[mar-block]
लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना
१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.
२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे अॉनलाइन जर्नल अाहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.
३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.
४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.
५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.
६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.
७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.
८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.
९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.
१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.
११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.
१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.
१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.
१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.
[/mar-block]
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
2 Comments
Varada V. Pandit
Is there any limitation of words?
adminhakara
Thank you for writing. There is not word limit.