Skip to content Skip to footer

पाहण्यापासून जाणिवेपर्यंत 

Discover An Author

  • समकालीन भारतीय कलाकार

    केतन साठ्ये हे समकालीन भारतीय कलाकार असून, पॅरिस (फ्रान्स) आणि पुणे (भारत) ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी २०१३ साली पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून ललित कलेमध्ये पदविका प्राप्त केली . २०१८ साली त्यांनी अलायन्स फ्रांसेज़ द पुणे येथे फ्रेंच भाषेचे बी-१ स्तरापर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पॅरिसमधील कला वर्तुळात संवाद साधण्यासाठी स्वतःची क्षमता वाढवली. त्यांनी २०२० साली कॅथलिक  युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस येथे कला-इतिहासाचे अध्ययन केले, आणि २०२३मध्ये École des Beaux-Arts, Parisच्या Herodotus Programmeमध्ये सहभाग घेतला. सध्या ते पॅरिसमधील Atelier Contrepoint (17) येथे कार्यरत आहेत. २०२३ ते २०२५दरम्यान पॅरिसमधील चार गॅलरींमध्ये त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या असून, त्यांच्या कलाकृतींमध्ये वैयक्तिक अनुभव, स्मृती आणि रूप ह्यांविषयीचे सूक्ष्म चिंतन-शोधन उमटते. भारतीय परंपरेवर आधारित रंगभान व जीवनाचे तत्त्वज्ञान ह्यांची सांगड घालताना त्यांचा दृष्टिकोन वैश्विक आणि प्रयोगशील राहिलेला आहे. त्यांना रॉयल अकेडमी ऑफ फाईन आर्ट्स, ब्रुसेल्स, बेल्जियम येथे २०२६ ह्या वर्षातील एक महिन्यासाठी अभ्यागत / अतिथी कलाकार म्हणून सहयोग देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

    Ketan Sathaye is a contemporary Indian artist currently working between Paris (France) and Pune (India). He completed his Diploma in Fine Arts from Abhinav Kala Mahavidyalaya, Pune, in 2013. In 2018, he strengthened his artistic dialogue in Paris by completing the French Language B1 Level at Alliance Française de Pune. He later pursued studies in Art History at the Catholic University of Paris in 2020 and participated in the Herodotus Programme at École des Beaux-Arts, Paris, in 2023. He is presently associated with Atelier Contrepoint (17) in Paris. Between 2023 and 2025, his works were exhibited across four galleries in Paris. His artistic practice reflects a nuanced exploration of personal experiences, memories, and form. Rooted in the Indian aesthetic tradition, his approach interweaves a deep sensitivity to color with a philosophical understanding of life, while remaining universal and experimental in nature. He is invited as a guest artist to work for a month at the Royal Academy of Fine Arts of Brussels, Belgium in 2026.

     

माझ्यासाठी कला ही केवळ चित्र काढण्याची किंवा रंगवण्याची क्रिया नाही, तर स्वतःला समजून घेण्याचे एक माध्यम आहे. आपल्या रोजच्या जगण्यात अनेक गोष्टी घडत असतात. आपण त्या पाहतो, अनुभवतो आणि त्यातून पुढे जातो. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे शांतपणे आणि पुन्हा पुन्हा पाहू लागतो, तेव्हा तिच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलू लागते. याच निरीक्षणातून माझ्या कलाप्रक्रियेची सुरुवात होते.

रेखाटन हे माझ्यासाठी अभिव्यक्तीचे एक सहज आणि जलद माध्यम आहे. मनात एखादा विचार किंवा भावना निर्माण झाली की ती लगेच कागदावर उतरवता येते. त्यासाठी फारशा गोष्टींची आवश्यकता नसते. मला वाटते, साधेपणा ही माझ्यासाठी निवड नसून गरज आहे. चित्र सुंदर दिसण्यापेक्षा ते मला काय जाणवून देते आणि कोणते प्रश्न विचारायला लावते, हे अधिक महत्त्वाचे आहे.

कामात प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. एखाद्या घटनेकडे वारंवार पाहणे, तिचे निरीक्षण करणे आणि तिच्याशी अधिक जवळीक निर्माण होणे, या सगळ्या गोष्टींतून माझी त्या घटनेबद्दलची समज हळूहळू बदलत जाते. सुरुवातीला जे केवळ एक दृश्य किंवा साधा अनुभव वाटतो, त्यातून पुढे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या प्रक्रियेत इतर जीवांविषयी, त्यांच्या अनुभवांविषयी आणि त्यांच्या अस्तित्वाविषयी सहवेदना निर्माण होऊ लागते. ही सहवेदना माझ्या विचारांमध्ये बदल घडवते आणि त्या बदलांचा परिणाम चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या स्वरूपावरही होतो.

म्हणूनच कला ही एखाद्या ठरावीक कल्पनेला चित्ररूप देण्यापुरती मर्यादित नाही. ती सतत बदलणारी आणि शिकवत राहणारी प्रक्रिया आहे. निरीक्षणातून प्रश्न निर्माण होतात, प्रश्नांतून समज बदलते आणि त्या समजेतून अभिव्यक्ती बदलत जाते.

या प्रवासात हळूहळू स्वतःच्या विचारांकडे, भावनांकडे आणि स्वतःच्या अस्तित्वाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळते.

या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश केवळ एखादे चित्र निर्माण करणे नसून, स्वतःला अधिक खोलवर समजून घेणे हा आहे. माझ्यासाठी कला ही स्वतःच्या आत जाण्याची, स्वतःला प्रश्न विचारण्याची आणि स्वतःच्या जाणिवेपर्यंत पोहोचण्याची एक साधना आहे. मात्र, ही प्रक्रिया केवळ माझ्यापुरती मर्यादित राहू नये, असे मला वाटते. माझे काम पाहणाऱ्या व्यक्तीला त्यातून स्वतःच्या आयुष्याकडे, विचारांकडे आणि अनुभवांकडे नव्याने पाहावेसे वाटते का? एखादे चित्र पाहताना त्यांना स्वतःच्या अनुभवातील काही गोष्टी आठवतात का? कदाचित एखादा प्रश्न पाहणाऱ्यांच्याही मनात निर्माण होतो का? कारण शेवटी, प्रश्न विचारायचे की नाही, त्यांचा शोध घ्यायचा की नाही, हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे. माझ्यासाठी कलेचे महत्त्व केवळ ती काय दाखवते यात नसून, ती आपल्याला स्वतःकडे पाहण्यास प्रवृत्त करते का, यात आहे.

शेवटी, मला असे वाटते की एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे आणि ती खरोखर समजून घेणे या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. आपण एखाद्या गोष्टीकडे किती वेळा पाहतो, यापेक्षा प्रत्येक वेळी पाहताना आपल्यात काय बदलत असते, हे अधिक महत्त्वाचे असू शकते.

मग प्रश्न असा उरतो की, आपण जे पाहतो त्यातून जग समजून घेत असतो, की त्या पाहण्याच्या प्रक्रियेत नकळत स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो?

प्रक्रिया 1 - दैनंदिन दृष्टिकोनाचे अवलोकन

अगोदर लक्षात न आलेले दृश्य आणि भावनिक अनुभव उघड करण्यासाठी रेखाटन करणे पुरेसे आहे का?

आपल्या आजूबाजूला सतत अनेक गोष्टी घडत असतात. काही अगदी साध्या, तर काही अस्वस्थ करणाऱ्या. अनेकदा आपण त्यांच्याकडे पाहतो, पण त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. लोकांचे वागणे, त्यांच्या प्रतिक्रिया, संवाद, संघर्ष किंवा शब्दांशिवाय व्यक्त होणाऱ्या भावना या माझ्या निरीक्षणाचा भाग बनतात. अशा रोजच्या क्षणांमध्ये मला काहीतरी शोधण्यासारखे वाटते.

Better not to speak,
Water color and Ink on Paper, 38 x 28 cm, 2013

माझे निरीक्षण केवळ मानवी अनुभवांपुरते मर्यादित नाही. प्राण्यांचे वर्तन आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी असलेले त्यांचे नाते यांचाही मी विचार करतो. त्यांच्या कृती, भीती, गरजा आणि जगण्याच्या पद्धती मला सर्व सजीवांच्या अस्तित्वातील काही समान धागे शोधायला प्रवृत्त करतात. माणूस असो किंवा इतर कोणताही सजीव, प्रत्येकाच्या जगण्यात काही अनुभव, संघर्ष आणि प्रतिक्रिया असतात. त्यांच्याकडे पाहताना माझ्या मनात एक प्रकारची जवळीक आणि कुतूहल निर्माण होते.

Sketches from a daily diary,
Water color & pen on Paper, 14.8 x 21 cm (each), 2013

Sketches from a daily diary,
Water color & pen on Paper, 14.8 x 21 cm (each), 2013

विशेषतः जेव्हा मी सजीवांचे कष्ट, एकटेपणा किंवा दुःख पाहतो, तेव्हा काही प्रश्न मनात निर्माण होतात. नक्की काय घडत आहे? हे का घडत आहे? एखादा सजीव वेदना आणि दुःखाचा अनुभव कसा घेत असेल? त्याच्या अनुभवाची जाणीव आपल्याला कितपत होऊ शकते? या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत, पण ते माझ्या निरीक्षणाला अधिक खोलवर घेऊन जातात. हळूहळू हेच प्रश्न माझ्या कलाकृतींचा आधार बनतात.

Crucifixion of the emptiness
Acrylic Color on Paper, 56 x 76 cm, 2016

Sketches from a daily diary,
Pen on Paper, 14.8 x 21 cm (each), 2014

Sketches from a daily diary,
Pen on Paper, 14.8 x 21 cm (each), 2014

चित्रकला आणि विशेषतः रेखाटनाच्या माध्यमातून मी जीवनातील अशा छोट्या क्षणांचा, भावनांचा आणि आंतरिक अनुभवांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. रेखाटन हे एखादे दृश्य किंवा मनात निर्माण झालेली भावना त्वरित कागदावर आणण्याचे माध्यम आहे. मात्र, रेखाटन करताना केवळ समोर दिसणारे दृश्य कागदावर उतरते का, की त्या दृश्याकडे पाहताना माझ्या मनात निर्माण झालेल्या जाणिवाही त्यातून व्यक्त होतात?

दैनंदिन जीवनाचे निरीक्षण म्हणजे केवळ आजूबाजूला काय घडत आहे हे पाहणे नाही, तर त्या घटनांमागील अनुभव आणि अस्तित्व समजून घेण्याचा प्रयत्न आहे.

Clockwise: It’s her choice; Don’t worry; Violence 

?

कदाचित एखाद्या साध्या दृश्यातही असे काही दडलेले असते, जे पहिल्या नजरेत दिसत नाही. मग ते शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा पाहणे पुरेसे आहे का, की त्या अनुभवाशी आणखी काही प्रकारे जोडले जाणे आवश्यक आहे?

प्रक्रिया 2 - नाव देण्यापूर्वीचे रेखाटन

संकल्पनात्मक ओळखीच्या आधी दृश्य अनुभवाची नोंद केली जाऊ शकते का?

एखादी गोष्ट पाहताना तिचे स्पष्ट आकलन होण्यापूर्वीच रंग, आकार आणि हालचाली आपल्यात काही संवेदना निर्माण करतात. सुरुवातीला त्या केवळ भावना किंवा दृश्य ठसे असू शकतात. हळूहळू त्यांना ओळख आणि अर्थ प्राप्त होतो.

माझ्या रेखाटन प्रक्रियेत पाहणे आणि समजून घेणे यांमधील हा क्षण महत्त्वाचा आहे. कधी दोन वेगवेगळे आकार, आठवणी किंवा दृश्य अनुभव एकत्र येऊन एक नवीन प्रतिमा तयार करतात. या प्रक्रियेत निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान एकमेकांत मिसळतात.

Omitted Creativity of the Creator
Acrylic on Paper, 76 x 112 cm, 2015

Together,
Water Color on Paper, 29.7 x 21 cm, 2015

Blind Creator,
Acrylic on Paper, 29.7 x 42 cm, 2015

Blind Creator,
Acrylic on Paper, 29.7 x 42 cm, 2015

Everyday,
Acrylic on Paper, 122 x 92 cm, 2015

संघर्ष,
Pen on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Search,
Ink on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Search,
Ink on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Homme,
Ball Pen on Paper, 21 x 29.7 cm, 2020

Flow and Merge,
Ball Pen on Paper, 21 x 29.7 cm, 2020

Flow and Merge,
Ink on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Flow and Merge,
Ink on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Process of Understanding I,
Acrylic on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Process of Understanding II,
Ink & Pen on Paper, 14.8 x 21 cm, 2016

Process of Understanding II,
Ink & Pen on Paper, 14.8 x 21 cm, 2016

?

मग एखाद्या प्रतिमेला अर्थ मिळाल्यानंतरच आपण तिला समजून घेतो, की तिचा अनुभव त्याआधीच आपल्यात सुरू झालेला असतो?

प्रक्रिया 3 - निरीक्षक म्हणून शरीर

आपल्या पाच ज्ञानेंद्रियांद्वारे सभोवतालच्या जगाचे आकलन कसे घडते?

शरीर हे केवळ भौतिक अस्तित्व नसून जगाचा अनुभव घेण्याचे माध्यम आहे. हालचाल, स्पर्श, आवाज आणि इतर संवेदनांमधून आपण सभोवतालच्या जगाशी जोडले जातो. त्याच वेळी विचार, आठवणी आणि भावना आपल्या बाह्य अनुभवांकडे पाहण्याची दृष्टी बदलतात. एकाच घटनेचा अनुभव प्रत्येक वेळी सारखा असेलच असे नाही. आपल्या मानसिक स्थितीनुसार त्याचा अर्थ बदलू शकतो. कलाप्रक्रियेत या संवेदनांकडे अधिक सजगतेने लक्ष देणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनुभवांचे निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरते. 

सवदना (माध्यम शरीर),
Pen & Charcoal on Paper, 21 x 29.7 cm, 2019, 2020

सवदना (माध्यम शरीर),
Pen & Charcoal on Paper, 21 x 29.7 cm, 2019, 2020

निरीक्षक,
Pen on Paper, 14.8 x 21 cm, 2016

निरीक्षण व विश्लषण
Water Color on Paper, 21 x 29.7 cm, 2016

निरीक्षण व विश्लषण
Water Color on Paper, 21 x 29.7 cm, 2016

निरीक्षण व विश्लषण
Water Color & Ink on Paper, 21 x 29.7 cm (each), 2016

निरीक्षण व विश्लषण
Water Color & Ink on Paper, 21 x 29.7 cm (each), 2016

The (Inside) Night Watch,
Pen on Paper, 29.7 x 42 cm, 2025

?

मग आपण जगाचे निरीक्षण करतो, की आपल्या आंतरिक जाणिवांमधूनच जगाला समजून घेत असतो?

प्रक्रिया 4 - स्मृती आणि दृष्टी

प्रत्यक्ष पाहिलेली प्रतिमा आणि स्मृतीतून पुन्हा उभी राहिलेली प्रतिमा यांत काय फरक असतो?

प्रत्यक्ष पाहिलेली प्रतिमा आणि स्मृतीतील प्रतिमा वेगवेगळ्या असतात. स्मृती वास्तवाची जशीच्या तशी पुनरावृत्ती करत नाही. भावना, अनुभव आणि कल्पनाशक्तीमुळे ती बदलत जाते. त्यामुळे आठवणीत राहिलेले दृश्य हे केवळ पाहिलेल्या गोष्टीचे प्रतिबिंब राहत नाही, तर त्याला वैयक्तिक अर्थ प्राप्त होतो. कलाप्रक्रियेत स्मृतीचा माझ्या पाहण्याच्या आणि निर्मितीच्या दृष्टिकोनावर होणारा परिणाम महत्त्वाचा आहे. आकार, रंग आणि रचना यांमधून प्रत्यक्ष पाहिलेले, आठवलेले आणि अनुभवलेले यांचा परस्परसंवाद व्यक्त होतो. 

भूक,
Photograph, 2024

Pen on Paper, 14.8 X 21, 2014

Water Color on Paper, 56 X 76, 2015

In and Through / Up is Down,
Pencil & Pen on Paper, 14.8 x 21 cm, 2022

As It Is,
Pen on Paper, 10 x 13 cm (each), 2021

The Dance of Death,
Pen on Paper, 14 x 14 cm (each), 2026

The Dance of Death,
Pen on Paper, 14 x 14 cm (each), 2026

The Dance of Death,
Acrylic on Paper, 21 x 29.7 cm, 2026

?

आपल्या स्मृतीतील घटना खरोखर असतात,  की काळ आणि अनुभवांनी बदललेली त्याची एक नवीन प्रतिमा असते?

प्रक्रिया 5 - दृश्याची शांतता

स्थिरतेतून निरीक्षणाची नवी जाणीव निर्माण होऊ शकते का?

माझ्यासाठी दृश्य शांतता तेव्हा सुरू होते, जेव्हा मी एखादी गोष्ट पाहताना तिचा अर्थ लगेच समजून घेण्याची किंवा तिच्याबद्दल निष्कर्ष काढण्याची घाई करत नाही. अशा शांत क्षणांत  बदल, सूक्ष्म हालचाली, रिकामी जागा आणि आकारांमधील संबंध यांसारखे बारकावे जाणवू लागतात. स्थिरतेच्या या सरावाद्वारे, रेखाटन करणे ही केवळ प्रतिमा निर्माण करण्याची क्रिया न राहता, एक शोधप्रक्रिया बनते. ही दृश्य शांतता चिंतनासाठी एक अवकाश निर्माण करते, जिथे बाह्य अनुभव आणि आंतरिक जाणीव यांचा संगम होतो. यातून मला उमजते की, पाहणे ही केवळ डोळ्यांची क्रिया नसून, ती एकाग्रता, संयम आणि वर्तमानातील उपस्थिती यांचाही भाग आहे. यामुळे माझी कलात्मक अभिव्यक्ती घाईघाईने काढलेल्या निष्कर्षांतून नव्हे, तर शांत निरीक्षणातून विकसित होऊ लागते.

कधी कधी पाहण्याची प्रक्रिया आपल्याला नकळत अशा ठिकाणी घेऊन जाते,
जिथे पाहणारा आणि पाहिले जाणारे यांच्यातील अंतरही अस्पष्ट होऊ लागते.

Untitled II,
Acrylic on Paper, 56 x 76 cm (left), 2019
Acrylic on Paper, 10 x 13 cm (right), 2022

Untitled III,
Acrylic on Paper, 56 x 76 cm (left), 2019
Pen on Paper, 14.8 x 21 cm (right), 2022

?

मग खरोखर पाहण्यासाठी आपल्याला काही वेळ निरीक्षण करण्याची गरज असते का?

Post Tags

Leave a comment