मूळ लेखक: स्टीफन हीथ

मराठी भाषांतर : आरती रानडे

साहित्य प्रकारांचे राजकारण



back

वाङ्मय विविध प्रकारच्या लेखन स्वरूपात अस्तित्वात असते. उदाहरणार्थ, एकीकडे काव्य तर दुसऱ्या बाजूला नाट्य, एका बाजूला गीतं तर दुसऱ्या बाजूला कथाकथनात्मक काव्य. आपण, प्रत्यक्ष वाङ्मय आणि त्याचबरोबर त्याची निर्मिती आणि स्वीकृतीची रचना अशा दोन्ही दृष्टीनं गटविभागणी केलेलं – कादंबऱ्या, सुनीतं, निबंध, रहस्यकथा, विडंबनं, बोधकथा, उपरोधिका इत्यादी अनेक प्रकारचं वाङ्मय वाचतो.  कोणत्याही एका ठरावीक काळात, एका ठरावीक समाजात, लेखन अथवा वाचन करणे म्हणजे लेखनाच्या सद्य, प्रचलित संकेतांशी, ते कोणत्या रूपात साकारू शकते याची अपेक्षा करत जुळवून घेणे. खरोखरच, एके काळी एखाद्या भाषेतील सर्व छापील ऐवज म्हणजे ‘वाङ्मय’ असं मानलं जात असे. त्याच्याकडे आता बहुतांश वेळा केवळ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील लेखन ओळखण्यासाठी आणि त्यात व इतर सर्व प्रकारात तफावत करण्यासाठी (शास्त्र, पत्रकारिता, इतिहास या सर्व ‘न- वाङ्मय प्रकारात) म्हणजेच त्या विशिष्ट प्रकारच्या लेखनाची ओळख दर्शवणारी एक संज्ञा या अपेक्षेने पाहिले जाते. लेखनाची विभागणी करणे आणि त्याची ओळख ठरवण्यासाठी समूह उपलब्ध असण्यात खरा कस लागतो. कोणतीही संहिता ही सर्वार्थाने कधीच स्वतंत्र नसते, तर ती इतर प्रकारांच्या संदर्भानेच लिहिली अथवा वाचली जाते. त्यामुळेच, कोणतीही संहिता ‘प्रकारविरहीत’ नसते.

साहित्य प्रकारांच्या वर्गीकरणामुळे लिखित वाङ्मयाच्या विविध प्रकारांना अतिशय प्रभावी ओळख प्राप्त झाली आहे. एक महत्त्वाची संज्ञा या दृष्टीने ‘जॉनर’ (प्रकार) ह्या संज्ञेचा उगम एकोणिसाव्या शतकात झाला (त्या पूर्वीच्या काळात, प्रकारांचे ‘काटेकोर’ गटच मान्य होते). मूळ लॅटीन शब्द ‘जीनस’ (genus) म्हणजे मूळवर्ग किंवा प्रकार ह्या शब्दावरून फ्रेंच भाषेत उगम पावलेला हा शब्द ‘जेंडर (लिंग) ‘ ह्या शब्दाशी उगमसाधर्म्य दर्शवतो. रोमानिक भाषांमध्ये ह्या एका शब्दात दोन्ही अर्थ सामावलेले आहेत. त्यायोगे, जेंडर (लिंग) या शब्दातून प्रमुख वर्ग, गट, मूलभूत प्रकार अंतर्लिखित होते. (काही पाश्चिमात्येतर भाषांत हा शब्द स्वीकारला आहे, उदा. जॅपनीज भाषेत जॅनरु (ganru)). पाश्चात्य साहित्य प्रकारांच्या विचारांचा मुख्य उगम अ‍ॅरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’ मध्ये (Poetics) आहे. पाश्चात्य साहित्यप्रकारांचा प्रवासच मुळात एक काव्य आणि काव्याच्या विविध प्रकारात मोडणारा आहे. ह्या प्रकारांत, ज्या गोष्टीचे अनुकरण करायचे आहे त्या गोष्टीनुसार आणि अनुकरण करण्याच्या माध्यमानुसार फरक दर्शवले गेले आहेत. (अ‍ॅरिस्टॉटलसाठी काव्य हे अनुकरणात्मक कलेशी संबंधित आहे). वरिष्ठ लोकांच्या वागणुकीचे नाट्यमय पद्धतीने अनुकरण करणे म्हणजे शोकांतिका आणि आख्यानात्मक पद्धतीने अनुकरण करणे म्हणजे महाकाव्य. उलटपक्षी, कनिष्ठ लोकांच्या वागणुकीचे नाट्यमय पद्धतीने अनुकरण करणे म्हणजे विनोदनिर्मिती आणि कथनात्मक पद्धतीने अनुकरण करणे म्हणजे विडंबन अथवा उपरोध. अनुकरण करण्याच्या माध्यमानुसार देखील हा फरक करता येईल. महाकाव्य आणि शोकांतिका हे दोन्ही पद्य रूपात आहेत, पण शोकांतिकेत विविध वृत्तांचा आणि त्याचबरोबर लक्षवेधक देखाव्यांचा व गीतांचा वापर केलेला दिसतो.

इथे अ‍ॅरिस्टॉटलच्या विवेचक ग्रंथातील तपशीलाला तुलनेत कमी, तर त्या ग्रंथामुळे होणाऱ्या प्रभावाला अधिक महत्त्व आहे. जटील गुंतागुंतीच्या इतिहासात, एक विडंबन म्हणून काव्यावर लक्ष केंद्रीत करताना त्याच्या जोडीला विडंबनात्मक नसलेल्या काव्याविषयी देखील आस्था दाखवली आहे.  आणि त्याला सामावून घेताना अजून एक जास्तीची – गेय- पद्धती वापरल्यामुळे ‘गेय, महाकाव्य, नाटकीय’ अशी ‘त्रिधारा’ तयार झाली आहे. अ‍ॅरिस्टॉटलच्या अधिकारामुळे किंवा एकूणच ग्रीस आणि रोमच्या  अभिजात परंपरांमुळे, या परंपरांशी बरोबरी करण्याच्या योग्यतेचे स्वतःचे वाङ्मय निर्माण करण्यास उत्सुक असणाऱ्या राष्ट्रांमध्ये साहित्य प्रकारांविषयीचे मुद्दे अधिक जिव्हाळ्याचे बनले. उदाहरणार्थ, सतराव्या आणि अठराव्या शतकातील फ्रान्स आणि इंग्लंडमधला नव-अभिजाततावाद साहित्यप्रकाराकडे शैली आणि आशयातील संबध जोडण्यासाठी मानकं म्हणून पाहाण्यात आग्रही होता. पारंपरिक रूढ विचारातून सुसज्ज झालेले आदर्श नमुने हे ‘निसर्ग पद्धती’ (ज्याचे अनुकरण करणे म्हणजे निसर्गाचे अनुकरण करणे) प्रमाणेच स्वयंसिद्ध नियम म्हणून स्वीकारले गेले. म्हणूनच, साहित्य प्रकारांचे योग्य ज्ञान आणि त्यांचे नियम कवीसाठी आवश्यक होते आणि त्याचा एक स्वतंत्र काव्यप्रकार होता. एक आदर्श नमुना म्हणून होरेसचे Ars Poetica किंवा महत्त्वाचे नमुने, दाखले म्हणून Boileau चे L’Art poetique आणि पोपचे An Essay on Criticism या संहितांकडे पाहिले गेले. शेक्सपियरने त्यानंतर एक पेच उभा केला: त्याचे माहात्म्य स्वीकारले गेले, पण त्याची नाटके साहित्य प्रकारांच्या मर्यादांचे उल्लंघन करून शोकांतिकेचे विनोदाबरोबर मिश्रण असणारे एक ‘सरमिसळी नाट्य’ मानले जाऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे, असे मानण्याला जेव्हा आव्हान दिले गेले तेव्हा एक नवीन साहित्य प्रकार ठरवण्याची गरज निर्माण झाली. असा नवीन साहित्य प्रकार जो, कोलरीजने संबोधलेल्या ‘अपयोजित नावे’ या संकल्पनेला बाजूला ठेवेल आणि नाटकाच्या विविध प्रकारांना न्याय देईल.

लेखनाच्या शीर्षकामध्ये प्रकारदर्शक नामनिर्देशन करणे हा देखील लेखनाच्या मांडणीचा, सादरीकरणाचा एक अविभाज्य भाग असू शकतो. उदाहरणार्थ, Roman de la Rose, Isayoi nikki (Abutsu-ni म्हणजे  खाजगी, रोजनिशी कथन), Pagina meditationum (Marguerite d’Oingt), Essais (Montaigne), नॅरेटीव्ह ऑफ द लाईफ ऑफ फ्रेडरिक डग्लस, अ‍ॅन अमेरीकन स्लेव्ह, रिटन बाय हिमसेल्फ, Duineser Elegien (Rilke), Une si longue lettre (Mariama Ba). परंतु, अशी विभागणी गृहित धरणे जरुरीचे नाही. साहित्य प्रकार हे काही स्थायी तत्त्व नाही आणि प्रत्येक वेळी ही नावे त्यांच्या ऐतिहासिक भवतालाच्या संदर्भात आणि ते निर्माण करत असलेल्या विविध पाठ्यचिकित्सक, सांहितीक परिमाणांचा विचार करत समजून घ्यायला हवीत. डग्लसचे लिखाण हे एका अर्थी आयुष्याविषयीचे कथन आहे आणि Ba या लेखकाचे चे (पत्ररूपातील) कादंबरी लेखन असलेले.  Psalms मध्ये एक प्रकारचा सुसूत्रता दिसून येते जी अनेकविध काव्य प्रकारांच्या विशेषतः  स्तुतीस्तवन काव्य आणि प्रार्थनेच्या यांच्या मिश्रणातून निर्माण झालेली आहे ह्या दृष्टीकोनातूनही पाहता येईल. (हिब्रू शीर्षक – तहिलीम, म्हणजे स्तुती). Kim Van Kieu (ग्वेन ज्यू Nguyen Du हे इंग्रजीमध्ये ‘द टेल ऑफ कियेवू’ या नावाने ओळखले जाते.  त्यात ‘कथा’ आणि पारंपरिक लोकवाङ्मयात आढळणारा सहज सोपेपणा यांच्या वापरातून केलेले कवितात्मक कथन दिसते. वास्तविक पाहता यातील काव्याचे शीर्षक यातल्या प्रमुख पात्रांची नावे गुंफून रचलेले आहे. (एक पर्यायी शीर्षक, Doan-Truong Tan-Thanh  एका जुन्या दु:खी कथेचे नवे रुप सुचवते. शब्दशः, पिळवटलेली आतडी, नव्या रूपात). महाकाव्य कादंबरी The History of Emily Montague (Frances Brooke) ही  Historia de las Indias या बखर स्वरूपातील, खाजगी साक्ष आणि विवेचक ग्रंथ असलेल्या लिखाणापेक्षा  संपूर्णतः भिन्न आहे. याशिवाय, आज ‘इतिहास’ किंवा ‘ऐतिहासिक’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शैक्षणिक मानकांच्या दृष्टीकोनातूनही खूप वेगळी आहेत. पण मग, इतक्या आत्मविश्वासाने हे दोन्ही वेगळे ठरवणे, किंवा ‘खरोखरीच’ एक कादंबरी की कादंबरी नसून इतिहास असं साहित्याला एका किंवा दुसर्‍या विभागात टाकणे या सगळ्याचा नेमका अर्थ तरी कसा लावणार?

ऐतिहासिकदृष्ट्या, सर्व संस्कृतींमध्ये जागतिक वाङ्मय, साहित्य प्रकार आणि त्याच्याशी निगडीत प्रश्न आढळून येतात. पुरातन चिनी काव्यातील Shih-ching या अभिजात काव्यसंग्रहाद्वारे एका विद्याव्यासंग परंपरेचा उदय झाला. या परंपरेतून निर्माण झालेली महान साहित्य कृती म्हणजे पाचव्या शतकातील वाड्मयीन इतिहासकार Liu Hsieh याची Wen-hsin tiao-lung ही निर्मिती. लिऊला विविध काव्यप्रकारांमध्ये आस्था होती.  त्याच्या अभ्यासातून, Shih-ching मध्ये प्रत्येक अध्यायागणिक केलेल्या साहित्य प्रकारांच्या विवेचनाच्या पूर्वी प्रथमतः साहित्य प्रकारांच्या गुणधर्मावर प्रकाश टाकला गेला आहे असे आढळते. अ‍ॅझटेक संस्कृतीमधल्या पंधराव्या आणि सोळाव्या शतकातल्या प्रासादांना क्युकाकल्ली  म्हणजेच ‘गानगृहे’ जोडलेली असत. काटेकोरपणे गीत काव्याची रचना आणि सादरीकरण करणे हे या क्युकाकल्लीचे मुख्य प्रयोजन.  (Cantares mexicanos या पोथीरूप हस्तलिखितात नोंद असलेल्या कविता). योरुबा लोकांची मौखिक काव्यपरंपरा, Oriki (स्तवन काव्य) , Ofo (मंत्रतंत्र) , Alo Apamo (कूटप्रश्न) अशा अनेक साहित्य प्रकारांमध्ये मोडते.  वाङ्मयीन आणि शब्दार्थमीमांसेविषयक लक्षणांवर आधारित काटेकोर फरकांमुळे त्यांची वेगळी ओळख जाणवते आणि सादरीकरणातून ही ओळख मांडता येते.

साहित्य प्रकारांबाबत विचार आणि प्रयोग या संदर्भातील ही उदाहरणे, ‘प्रकार’ या संज्ञेतून आपल्याला काय उमगते आणि त्याचा जागतिक वाड्मयातील विविध वाड्मय -प्रकार हाताळत असताना काय संदर्भ आहे याविषयी काही प्रश्न निर्माण करतात. नाट्यपूर्ण हा अभिव्यक्तीचा एक मार्ग इतिहासात  Sophocles, भास, Zeami, Goethe यांच्याशी संलग्नीत विविध संस्कृतीमध्ये आढळून येतो. सुनीतं आणि हायकू हे ठरावीक काव्यप्रकार एकापेक्षा अधिक संस्कृतीत कमी प्रमाणात आढळून येतात. सुनीतं युरोपियन भाषांतील साहित्यामध्ये तर हायकू हा मुख्यत्वे जपानी संस्कृतीत आढळतो. पण काही वेळा त्याचा इतर काव्यांतही अनुकूलरीत्या वापर केलेला दिसतो (इझरा पाउंड चे प्रसिद्ध इन स्टेशन ऑफ द मेट्रो याची साक्ष देते). विलापिका आणि Shishosetsu हे रूप आणि आशय या दोन्हीच्या संदर्भात संकल्पना मांडतात. मृत्यूविषयी शोककाव्य किंवा मरणाविषयी चिंतन मांडतात. प्रामाणिकपणे नोंदवलेल्या वैयक्तिक अनुभवाची प्रचिती देणारी ती एक कादंबरी किंवा कथा असते. (Shiga Naoya ची Kinosaki Ni Te ही कथा हे याचे एक उदाहरण आहे.) तथापि,  विलापिकेला असाही एक इतिहास आहे तो असा की, प्रारंभीच्या काळात अभिजात ग्रीक आणि लॅटीन साहित्यात विलापिका हा शब्द एका ठरावीक काव्य स्त्रोताचाउल्लेख करण्यासाठी  वापरला जात असे.  तर नंतरच्या जडणघडणीमध्ये तो अनेकदा चिंतनशील विषण्णतेची मनःस्थिती अथवा भावविश्व दर्शवणाऱ्या काव्यासाठी वापरला जात असे.  १९२० आणि १९३० च्या दरम्यान अतिशय महत्त्व प्राप्त झालेल्या शिशोत्सुचा संपूर्ण विसाव्या शतकातील जपानी साहित्यावर मोठा प्रभाव पडला. साहित्य प्रकारांच्या कक्षा ओलांडण्यासाठी आणि एकूणच लेखनाचा व्यापक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी त्याचा मोठा हातभार लागला. नंतर आपण सुनीतं आणि हायकू बद्दल बोलू, ज्यांची अधिकृतपणे काव्याच्या एका विशिष्ट आकृतीबंधात व्याख्या केली होती. त्याचा इतिहासातला विकास देखील एका विशिष्ट विषयनिष्ठ संदर्भाभोवती झाला आहे. तेराव्या शतकात इटलीमध्ये उदयास आलेलं सुनीत, Petrarch च्या माध्यमातून झिरपणारे विशिष्ट प्रेमाचे प्रबोधनकाळातील रूप होते.  पंधराव्या शतकात उदयाला आलेला विनोदी जोडकाव्य किंवा हायकाइ-रेंगा हा हायकू एडो कालखंडाचे प्रतिकात्मक काव्यरूप म्हणून विकसित झाला. यामध्ये बाशोने वर्णन केलेली  ‘गोष्टींशी एकरुपता साधणाऱ्या अनुभूती, अंतर्गत संवेदनशीलता’ आहे, पण त्याचबरोबर कोनिन ह्या नव्याने विकसीत होणाऱ्या व्यापारीवर्गाच्या शहरातील आयुष्याशी जवळीक देखील साधली आहे. सुनीत आणि हायकू हे दोन्ही प्रकार म्हणून आजवर चालत आले आहेत, पण त्यात काही विशिष्ट कथानकविषयक पुनर्रचना  झाली आहे .  (यामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील हायकूची जी पुनर्रचना ज्यामुळे  खुद्द हायकू ह्या शब्दाला त्याचा अर्थ प्राप्त झाला त्याचा समावेश आहे). 

पद्धती आणि विषयसूत्र यांच्या छेदनबिंदूपाशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रकारांचे अनन्यसाधारण महत्त्व जाणवते, जसे अ‍ॅरिस्टॉटलच्या शोकांतिकेमध्ये एक ठरावीक विषय नाट्यपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आहे. यातील गेय- महाकाव्य – नाट्यपूर्ण ही त्रयी म्हणूनच साहित्य प्रकाराशी निगडीत नसून, प्रतिपादन करण्याचा मार्ग आहे. आणि ज्याला स्वतःचा कोणताही परिभाषित आशय नाही अशी गोष्ट सादर करण्याचा मार्ग आहे. हे समजण्यास अवघड जाऊ शकते कारण रोमॅन्टीक आणि पोस्ट-रोमॅन्टीक काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या त्रिधारेचे तपशीलवार वर्णनातून, पद्धतींना कथानकाचे भरीव, भक्कम रूप म्हणजे एका अर्थी मनस्थिती किंवा भावस्थितीचे  रूप देण्यात आले आहे.  (त्यामुळे आपण बहुतांशी वेळा नाट्यपूर्ण हा शब्द पद्धत या संदर्भात न वापरता, ठळक, पटणारे, महत्त्वाचे वाटणारे या अर्थाने वापरतो- नाट्यपूर्ण रंग, नाट्यपूर्ण घटना). मात्र, पद्धती ह्या भाषेच्या वास्तवतेशी, भाषेच्या वापराच्या शक्यतांशी निगडीत असतात. साहित्य प्रकार हे अशा एक अथवा अनेक शक्यतांचे एका मर्यादेपर्यंत केलेले वैशिष्ट्यपूर्ण एकत्रिकरण असते. साहित्य प्रकारांची अशी व्याख्या फक्त वाङ्मयाच्या  बाबतीतच नाही, तर सर्वच प्रबंधात्मक विश्लेषणांच्या बाबतीत योग्य आहे. 

रशियन समीक्षक  आणि सिद्धांतवादी मिखाइल बाखतिन ‘भाषण अथवा व्याख्यान प्रकार’ याविषयी बोलतात. आपण भाषेचा वापर वैयक्तिक कथनासाठी करतो पण असे कथन सापेक्षतेने स्थायी, स्थिर संवाद प्रकारामध्ये मोडते. यात प्रत्येक कथन वैयक्तिक, sui generis असते.  आपण जे ऐकत अथवा वाचत आहोत त्यातली निर्णायकता जाणून घेत नाही. या प्रकारात मग कमीजास्त प्रमाणात विविध फेरबदल होण्याची शक्यता असते. जसे सैन्यातल्या आदेशांच्या तुलनेत, रोगी आणि उपचारतज्ज्ञ यांच्यातले संभाषण अधिक लवचिक असते. वाङ्मयीन साहित्य प्रकार हे अशाप्रकारच्या व्याख्यान प्रकारांची उदाहरणे आहेत परंतु, ती दैनंदिन व्यवहारातल्या नेहेमीच्या संभाषणापेक्षा लक्षणीयरित्या वेगळी आहेत. बहुतांश वाड्मयीन प्रकार ह्या प्राथमिक प्रकारांच्या विविध बदलांतून निर्माण झालेले अनुषंगिक, संमिश्र प्रकार आहेत. (संवादातला प्रतिसाद, दैनंदिन गोष्टी, पत्र, रोजनिशी, कार्यवृत्त इत्यादी) एक नियम म्हणून, या संमिश्र सांस्कृतिक आदानप्रदानातील अनुषांगिक प्रकार विविध प्रकारच्या प्राथमिक व्याख्यान संवादाचे कार्य करतात. म्हणून एका कादंबरीत अनेक प्राथमिक साहित्य प्रकार असले तरी ते दुस-या प्रकारच्या कथनात सामावून घेतलेले असतात. जेणेकरुन, त्यांना रोजच्या आयुष्याच्या व्यवधानातून बाजूला काढता येते आणि एक वाङ्मयीन कलात्मक घटना म्हणून त्यांना त्यांच्या स्वतःच्या वास्तविकतेमध्ये पकडले जाऊ शकते. प्राथमिक रूपांना एका ठरावीक पद्धतीने मांडताना त्यांच्यात निर्माण झालेल्या संमिश्रतेमुळे आणि बदलांमुळे असे अनुषांगिक प्रकार निर्माण होतात जे वैयक्तिक अभिव्यक्तीला स्वतंत्रपणे मांडण्याची संपूर्ण मुभा देतात.  मात्र असे स्वातंत्र्य- जे बाह्य स्वरूपात नसते परंतु अंतर्गतच असते. ते प्रचलित साहित्य प्रकारांच्या उपलब्ध साधनांना आवाहन करू शकते किंवा विफलही ठरवू शकते. 

जर  पद्धती, कथानकाचा विषय आणि शब्दयोजनेच्या, उच्चाराच्या अधिकृत बाबी, मीटर इत्यादी घटकांकडे आपण भेद दाखवणारे विविध प्रकार म्हणून पाहिले तर आपल्याला श्रोत्यांचा आणि परिणामांचाही विचार करावा लागेल. (जसे अ‍ॅरिस्टॉटलने शोकांतिकेला अनुकंपा आणि भय यांच्या शुद्धीकरणाचा परिणाम साधणारे दाखवले). वास्तविकपणे, साहित्य-प्रकारांना आजवर अनेक मार्गांनी आणि अनेक संदर्भात अनेकविध आयामांच्या, पैलूंच्या विविध प्रकारे केलेल्या एकत्रिकरणातून परिभाषित केले गेले आहे आणि केले जात आहे. एखाद्या प्रकाराची ओळख दर्शवणारे महत्त्वाचे पैलू, दुसऱ्या प्रकारासंदर्भात तितकेच महत्त्वपूर्ण असतीलच असे नाही.  (उदाहरणार्थ, कथेची लांबी हा लघुकथेचं  वेगळेपण दर्शवणारा एक महत्त्वाचा घटक आहे पण तसा तो कवितेत असेलच असं नाही). त्याचबरोबर  वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमध्ये, एका किंवा दुसऱ्या पैलूची काही लक्षणे सामायिक असू शकतात. (उदाहरणार्थ, एकापेक्षा जास्त प्रकारांमध्ये एखादा ठरावीक विषय समान असू शकतो). साहित्य प्रकार ही संकल्पना नेमकी काय आहे आणि विशिष्ट प्रकार म्हणजे नेमके काय हे सांगणे  कठीण आहे. कारण एखादे लिखाण कोणत्या विशिष्ट प्रकारात मोडते आणि कोणत्या नाही हे  ठामपणे सांगू शकेल अशा कोणत्याही एका व्याख्येपर्यंत पोहोचणे अजिबातच सोपे नाही. (फक्त साहित्य प्रकारांची एखाद्या तांत्रिक स्वरूपात तुलना करणे शक्य आहे, जसे सुनीत हा पद्य स्वरूपाचा प्रकार आहे. किंवा, कादंबरी म्हणजे केवळ गद्य प्रकारातील काही मर्यादेपर्यंत केलेले काल्पनिक लेखन आहे. अशाप्रकारच्या कादंबरी या प्रकारामध्ये अकराव्या शतकाच्या पूर्वार्धातीला गेंजी-मोनोगॅटरी आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील मादाम बोवारी यांना एका वर्गवारीत एकत्रितपणे मांडता येईल.) जिथे, एकीकडे, ‘निश्चित ओळख असणे’ हे  नव-अभिजाततावादाचे गृहीतक आहे आणि त्याला प्रकारांच्या सिद्धांतविषयक प्रश्नांपासून तुलनात्मकरित्या दूर ठेवले आहे.  तिथे, दुसऱ्या बाजूला, नव-पाश्चात्यी चिकित्सेने त्या गृहीतकाला, अशा सिद्धांताविषयी खूपच चिंता व्यक्त करत आणि अखेरीस प्रकारांच्या व्याख्येमधील आणि आकलनातील शिथीलता किंवा अस्पष्टता अधोरेखित करत नाकारले आहे.  जी सगळी लक्षणे एखाद्या साहित्य प्रकारातील सगळ्या लिखाणात सापडतील अशा लक्षणांच्या समूहाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेतून ‘कौटुंबिक साम्य’ या घटकाने जोडले गेलेले कलाकृतींचे गट ही संकल्पना समोर येते. या संकल्पनेनुसार एखाद्या गटात काही मूलतत्त्वे, घटक सामायिक असतात, गटाच्या प्रत्येक सदस्यामध्ये ती सर्वच मूलतत्त्वे उपस्थित नसतात. म्हणूनच कोणातेही एक लिखाण, त्या साहित्य प्रकाराच्या समूहातील सर्वच्या सर्व लिखाणाशी साधर्म्य दाखवतील अशी वैशिष्ट्ये धारण करत नाही. परंतु, इतर साहित्यकृतींच्या तुलनेत अधिक केंद्रीय व्याख्या करू शकणाऱ्या काही साहित्यकृती मूळ नमुना म्हणून पाहता येतील. (मादाम बोव्हारी ही  कादंबरी लेखनाच्या प्रांतातील एक प्रकारची साहित्यकृती आहे, पण गलीव्हर्स ट्रॅव्हल्स ही नाही – असे म्हणता येईल) उलटपक्षी, कोणताही एक प्रकार अशा एखाद्या कलाकृतीची परिपूर्णतेने ओळख मांडू शकत नाही जिच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात इतर प्रकार सामावलेले आहेत (बाखतिनच्या प्राथमिक प्रकारांपासून सुरुवात करुन) जिचा एकापेक्षा अधिक प्रकारांमध्ये समावेश होऊ शकतो (Spenser’s Faerie Queene हे महाकाव्य आहे, प्रेमकाव्य आहे, राजकीय रूपक- अन्योक्ती आहे, नितीमत्ता विषयक विवेचक ग्रंथ आहे) आणि जे प्रकारांची पुनर्परिभाषा करण्यासाठी उपलब्ध होईल.

‘कौटुंबिक साम्य’ या संकल्पनेला महत्त्व देणं याचा अर्थ साहित्य प्रकाराला स्वतःची भक्कम, ठोस वास्तवता नसते’ असं म्हणणं असं नाही.  साहित्याकडे प्रकार-वर्गीकरणाच्या दृष्टीकोनातून पाहणे म्हणजे पहिल्याची ऐतिहासिकता जितकी शक्य आहे तितकी आकलन करणे.  आणि दुस-याची काटेकोर ‘नैसर्गिक’ रूपं किंवा अमूर्त प्रकार आहे वा नाही हे समजून घेणे. वक्त्याच्या आणि श्रोत्याच्या, लेखकाच्या आणि वाचकाच्या भाषेच्या ठरावीक सामाजिक-ऐतिहासिक क्रियांमुळे निरुपणातील मांडणी बदलते, विस्थापित होते, प्रवाही होते, जोर हरवून बसते, बदलत्या काळानुसार आणि संस्कृतीनुसार येते आणि  जातेही.  स्थिरतेने, अचलतेने सामावून घेईलच असं नाही, अशी जरी प्रकाराची एक व्याख्या असली तरी त्यामुळे प्रकार ही कोणतीतरी नाममात्र कल्पनाविलासी संकल्पना किंवा वाङ्मय समीक्षकांनी साहित्यकृतींच्या वर्गवारीसाठी योजलेली कोणतीतरी स्वच्छंदी गटविभागणी ठरत नाही. जरी त्याचे विस्तृत संकलन केलेले असले किंवा नसले तरी, बाखतिनने सुचवल्याप्रमाणे, प्रकारांचा अभ्यास, रिवाज आवश्यक आहे.  ‘भाषेचे प्रकार’ हे भाषिक संवादातील एक कायमस्वरुपी सत्य आहे. जर हे सर्व प्रकार भाषातज्ज्ञ, इतिहास संशोधक, समीक्षक आणि इतरांनी, विवेचनात आणि मीमांसेमध्ये मांडले तर ही प्रकारांची ओळख करुन देणारी वास्तववादी रूपं आहेत. श्रोते आणि वाचकांसाठी अपेक्षांची क्षितीजे आहेत. वक्ते आणि लेखकांसाठी निर्मितीचे नमुने, दाखले आहेत. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, साहित्य प्रकार हे संवाद साधण्याच्या प्रातिनिधिक परिस्थितीमध्ये आणि कोणाशी संवाद साधला जात आहे, तो कोणत्या विशेष आत्मनिष्ठेच्या दृष्टीकोनातून, सामाजिक सदस्यत्वातून, धर्मविषयक  निष्ठेतून, लैंगिक स्थितीभानातून,  सामाजिक स्तरातून किंवा इतर साधला जात आहे का आणि त्यानुसार घडणाऱ्या विवेचनाच्या वैशिष्ट्यांची प्रातिनिधिक रूपं असतात. (प्रणय कादंबरीचा आजकालचा वाचकवर्ग हा स्त्रिया, विषमलिंगी, कामकरी आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय, व्यावसायिक प्रेक्षक, श्रोतृवर्ग आहे असे समजले जाते). याखेरीज, हा प्रकार मुख्यतः ‘आकर्षकता’ हा मुद्दा पुढे आणतो जिथे इच्छेचे काल्पनिक एकत्रिकरण होते, तिच्या किंवा त्याच्या जातीगत सहभागाची निश्चिती करणारे  ‘सुख’  मिळाल्यामुळे वाचकाला किंवा श्रोत्याला खिळवून ठेवले  जाते  (प्रणयाच्या कल्पनेत नायिकेची महत्त्वपूर्ण असलेली ओळख, काल्पनिक विश्वात प्रवेश, प्रणय-लैंगिक उत्कटता)

साहित्य प्रकार हे संवादातील परस्परसंबंधांना स्थैर्य देणारे असतात. ते अपरिहार्यपणे पारंपरिक अथवा सनातन असले तरी अर्थपूर्णतेसाठी रूढ गोष्टींमध्ये सुधारणा करण्यावर ते अवलंबून असतात. मान्यता आणि पुनर्रचना ह्यांना नियंत्रण आणि पुनरावृत्तीमध्ये बदलून, एका अथवा अनेक मार्गांनी संस्थात्मकरित्या पालन केल्या जाणाऱ्या नियमांमध्ये रूपांतर करुन जतन करण्यासाठी संभाव्य जागा असतात. फ्रेंच नव-अभिजाततावादाचे सूचक नियम आणि देखरेखीखाली तयार केलेली अझटेक काव्य ही याची उदाहरणे आहेत. ते त्यांच्या सुप्तशक्तीमध्ये पारंपरिक देखील आहेत ज्यामध्ये त्यांच्या पुनःस्मरणाने एक प्रकारची स्मृती जागृत करण्याचे कार्य करतात. योबुराचा मौखिक काव्य प्रकार, त्या समूहाच्या मूलभूत अस्तित्वाच्या जडणघडणीच्या भागाच्या आठवणीचा पुरावा देत काळाला ताणून धरते. मिल्टनला महाकाव्य हा प्रकार दोन हजार वर्षे मागे घेऊन जाणारा आहे हे माहीत आहे. पॅराडाइज लॉस्ट होमर आणि व्हर्जील आणि टासोचे स्मरण देते. महाकाव्याची परंपरा ख्रिश्चन पद्धतीने पुनर्लिखित करते. पण उलटपक्षी, खुद्द बायबल हे देखील त्याच्या प्रकारामुळे आणि प्रकारासाठी वाचले गेले आहे. त्यामुळे मिल्टनसाठी ‘बुक ऑफ जॉब’ हे एक महाकाव्य रूपाचे ‘संक्षिप्त रूपक’ आहे (आजच्या काळात बायबलचे अभ्यासक जॉबचा समावेश, प्राचीन नीयर पूर्वेकडील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या वैचारिक लेखन या प्रकारात करतात). साहित्य प्रकार ही जर इतिहासाची रूपं असतील, तर अर्थातच ते, ह्या शेवटच्या उदाहरणात  म्हणल्याप्रमाणे, सामाजिक-ऐतिहासिक संदर्भातली ऐतिहासिक रूपं आहेत. महाकाव्याद्वारे जी व्यापक स्मृती जागृत केली जाते, ती लिखाणाच्या एका विशिष्ट काळात मिल्टनने घेतली आहे.  असा काळ जो नेमकेपणाने महाकाव्य या प्रकारातील  आणि त्याच्या प्रतिमांमधील भव्य, पारंपरिक कल्पकतेला सामावून घेतो.

सामाजिक -ऐतिहासिक व्यवस्था म्हणून साहित्य प्रकार हे खुले, नवीन भाष्यामुळे त्यांच्याबद्दल सजगता बदलल्यामुळे सुधारणारे असतात. (पॅराडाईज लॉस्ट हे प्रजातीय नमुन्यानुसार लिहिले गेले जे त्यावेळचे नवे उदाहरण होते.  हे महाकाव्य होमरच्या इलियाड चा पहिला मूर्तिमंत मतितार्थ नाही तर मिल्टनच्या त्या ऐतिहासिक लिखाणाचे त्याच्या कवितेत आहे तसे स्पष्टीकरण आणि आकलन आहे. त्याचबरोबर  जसजशी त्यांना पुढे जाण्यासाठी आधार देणारी सामाजिक परिस्थिती बदलत जाते तशी साहित्यप्रकार बदलवणारी आहे. (एकोणिसाव्या शतकातील  युरोपात निर्माण झालेल्या मध्यमवर्गीय औद्योगिक वसाहती, धर्मनिरपेक्ष, बूर्ज्वा (भांडवलदार) संस्कृतीला साथ देतात, जी त्याचे अर्थ महाकाव्यात किंवा शौर्यगाथेत शोधण्याऐवजी सामान्य सामाजिक संदर्भात शोधते. महाकाव्य त्यांचा आवेग गमावतात. कादंबरी या एका नव्या जगात एका नवीन एका नवीन प्रकारात उदयास येते: गद्यात्मक (रूक्ष), वास्तवतावादी आणि महाकाव्य नसलेल्या रूपात).

बदलाच्या जटील प्रक्रीयेत, खंड पडणे, आविष्कारामुळे निर्माण झालेल्या स्मृती या गोष्टींमुळे प्रकारातील सातत्य तोलले जात असते. अवांतर मजकूराबरोबर बदलत्या पाठ्यचिकित्सक प्रयोगांमुळे प्रकारविषयक संकल्पना धोक्यात आल्याने किंवा उपलब्ध प्रपाठ जेव्हा लिखाणाच्या वेगळ्या रूपात एकत्र केले गेल्याने (जसे मॉन्टेग्युने ‘निबंधा’चा शोध लावला), जुन्या प्रकारातून सातत्याने नवीन साहित्य प्रकार निर्माण होत असतात. वाचनाचे आणि ऐकण्याचे विविध संदर्भ नवीन आणि बदलत्या प्रकारांची ओळख निर्माण करतात.  त्यामुळे अतिशय थोडे किंवा अजिबातच अधिकृत मान्यता नसलेले लिखाण बदलत्या सामाजिक-ऐतिहासिक दबावामुळे प्रकार म्हणून मान्यता पावतात. (अमेरिकेतील काळ्या गुलामांच्या कथनांना मान्यता मिळाली. जातीयवादाच्या समकालीन भानातून तसेच इतिहासाची ओळख आणि जाणिवेतून आणि वाङ्मयीन सिद्धांताच्या प्रकाशात एका विशिष्ट शैलीचे प्रकारचे म्हणून ते वाचले जाते.) त्याचबरोबरीने ते नवीन साहित्य प्रकार आणि त्यातील बदलाव निर्माण करतात, कारण जाती किंवा समूह त्यांच्या स्थिती आणि त्यांच्या अस्तित्वाचे आकलन पारिभाषित आणि पुनर्पारिभाषित करतात. (अफ्रिकन-अमेरीकन तरुणांच्या सामाजिक अभिव्यक्तीचा, अविष्काराचा प्रकार म्हणून अमेरिकेत रॅप उदयाला आले).

संकटाच्या अनुषंगाने झालेले बदल आणि नवनिर्मिती घडत असताना, ह्यात कोण आणि काय प्रातिनिधित होते, आणि कसे आणि कोणासाठी प्रतिनिधित होते याचा विचार करत आपण इथे साहित्य प्रकारांचे राजकारण हे प्रतिनिधित्वाचे राजकारण म्हणून समजून घेऊ शकतो. बहुतांश वेळा अशा संकटांमध्ये  वस्तुस्थितीच्या आकलनातून आणि आकर्षणातून वर्तमानातल्या, अस्तित्वात असलेल्या प्रकारांमध्ये प्रक्षोभ आणि प्रतिकार निर्माण होतो. त्यामुळे नवीन आणि बदललेला प्रकार नेमकेपणाने ‘जाणून घ्यायला’, आणि अर्थपूर्ण व्हायला मदत करणारा असतो. साहित्य प्रकार, एका अर्थी, भाषेचे ज्ञानदर्शी कार्य करणारे आणि प्रातिनिधिक जाणीव प्राप्त करुन देणारे प्रयत्न असतात. अमेरिकनांच्या ‘नवीन’ जगाला सामोरे जाताना, युरोपियन धर्मप्रसारक आणि वसाहतकारांनी काहीतरी ‘प्रचंड अलौकिक, विलक्षण’ अनुभवले की लास काससने म्हणल्याप्रमाणे, त्यांच्या साहित्य प्रकारांत – कालखंड, नैसर्गिक इतिहास, विधिमान्य, कायदेशीर प्रकृती, वाड्मयीन पत्र – यांची प्रतवारी झाली. ‘त्यांनी जे पाहिले’ त्यातील विरोधी अनुभवांशी त्यांचा मुकाबला झाला.  त्यांच्या  ‘समान’, ‘असमान’, एकसारखे  आणि ‘अन्य’ यामध्ये शपथेवर दिलेल्या साक्षींनी तणाव निर्माण केले. यातून नूतन पद्धतीने केलेल्या वसाहतवादाच्या परिसंवादाचे प्रतिनिधित्व करणारे साहित्य उदयाला आले. समकालीन अमेरीकेशी सामना करताना, टोनी मॉरीसन, काळ्या स्त्री लेखिकांचे, अस्तित्ववाद मांडणाऱ्या कादंबरी ह्या आवश्यक प्रकारामध्ये (मध्यमवर्गीयांमध्ये आणि पुरोगामी जगातील इतर समूहांच्या दृष्टीने असलेले त्याचे ऐतिहासिक कार्य) राजकीयदृष्ट्या परस्परविरोधी असलेले नातं उद्घृत करते. आणि साहित्य प्रकार म्हणून, संवाद नाकारणाऱ्या ज्या प्रातिनिधिक अटीं ती मांडते,  त्यांना आवाहन देणे आवश्यक आहे. (पूर्वी कादंबरी हा साहित्य प्रकाराच्या दृष्टीकोनातून एका विशिष्ट काळाच्या आत्मनिष्ठता मांडणारा आणि जात आणि लिंग विषयक संज्ञांबाबत मर्यादित असणारा प्रकार होता).

कोणताही एक प्रकार हा नेहेमी दुसऱ्या प्रकाराशी संलग्न असतो. साहित्य प्रकारांच्या यंत्रणेत कोणत्याही एका काळात ती इतर तो इतर प्रकारांपेक्षा त्याच्यामध्ये असलेल्या फरकांमुळे ओळखला जातो. वेगळा ठरवला जातो. साहित्य प्रकारांच्या राजकारणाचे प्रश्न सरळ सरळ यातूनच निर्माण होतात. बाखतिनच्या मतानुसार,  ‘वाङ्मयीन प्रकार’ हा त्याच्या तात्कालिकपणा आणि दैनंदिनपणाच्या तुलनेतला विस्तार आणि जटीलता ह्या घटकांमुळे त्याच्याबरोबर, प्राथमिक प्रकारांपेक्षा अनुषांगिक प्रकारांच्या वाङ्मयाविषयी एक ठरावीक गृहीतक घेऊन येतो.  हे प्राथमिक मौखिक प्रकार, वाङ्मयाशी आणि त्याच्या प्रकारांशी असलेले संबंध , किंबहुना, सांस्कृतिकदृष्ट्या बदलणारे आणि आकलन करण्याच्या खूप वेगळ्या संज्ञेशी जोडलेले आहेत. उदाहरणार्थ, मौखिक काव्यप्रकार हा बऱ्याचदा समूहावर अवलंबून असतो आणि समूहाच्या बोली शैलीशी असलेल्या  संबंधांची ओळख दर्शवणारा असतो. त्यामुळे ‘जटील आणि नित्यनियमाचा ‘ किंवा ‘तात्कालिक आणि पूर्वापार चालत आलेला’  असा विरोधाभास हानीकारकरित्या अप्रासंगिक ठरतो. खरोखरच, इथे ‘जे लिखित स्वरुपातील आहे ते वाङ्मय’ ही वाङ्मयाची संकल्पना असणं हाच समस्येचा एक भाग आहे. याला विरोध म्हणून केनियन कादंबरीकार न्गुगी वा थियाँग याने आफ्रीकन  संस्कृतीतील, काव्यासहित सर्व तोंडी बोलीला ‘मौखिक’ ही संज्ञा सुचवली. पण आपल्याला नायजेरीयन लेखक अमॉस टुटुओला या लेखकासारख्यांच्या कथांकडे पाहताना सांस्कृतिक काळजी देखील घ्यायला हवी. त्याच्या कलाकृतीमध्ये ‘लेखी मौखिकता’ निर्माण केली आहे जी इंग्रजी शब्द वापरून  तयार केलेली योरुबा बोली आहे. यामध्ये म्हणी, कूटप्रश्न, गोष्टी आणि गाणी अशा प्रकारे आहेत की ज्यामुळे ते नुसतेच पाश्चात्य साहित्याला ‘विकसित करणारे’ नसून,  त्या कामाकडे एक ‘कादंबरी’ म्हणूनही पाहता येईल. परंतु, जे साहित्य प्रकाराच्या ओळखीविषयीच्या गृहीतकासंबंधी आणि प्रथमतः आणि मुख्यतः  प्राथमिक/ अनुषांगिक वर्चस्व असलेल्या पाठचिकित्सेशी तणाव निर्माण करणारे आहे. असा तणाव समजून घेणे, वाचणे हे सध्याच्या जागतिक वाङ्मयाच्या , पाश्चात्य रूपाच्या प्रचंड प्रभावाखाली असलेल्या परिस्थितीतील लिखाणाची सत्यासत्यता पाहणाऱ्या आणि नवीन प्रकारामध्ये सामावणाऱ्या आणि विरोधाभासी वाटणाऱ्या इतर व्याख्यांच्या निर्मिती संघर्षाच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे.

साहित्य प्रकारांचे राजकारण, ते जे भेदभाव करते त्यावर आणि ह्या भेदभावाच्या आधारावर निर्माण होणाऱ्या उच्चनीचतेवर अवलंबून असते:  वरिष्ठ आणि कनिष्ठ,  धार्मिक आणि निधर्मी,  गद्य आणि पद्य, वाङ्मयीन आणि वाङ्मयीन नसलेले प्रकार. अशा भेदाभेदाला आवाहन करणे आणि त्यात बदल घडवून आणणे यासाठी आकलनामध्ये आणि प्रकार ठरवताना – मुख्यत्वे वाङ्मयाची ‘ओळखली जाणारी’ यापेक्षा खरोखर परिमाण करणारी आणि खरी भाषा कोणती आहे याचा विचार करत  विविध पातळीवर बदल घडणे आवश्यक असते. कादंबरीची रचना एक सशक्त मध्यमवर्ग अशा प्रकारासहित निर्माण करतो जो, केवळ विनोद अथवा उपहासात्मक वाटेल अशा रीतीने, स्त्री आणि पुरुषांच्या प्रत्यक्ष सामाजिक आयुष्याबद्दलच्या पारंपरिक प्रकारांनी मांडलेल्या मतांविषयी अनादर दाखवत तिच्या जगाच्या व्याख्या मांडू इच्छिते. (वरिष्ठ साहित्य प्रकार हे जागतिक, रोजच्या जगाच्या अकस्मिततेचे अमूर्तीकरण केलेल्या रूपात सत्यकथन करणारे असतात असे मानले जाते.). रोजनिशी, घरगुती चोपड्या, वैयक्तिक कथनं ही सध्याच्या स्त्रीवादी सिद्धांताला आणि आचरणाला मान्यता देण्याबद्दल  साशंक असलेल्या , अस्तित्वात असलेल्या लिंग सिद्धांताच्या गृहीतकाला प्रश्न विचारणाऱ्या प्रकारांची उदाहरणे आहेत. (वस्तुनिष्ठ आणि काल्पनिक, सार्वजनिक आणि खाजगी, राजकीय आणि वैयक्तिक असे फरक)

स्त्रियांच्या आयुष्यासंबंधी केलेले विविध रूपातील लिखाण हे कनिष्ठ प्रकारचे मानले जाते कारण  ‘स्त्री-त्व’. कादंबरी ही कनिष्ठ प्रकारचे कारण तिचे संबंध (कनिष्ठ मध्यमवर्गीत आणि कष्टकरी वर्ग आणि मुख्यतः स्त्रियांचा समावेश असलेला लक्षात घेता) आणि ह्या संबंधामुळे तिच्या निर्मितीचे ‘नवीन सार्वजनिक’ असलेले व्यावसायिक  स्वरूप, (जे अनेकदा लोकतांत्रिक म्हणून हिणवले जाते. ‘लोकं अत्यंत मूर्ख आहेत’ असं फ्लोबेरने संबोधले होते, ज्याचे स्वतःचे साहित्य प्रकारांच्या उच्च आणि कनिष्ठ फरकाच्या जडणघडणीत एक महत्त्वाची घटना आहे.  एका बाजूला, ‘वाङ्मयीन’ अथवा ‘गंभीर’ कादंबरी तर दुसऱ्या बाजूला ‘लोकप्रिय’ किंवा ‘ बहुजनांना आवडणारी काल्पनिक कथा कादंबरी. असेही की, साहित्य प्रकाराच्या निर्मितीचे बाजारातील वर्गीकरण  – प्रेम, रहस्य, विज्ञान कथा, गुन्हे, सर्वाधिक खपाचे (सगळी औषधविक्री दुकानातील खणांची नावे) होऊ शकते. या फरकाला आधिकाधिक मान्यता दिली गेली आहे वाङ्मयाच्या शैक्षणिक संस्थेमुळे जिने अनेक कलाकृतींचा  तपशील तयार केला आहे आणि दर्जा ठरवला  आहे.  दरम्यान, बाजारातील ग्राहकानुसार गठ्ठ्याने केलेल्या सांस्कृतिक निर्मितीने ते अधिक महत्त्वाचे ठरले आहे. दूरचित्रवाणीवरील मान्यता मिळालेल्या – अपेक्षित असलेल्या प्रकारातील सूत्रसंचालक: सिटकॉम, बातम्या, खेळाविषयक कार्यक्रम, रिअ‍ॅलीटी कार्यक्रम, टॉक शोज यांमधून हे सर्वाधिकपणे स्पष्ट होते. अशा प्रकारांचा प्रभाव हा एका अर्थी  श्रेणीगत विभागणी व्यवस्थेचा भाग आहे. वरिष्ठ प्रकारातील कलाकृती या संपूर्णतः ‘वैयक्तिक कलाकृती’ असतात. आणि वस्तुस्थिती अशी आहे की  ‘मनोरंजनाचं व्यवसायक्षेत्र’ हे  मोजक्या साच्याभोवती निर्मिती करुन जास्तीतजास्त फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करत असतं. ठरावीक साच्यात नसलेले कार्यक्रम, जे प्रकारांतील भेदाभेद मोडतात अथवा ओलांडतात, हे फार लगेच , तात्काळ खळबळ माजवणाऱ्या आणि राजकीय दृष्ट्या संवेदनाशील ठरतात. (माहितीपट आणि नाटक वेगळे ठेवण्याची गरज भासणे, त्यांच्यात गल्लत होत असल्यामुळे त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या विवादांचे उदाहरण आहे.)

साहित्य प्रकारांच्या विभागणीची ही ताकद सिद्धांतनाला आणि ज्या लिखाणाचा अर्थ पूर्वापार अपेक्षांच्या ताकदीमुळे आणि त्यांनी कब्जा केल्यामुळे तकलादू ठरवले जाते, अशा लेखनाच्या कृतीला एकाचवेळी आधार देते. ‘आता कोणतेही एक पुस्तक कोणत्याही एका प्रकारचे असत नाही, तर प्रत्येक पुस्तक केवळ वाङ्मयाला साद घालते’ असे फ्रेंच लेखक आणि समीक्षक Maurice Blanchot म्हणतो. किंवा, खुद्द वाङ्मयाचाच प्रकार म्हणून  त्याग करताना, वर्क टू टेक्स्ट असा बदल करणे हा एक मुद्दा आहे.  जिथे साहित्यिक कामाशी साधर्म्य वाटेल, ते साहित्य प्रकारांच्या चौकटीमध्ये वाचनीय वाटले की ते त्याच्या वाचकाचे प्रतिनिधित्व करण्याची अट पूर्ण करते. ह्या बंधनांना ओलांडून जेव्हा लिखाण यापेक्षा वेगळे असेल, तेव्हा ते वाचकाच्या लिखाणामधील प्रतिनिधित्वाला धक्का देते. जिथे वाचकाच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्णत्वाला नेत साहित्य हे विलासाच्या जवळ जाते. तिथे दुसऱ्या बाजूला, साहित्य बौद्धिक उत्तेजना देणारे, ठामपणापासून बाजूला जात अनपेक्षित व्यक्त होणारे असेल, तर त्यामध्ये वाचक साहित्य प्रकाराच्या बाहेर फेकला जातो.  पण मग, अटळपणे, एका नवीन प्रकारामध्ये, ज्यामध्ये लिखाण एखाद्या भाषेतील विषयातील लिखाणाची कृती बनते अशा एका नवीन प्रकारामध्ये निर्मित होते. असा एक प्रकार ज्याला मलार्मे आणि जॉईस यांचा इतिहास आहे.  तिथपासून ते आजचे आणि खुद्द ब्लॅनचोदचे लिखाण किंवा जॅकस डेरीडाचे लिखाण – जे प्रकाराच्या नियमांना आणि बंधनांना अस्वस्थ करण्याइतक्या मर्यादेपर्यंत काटेकोरपणे पाळतात.  हा तो नवीन साहित्य प्रकार आहे जो अब्देलकबीर खातिबीच्या ‘अमोर बायलिंग्यु’ या पुस्तकात  आढळतो – जो भाषेला ‘द्विभाषा’ असा नाद प्राप्त करुन देतो. ज्यामध्ये एक भाषा दुसरीला सतत छेद देत राहते, जे संवादात्मक नाही ते आजमावत आणि त्याला नष्ट करत राहते. या सारखेच, हेलेन सिक्सस ने मांडलेले  ‘द रायटींग  फ्रॉम द बॉडी’ हे देखील या सारख्याच विषय आणि भाषेच्या लिखाणातील केंद्रबिंदूने बांधलेले आहे हे समजून येईल.

ही शेवटची काही उदाहरणे, साहित्य प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञांना विरोध करण्याच्या संकल्पना – ज्या एक प्रकारे आपल्याला Le Texte म्हणजे साहित्य प्रकार असं विवरण करणाऱ्या ठरावीक फ्रेंच सैद्धांतिक घडामोडीच्या पलिकडे नेतात –  आजच्या काळात किती गरजेच्या आहेत याचे महत्त्व अधोरेखीत करतात.

खातिबीच्या पुस्तकात- एकीकडे एका भाषेमध्ये शोध घेणारी आणि त्याचबरोबर विविध भाषांमध्ये, राष्ट्रांमध्ये, इतिहासांमध्ये, लिंगांमध्ये : फ्रेंच आणि अरेबिक,  फ्रान्स आणि मोरोक्को, वसाहत करणारे आणि वसाहती, स्त्री आणि पुरुष, यांचे वेड्यावाकड्या  कथांत अवघड कथानकात, एकमेकांत संवाद साधणाऱ्या लिखाणात अन्वेषण करणारी एक जागा या अर्थाने  ‘द्वैभाषिकत्व’ आहे. सिक्ससचे, एखादी कादंबरी अथवा नाटक अथवा निबंध अथवा संवाद यातील लेखन व्यवहार स्त्री-वादी लिखाणाची ओळख आणि निर्मितीमूल्य धारण करतात. आणि तिचं साहित्य लिंगविषयक व्यापक, सामान्य मांडणीला छेद देणारं असल्याने, तिच्या कामाच्या संदर्भात, त्या प्रकारविषयी संज्ञा अडचणीच्या, अशक्य ठरतात (आठवा : सामायिक भाषाव्युत्पत्ती). लिंगभेदाचे समकालीन राजकारण प्रस्थापित विभागणीच्या आखलेल्या रेषांना पार करुन जाते. विसंगतपणे प्रकारांना एकत्र केल्यामुळे साहित्याला  ‘सीमारेषेवर’ ठेवते. यातील वास्तव आणि त्याचे रूपक हे कदाचित इतर कुठेच इतके उत्तमरीत्या मांडलेले नाही, जितके चिकानोच्या समकालीन लेखनातील, त्याच्या सीमारेषांना एकत्र करणाऱ्या कथानकात (रोनाल्डो हिनोहोसा) आणि सादरीकरणात (कॅरोलिना गोमेझ-पेना)  आणि सौदर्यदृष्टीत (क्रीटीसीझम इन द बॉर्डरलॅंडस हे या विषयातले आजच्या काळात केल्या गेलेल्या कामामधील एक महत्त्वाचे नाव आहे) मांडलेले आहे.

द सॅटॅनीक व्हर्सेस  या पुस्तकाच्या आणि लेखकाच्या बंदीवरील फतवा, आदेश जारी केल्याच्या एक वर्षाच्या आसपासच्या कालावधीत, सलमान रश्दी यांनी द सॅटॅनीक व्हर्सेस  चे प्रकरण हे  कदाचित ‘वाङ्मयाच्या इतिहासातील साहित्यप्रकार निवडण्यात केलेली सगळ्यात मोठी चूक आहे’ असं म्हणलं आहे.

ते काल्पनिक लिखाणाच्या काल्पनिकतेवर  (फिक्शनच्या काल्पनिकतेविषयी) आणि त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाराकडे कानाडोळा केल्याच्या चुकीवर आणि त्याला एक कादंबरी म्हणून न वाचता एक धर्मविरोधी वार्तापत्र म्हणून वाचलं गेलं यावर भर देत होते. पण मग द सॅटॅनीक व्हर्सेस चे लिखाण साहित्य प्रकारविषयक रूढ मतांना स्वीकारण्याबद्दल विरोधाभास निर्माण करते, त्यांच्यासकट जे ती कादंबरी ‘केवळ एक कादंबरी’ म्हणूनच पाहतात. प्रकारांच्या विभागणीवर जहालरीतीने टिपण्णी करत, ती बदलासाठी एक प्रेरणा म्हणून तिच्या व्यामिश्र असण्याचा दावा करते. कनिष्ठता प्रजनित करण्यात (मॉनग्रेलायझेशन) आनंद मानते आणि विशुद्ध दोषमुक्त होण्याची भीती बाळगते. मिश्रण करत , उसनवारी केलेल्या कल्पनांची भेसळ करत, थोडे इकडचे आणि थोडे तिकडचे करतच जगात नाविन्य निर्माण होते. जागतिक वाङ्मयामधील ‘आज’ च्या अभ्यासाची संकल्पना ही व्यामिश्रतेमध्ये सामावलेली आहे. यात, केवळ तौलनिकरीत्या आणि जातीगत दृष्टीकोनातून न वाचता, ह्या इकडची ही कादंबरी त्यानंतरची तिकडची असं,  ठरावीक कायदेशीर, शिस्तबद्द, आखीव ओऴखीच्या विरोधात स्थलांतरितपणे,  भेसळ करत, एकमेकांत गुंतलेलं लिखाण वाचणं सामावलेलं आहे. राजकीय दृष्ट्या साहित्य प्रकारांकडे पाहणे म्हणजे अशाप्रकारे केवळ स्थलांतरीताच्या नजरेतून वाचणे,  जी जागतिक साहित्याची अजून एक व्याख्या आहे, त्याच्या अभ्यासात नाविन्य आहे.

दी पॉलिटिक्स ऑफ जॉनर, लेखक: स्टीफन हीथ हा मुळ इंग्रजी लेख डिबेटिंग वर्ल्ड लिटरेचर (संपादक: ख्रिस्तोफर प्रेंडरगास्ट), वर्सो: लंडन आणि न्युयॉर्क, २००४ या पुस्तकात प्रकाशित झाला आहे.

स्टीफन हीथ हे जिजस कॉलेज, केंब्रिज युनिविर्सिटी येथे प्रोफेसर आहेत.

आरती रानडे  यांनी बायोमेडीकल क्षेत्रात डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेट केले असून त्या सध्या अमेरिकेत स्टेम सेल्स आणि लिव्हर मॉडेल्स या विषयात संशोधन करत आहेत. फोटोग्राफी आणि डूडलींग बरोबरच त्यांना हायकिंग, रनिंग आणि सायकलींगची आवड आहे.


One comment on “साहित्य प्रकारांचे राजकारण: स्टीफन हीथ/आरती रानडे

  1. सरल

    भाषांतर पुन्हा वाचून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *