Skip to content Skip to footer
Picture of Dr. Nitya Pawar

Dr. Nitya Pawar

Dr. Nitya Pawar is an assistant professor at JK Lakshmipat University, Jaipur. She completed her PhD on a Marathi woman saint, Janabai, from Ashoka University, Sonipat. Her scholarly pursuits revolve around the themes of emotions, religion, caste, gender, and spirituality through the lens of translation, with broader interests in Bhakti Studies, Translation Studies, Indian Literature(s) in Translation, Indian Philosophy, and Religion Studies. In 2025, she submitted an article titled “Critical Bhakti: Religion and the Everyday through Translation and Performance” for publication in an edited volume on Religion Studies in India, and presented a paper titled “The Dilemma of Dharm, Religion and Translation: A case study of Gita GPT.”

डॉ. नित्या पवार ह्या जयपूर येथील जे. के. लक्ष्मीपत विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी सोनीपत येथील अशोका विद्यापीठातून मराठी संतकवयित्री जनाबाई ह्यांच्याशी संबंधित विषयावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांचे संशोधनकार्य भावना, धर्म, जात, लिंग आणि अध्यात्म ह्या विषयांभोवती केंद्रित आहे, ज्यांचा अभ्यास त्या अनुवादाच्या दृष्टिकोनातून करतात. त्यांची व्यापक आवड भक्ती-अभ्यास, अनुवाद-अध्ययन, भारतीय साहित्य (अनुवादित स्वरूपात), भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्म-अभ्यास ह्या क्षेत्रांत आहे. २०२५ साली त्यांनी क्रिटिकल भक्ती : रिलिजन अँड द एव्हरीडे थ्रू ट्रान्सलेशन अँड परफॉर्मन्स ह्या शीर्षकाचा लेख भारतातील धर्म-अभ्यासावरील संपादित ग्रंथासाठी सादर केला आहे, तसेच द डिलेमा ऑफ धर्म, रिलिजन अँड ट्रान्सलेशन : अ केस स्टडी ऑफ गीता जीपीटी ह्या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे.