आवृत्ती ६ : फॉर्म प्ले / Edition 6 : Form Play
January 2019
आवृत्ती ६ : फॉर्म प्ले / Edition 6 : Form Play
हाकारा । hākārā-ची ६वी आवृत्ती ‘रूप-खेळा’च्या संकल्पना-निर्मिती-व्यवहाराला समोर ठेवून मांडली आहे. भवतालातून येणारे अनुभव, राजकीय–आर्थिक रचना, सांस्कृतिक व्यवहार ह्यांच्या परस्परसंबंधांतून कलेची रूपं कशी येतात आणि त्यांतला आशय हा देखील ही रूपं साकारण्यात कोणती भूमिका निभावत असतो, हे या आवृत्तीतील साहित्यातून आणि कलाकृतींतून दर्शवले गेले आहे. रूपांचा आविष्कार हा कलाकाराच्या मनातून, विचारातून, कौशल्यातून तर होत असतोच, पण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, तिथल्या अविरत पण कळतनकळत चालणाऱ्या देवाणघेवाणीतूनही होत असतो, हे येथील ‘रूप-खेळा’च्या मांडणीमागचे सूत्र आहे.
हाकारा । hākārā’s sixth edition is an exploration into the intriguing nature and interconnectedness of content and form. Addressing the multi-fold relationship of the intrinsically connected worlds of content and form, artists and writers in this edition talk about artistic and scholarly practices that address and unfold through form-play.
कुजबुज : ‘रूप-खेळ’ अंकाला माया निर्मला यांचा प्रतिसाद