Skip to content Skip to footer
Picture of Akshay Chaudhari

Akshay Chaudhari

Akshay Chaudhari holds a doctoral degree in Political Science from Savitribai Phule Pune University where his doctoral research comparatively studied Iris Marion Young’s theorisation of structural injustice and questions of caste oppression, group rights, humiliation, and political responsibility in India. His research interests include political philosophy, comparative political theory, social injustice, masculinities and democracy.  He is currently a guest faculty in the Department of Civics and Politics at the University of Mumbai. He has co-edited a forthcoming volume titled Democracy and the State in India and has published in journals such as Parivartanacha Watsaru, Confluence: Journal of Interdisciplinary Studies and Indian Philosophical Quarterly. 

अक्षय चौधरी ह्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी संशोधनप्रबंधात आयरिस मेरियन यंग ह्यांच्या संरचनात्मक अन्यायाच्या सिद्धान्ताचा आणि भारतातील जातीय पिळवणूक, समूहाधिकार, अपमान आणि राजकीय जबाबदारी ह्या प्रश्नांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्यांना राजकीय तत्त्वज्ञान, तुलनात्मक राजकीय सिद्धान्त, सामाजिक अन्याय, पुरुषत्व आणि लोकशाही ह्यांविषयीच्या संशोधनात रस आहे. सध्या ते मुंबई विद्यापीठामधील, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र ह्या विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी डेमॉक्रसी अँड द स्टेट इन इंडिया ह्या आगामी खंडाचे सहसंपादन केले आहे. तसेच त्यांचे लेख परिवर्तनाचा वाटसरू, कन्फ्लुएन्स : जर्नल ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज आणि इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली  ह्यांसारख्या नियतकालिकांमध्ये आणि विविध पुस्तकांत प्रकाशित झाले आहेत.