वरील चित्र: शहीद भगतसिंग यांनी लिहिलेले पत्र. सौजन्य: भगत सिंग अर्काइव आणि रिसोर्स सेंटर आणि http://www.shahidbhagatsingh.org/
स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी अजूनही भारत मूलभूत गोष्टीसाठी झगडत होता. ज्या हेतूनी अनेक क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या हेतूलाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सुरुंग लावला जात होता. स्वातंत्र्य संग्रामात कार्यरत असणाऱ्यांना हा आजचा भारत अपेक्षित होता का? त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं? या सर्व प्रश्नांतून ‘गगन दमामा बाज्यो’ची निर्मिती झाली. गेल्या वर्षी याची हिंदी संहिता वाचण्यास मिळाली त्यावेळी हे नाटक, त्यातील मुद्दे हे आजही तितक्याच किंबहुना अधिक तीव्रतेने लागू होत असल्याचे लक्षात आले आणि म्हणून या नाटकाचा मराठी अनुवाद करावा आणि मंचन करावे हे ठरले.