फुलं वेचायला मुली रोज येतात

अशी ओळ लिहिल्यावर संपल्यासारखं वाटतं
पुढचं काही सुचत नाही
जसं काहीच घडत नव्हतं कधी, किंवा
नेहमीच अनन्यसाधारण सामान्य घडत राहते

पारिजातकाची फुलं रोज उमलतात;
गळण्यासाठी, कोमेजतात
मी दिवसभर जमवतो, नकळत
सुगंध मात्र फुलांचा राखून ठेवतो

फुलं वेचायला मुली रोज येतात

त्या येईस्तोवर मला हुरहुर वाटते
मात्र मी दाखवत नाही, मला सुद्धा
मी दाबून ठेवतो कळ, पारिजातकाच्या कळ्यांची
मी एकटा-एकटाच गळतो कोमेजून

फुलं वेचायला मुली रोज येतात

यात काय विशेष?
असं वाटतं, थोटक्या गोष्टीचे
महाकाव्य करून मी छाती बदडतोय
मात्र सध्या मी माझ्या डोळ्यांत नाही –
कुठेतरी सावलीत बसलो आहे

फुलं वेचायला आता मुली येत नाहीत

त्यामुळे फुलंही गळत नसावीत
मात्र ती शाखांवर बहरली आहेत
मुली आल्यावर त्यांना –
भरभरून गळायचं आहे

***

आर्त

हस्तमैथुनोत्तर श्वासांनी
विणलेले हात
चुरगळलेल्या मनाची
घडी मोडतात.
उमासत उमासत
क्षणभर हुंदका
अंतराच्या वेशी तोडतो.
हाडकं पसरून
कातर आवाज
स्तब्धतेच्या खुणा मोडतो.
जगून जगून
निर्ढावलेलं मन
आर्त मंदतेत
ढवळून येतं. 

चित्र सौजन्य: सांड्रा कोरे, द नेबरहुड, २०१९

Post Tags

33 Comments

  • सतीश पिंपळे, अकोला
    Posted 14 मे , 2020 at 11:02 am

    खुप छान सादरीकरण… शब्द रचनेची वेगळी शैली..
    अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन..!

    • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
      Posted 21 मे , 2020 at 8:02 am

      सतीश सर तुम्ही माझ्या कविता वाचल्या, अतिशय आनंद झाला. शुभेच्छांबद्दल आभार !

      • महादेव रामचंद्र कांबळे
        Posted 19 जून , 2021 at 9:40 pm

        कविता वाचताना कवितेतलं कवितेचं चित्र डोळ्यासमोर तरळू लागतं. सटल अजून मिळालं नाही ते वाचल्यानंतर आणखी बोलू… अनिरुद्ध आचार्य आवडत्या कवींच्यामधलं खूप आवडणारं जवळचं वाटणार नाव वाटू लागलय…

  • दागो.काळे
    Posted 14 मे , 2020 at 12:13 pm

    प्रिय,
    संपादक स.न.
    आपण एक चांगली उमेद असलेला कवी हाकारात आणलेला आहे.अनिरुध्द आपल्या जगण्यातील भावनांचे लहान लहान अंश घेऊन एक संचित जमवतो आहे.त्यात तो अडकून बसत नाही.त्याच्या कवितीक आस्थेत एक फुलपाखरु दडलेले आहे.ते जीवन-जाणिवेतील पराग घेत देत भिरंगत असते.
    त्याला असे करण्याची वेगळी दृष्टी मिळाली आहे.
    । । दागो.काळे । ।

    • Mrs . Vidya Mahajan
      Posted 14 मे , 2020 at 4:57 pm

      Congratulations Aniruddh ! Your each and every poem is different…. Your presentation is good …. God bless !

      • मिलिंद सभापतीकर
        Posted 16 मे , 2020 at 4:28 pm

        सुंदर रचना अप्रतिमम

      • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
        Posted 21 मे , 2020 at 8:15 am

        Vidya Tai, I am very glad to see your nice appreciation. Thanks for the blessings.

    • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
      Posted 21 मे , 2020 at 8:04 am

      आदरणीय संपादकांना लिहिलेल्या पत्रात माझ्याबद्दल आत्मीयतेने आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे मला खूपच छान वाटले. वेळोवेळी झालेल्या भेटीत तुम्ही जे सहजही बोलत असता ते कवितेसाठी अमूल्य मार्गदर्शन असते. तुमच्या या भावनांची शिदोरी मला आयुष्यभर पुरेल.

    • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
      Posted 21 मे , 2020 at 8:48 am

      प्रिय काळे काका, आदरणीय संपादकांना लिहिलेल्या पत्रात माझ्याबद्दल आत्मीयतेने आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे मला खूपच छान वाटले. वेळोवेळी झालेल्या भेटीत तुम्ही जे सहजही बोलत असता ते कवितेसाठी अमूल्य मार्गदर्शन असते. तुमच्या या भावनांची शिदोरी मला आयुष्यभर पुरेल.

  • Dinkar Manwar
    Posted 14 मे , 2020 at 1:10 pm

    अनिरूध्द आचार्य यांच्या कविता वाचल्या.अतिशय आवडल्या. एवढ्या लहान वयातही त्याची कवितेची समज प्रगल्भ आहे. तो जगाकडे आणि जगणियाकडे निरागसतेने पाहतो. त्याची कविता विशुद्ध आहे. कवितेतला भाषा सहजसोपी असून वाचकांना लहान मूल होऊन निरामय प्रदेशात घेऊन जाते. प्रतिमांचा भडीमार नाही. त्याच्या बालसुलभ प्रेरणा कवितेला अंगभूत बळ देतात. त्याच्या वाटेला आलेले अनुभव तो एवढ्या सहजतेने कवितांत रूपांतरीत करतो की त्या जणू एखादे फुलपाखरू फुलातून परागकण शोषून घेतो.

    अनिरूध्द असाच लिहित रहा. तुला कवितेतील अनोखे प्रदेश असेच गवसतील आणि तुझी कविता दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाईल.

    • Suyog deshapnde
      Posted 15 मे , 2020 at 1:02 pm

      त्याचे चित्र पण सुंदर असतात.

      • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
        Posted 21 मे , 2020 at 8:50 am

        प्रिय सुयोग, माझे चित्रही तुझ्या लक्षात असतील अस वाटलं नव्हतं, त्या मुळे हा एक सुखद धक्का होता. आदरणीय प्रदीप वैद्य सरांच्या कार्यशाळेतला तुझ्या सोबतचा अनुभव मला समृद्ध करणारा होता. नजीकच्या भविष्यात तुझ्या मार्गदर्शनाखाली मला पुन्हा रंगमंचावर अभिनय करायची इच्छा आहे. भेटू.

    • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
      Posted 21 मे , 2020 at 8:45 am

      प्रिय मनवर काका, तुमचा अभिप्राय वाचून मी अक्षरशः भारावून गेलो. क्षणभर वाटले की तो खरच माझ्याच कवितांबद्दल आहे ना! माझ्या कविता आपल्यापर्यंत सुलभपणे पोहोचतात आणि आपल्याला आवडतात याचा मला अतिशय आनंद आहे कारण तुमच्या कविता मला आदर्श आहेत. आपले मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य आहे. कुठेही कधीही चुकल्यास, कमी पडल्यास सांगा; तो तुमचा हक्कच आहे.

  • Chhaya Habbu
    Posted 14 मे , 2020 at 1:56 pm

    Congratulations dear Aniruddh, well written. Keep going and reach great heights. God bless.

    • मिलिंद सभापतीकर
      Posted 16 मे , 2020 at 4:29 pm

      सुंदर रचना अप्रतिम

      • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
        Posted 21 मे , 2020 at 9:00 am

        प्रिय मिलिंद काका,
        आभारी आहे, धन्यवाद !

    • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
      Posted 21 मे , 2020 at 8:57 am

      Dear Mummy,
      I am very happy to see your message. You were personally present at every turning point in my life. You encouraged me in every ups and downs in my life which I will never forget. I hope and I know that you will support me forever. And so I shall wait for your guidance at every milestone. Thank you very much for everything.

  • अविनाश प्रभाकर आचार्य
    Posted 14 मे , 2020 at 5:23 pm

    बापरे,
    जी. ए. कुलकर्णींची आठवण झाली।
    अनिरुद्ध, सातत्य असू दे।

    • अनिरुद्ध दिवाकर आचार्य
      Posted 21 मे , 2020 at 9:02 am

      प्रिय अवी काका,
      तुम्ही आठवणीने कविता वाचल्या आनंद झाला. सदैव आशिर्वाद राहू द्यावा.

  • Ashutosh Goenka
    Posted 14 मे , 2020 at 7:35 pm

    Congratulations Aniruddha!
    Though amateur, you seem to be professional. Your Kavita, touche the heart of the reader, of course, who understands the feelings expressed. You will positively reach to the Top, there is always a place at the Top, if you have that talent. Your Kavita is not the less best in all respects, construction, vocabulary, expression, reaching out and foremost the subjects. All my best wishes. You deserve lots of Appreciation n applause.
    I could not stop myself, writing a big compliment, out of my love n pride for you. I know you have knack to be the best. Blessings!!

    • Aniruddha Diwakar Acharya
      Posted 21 मे , 2020 at 11:55 am

      Respected Ashutosh Goenka Sir,
      Thank you very much for your kind appreciation. I can feel your emotion filled heart for me. Thanks once again for your love and blessings, I need them forever.

  • Bhushan Shende
    Posted 14 मे , 2020 at 7:41 pm

    Congratulations Anirudh Very nicely composed.God bless.

  • Dr.Ravi Dande
    Posted 14 मे , 2020 at 10:59 pm

    छान आहेत कविता. मी दि. कृ. यांच्या पण कविता, कथा, नाटक इ.वाचल आहे.तसेच एका नाटकात अभिनय केला आहे.
    काही प्रमाणात मला दि. कृ. ची छाप वाटली. एकूण सुंदर. पुढील वाटचाली करिता माझ्या शुभेच्छा आणि अभिनंदन.
    रवि दंडे

  • संजीव प्रभाकर आचार्य
    Posted 14 मे , 2020 at 11:02 pm

    अनिरुद्ध,

    खूप छान लिहितोस,
    तीन वर्षपूर्वी तुझ्या कविता वाचल्या तेव्हाच मला तुझ्यात जी ए दिसल्याचे सांगितले होते.

    आज त्याच गोष्टीचा पुनःप्रत्ययाचा आनंद दिलास,

    तुझं भविष्य उज्वल आहे,व त्यामुळे आम्हा वाचकांचेही !

  • संजीव प्रभाकर आचार्य
    Posted 15 मे , 2020 at 9:39 am

    अनिरुद्ध,
    कविता खूप आवडल्या, तीन वर्षयापूर्वी तुझ्या कविता पहिल्यांदा वाचल्या होत्या तेव्हाच तुझ्यात जी ए दिसतात,हे जाणवले होते.
    आज पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला,
    तुझे व त्यामुळे आम्हा वाचकांचे भविष्य उज्वल आहे हे परत एकदा अधोरेखित झाले.

  • Dr. Nrupal P Mhatre
    Posted 16 मे , 2020 at 4:18 pm

    प्रिय अनिरुद्ध,
    खुप छान कविता, अंतरातील खोलवर असलेली सल प्रकट करणारया!!! तुझ्या कवितांमध्ये कुठे तरी तुझ्या वडिलांच्या (आमच्या आचार्य सरांच्या) साहित्य शैलीचा, त्यांच्या प्रतिभाशक्तीचा ठसा (किंवा आपण वारसा म्हणू शकतो) आहे. तुझ्या कवितांमध्ये मला माझे सर भेटतात.
    सरांचा डाॅक्टरकीचा वारसा विश्वासने आणि साहित्याचा वारसा तु समर्थपणे चालवत आहेत हे पाहून आनंद झाला. तुला व तुझ्या साहित्य साधनेला माझ्या मनापासून शुभेच्छा.
    डाॅ. नृपाल प्र. म्हात्रे
    विरार

  • Prashant Pathak
    Posted 16 मे , 2020 at 9:47 pm

    अनिरुद्धचे वय डोकावते कवितांमध्ये. वयाला साजेशा. सुंदर. कमालीची जाणीव, धाडस, हळुवारपण, मखमलीपण जाणवते.
    जि. एं. ची आठवण नक्कीच येते.
    शुभेच्छा खुप खुप.

  • चिन्मय शुभदा
    Posted 18 मे , 2020 at 12:12 am

    छान! मौज आली! एक संयत sullenness सलननिस आहे कवितांत! इंग्रजीत एक शब्द आहे यासाठी विस्टफ़ुल – म्हणजे त्यात हसरत (उणिवेची जाणीव) आणि आरज़ू (हा माहीत असतो!) दोन्ही असतं – खेद, वैषम्य आणि तरी इच्छा-आकांक्षा — .

  • Ravindra Damodar Lakhe
    Posted 18 मे , 2020 at 8:49 am

    संपादक हाकारा

    अनिरुद्धच्या कविता अतिशय दर्जेदार नि अनवट आहेत. त्या प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.

    रवीन्द्र लाखे

  • प्रकाश काका
    Posted 19 मे , 2020 at 4:00 pm

    बशू,
    ‘सटल’ मधील कविता सोप्या वळणाच्या होत्या.
    आता अधिक प्रगल्भ होत आहेत(मला काही काही कळल्या नाहीत म्हणून)तू मोठा कवी होणार यात शंका नाही. तुझं अनुभव विश्व वेगळे आहे. मी स्वतः तुला कवितेत न पाहता कवितेतून तुझं बालपण पाहतो त्यामुळे कदाचित असे होत असावे.मी काही कवी नाही. माझी समज अत्यल्प आहे. पारिजातकाची कविता ‘विशेष’आवडली.

  • अमिता देशपांडे-दसरे
    Posted 28 मे , 2020 at 4:05 pm

    कविता छानच!
    मामाच्या शैलीची आठवण होते.
    लिहीत रहा..
    तुला खूप खूप शुभेच्छा!

  • विवेक दसरे. अहमदनगर.
    Posted 28 मे , 2020 at 4:41 pm

    प्रिय अनिरुद्ध,
    अतिशय जिवंत कविता. त्यात एक सल जाणवत रहाते. तुझं वय त्यात दिसत रहातं. सगळ्या समजल्या असं नाही. पुन्हा पुन्हा वाचल्या पाहिजेत. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप वाच, आणि लिहीत रहा.

  • अरुणोदय
    Posted 22 नोव्हेंबर , 2020 at 9:37 am

    अप्रतिम लिहिताय. साऱ्या कविता खूपच आवडल्या.

Leave a comment