मूळ हिंदी लेखक: पीयूष मिश्रा
मराठी भाषांतर: साहिल कल्लोळी
गगन दुंदुभी वाजे
६
back
Loading…
स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी अजूनही भारत मूलभूत गोष्टीसाठी झगडत होता. ज्या हेतूनी अनेक क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या हेतूलाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सुरुंग लावला जात होता. स्वातंत्र्य संग्रामात कार्यरत असणाऱ्यांना हा आजचा भारत अपेक्षित होता का? त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं? या सर्व प्रश्नांतून ‘गगन दमामा बाज्यो’ची निर्मिती झाली. गेल्या वर्षी याची हिंदी संहिता वाचण्यास मिळाली त्यावेळी हे नाटक, त्यातील मुद्दे हे आजही तितक्याच किंबहुना अधिक तीव्रतेने लागू होत असल्याचे लक्षात आले आणि म्हणून या नाटकाचा मराठी अनुवाद करावा आणि मंचन करावे हे ठरले.
पीयूष मिश्रा हे गेली अनेक वर्षे रंगभूमीशी तसेच सिनेसृष्टीशी निगडित काम करत आहेत. नाटककार, लेखक, दिग्दर्शक, कवी, गायक अशा विविध भूमिकांतून ते आपल्यासमोर आले आहेत. ‘गगन दमामा बाज्यो’ हे पीयूष मिश्रा यांनी ऍक्ट वन या नाट्यसंस्थेसाठी लिहिलेलं नाटक. नाटकाचा पहिला प्रयोग या संस्थेतर्फे ८ जून १९९४ रोजी, श्रीराम सेंटर, मुख्य सभागृह, नवी दिल्ली येथे सादर केला गेला.
साहिल कल्लोळी हे लेखक, वेब डेव्हलपर, सोशल मिडिया आणि मुक्त साॅफ्टवेअर अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच अनेक वर्षे प्रत्यय, कोल्हापूर या नाट्य संस्थेमध्ये कार्यरत आहेत.