Skip to content Skip to footer

सर्जनशील अभिव्यक्तीचे द्वैभाषिक नियतकालिक

A Bilingual Journal for Creative Expression

हाकारा । hākārā 

नाम. (पु.) हाक, बोलावणे, साधारण किंवा मोठ्या आवाजात पुनःपुन्हा घातलेली साद.
Noun. (m.) a call, a general or a great and continued calling.

हाकारा । hākārā हे मराठी आणि इंग्रजी ह्या भाषांत प्रकाशित होणारे महाजालावरील स्वतंत्र द्वैभाषिक नियतकालिक आहे. आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई ह्यांनी २०१७ साली सुरू केलेले हाकारा । hākārā सर्जनशील आणि समीक्षात्मक ह्या दोन्ही प्रकारच्या आविष्काररूपांना सामावू पाहते. हाकारा । hākārāमध्ये, आम्ही अनेकविध कलाक्षेत्रे आणि वैचारिक दर्शने ह्यांतील परस्परसंवादास प्रोत्साहन देतो. भाषिक-साहित्यिक, प्रयोगधर्मी, आणि दृश्यरूपात्मक कलाविष्कार, तसेच कला आणि संस्कृती ह्यांविषयीचे चिंतनपर लेखन अशा व्यापक संदर्भचौकटीत आम्ही कार्यरत आहोत. मराठी आणि इंग्रजी ह्या भाषा एकत्र आणण्यातून, तसेच आंतरविषयक्षेत्रीय आविष्कारांना व अभ्यासरीतींना प्राधान्य देण्यातून, आम्ही विभिन्न संस्कृती नि विश्वभाने ह्यांच्यामध्ये देवघेव, संवाद, संमीलन घडवू पाहत आहोत. आमचा मंच हा संस्थांशी संलग्न असलेल्या तसेच स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या कलाकारांसाठी आणि संशोधकांसाठी खुला आहे. हाकारा । hākārā हा समकालीन कला, समाज, संस्कृती ह्यांविषयीच्या व्यापक संदर्भचौकटीत अनघड, अनवट वाटा चोखाळण्याचे धाडस करू इच्छिणाऱ्या कलाकारांच्या व अभ्यासकांच्या साहसी प्रयोगांसाठीचा अवकाश आहे. हाकारा । hākārāचे महाजालावर वर्षातून तीन अंक प्रकाशित होतात. हे अंक सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध आहेत. पुढील विभागांतील मराठी आणि इंग्रजी भाषांतील कलाविष्कार व अभ्यासपर लेखन हाकारा । hākārāकडे पाठवावे; आम्ही दोन्ही भाषांतील भाषांतर, अनुवाद, रूपांतरेही स्वीकारतो :

कथन / Narrative
कथात्म साहित्य, नाट्यात्म कथनरूपे, चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक लेखन, प्रवासवर्णने, इत्यादी. गद्य कथनांप्रमाणे पद्यातील किंवा गद्य-पद्य-मिश्र-स्वरूपातील कथनांचेही स्वागत आहे.

दृश्यांगण / Panorama
दृश्यरूपात्मक अभिव्यक्ती, चित्रकृती, छायाचित्रे, चित्रपट आणि चित्रफिती, प्रयोगात्म सादरीकरणे, आणि काष्ठ, कागद इत्यादी विविध साधनद्रव्यांचे सर्जक आविष्कार. आम्ही प्रक्रियेस प्राधान्य देणाऱ्या / प्रक्रियेस साध्य मानणाऱ्या कलाकृती तसेच प्रक्रियेमध्ये असलेल्या कलाकृती ह्यांनाही प्रोत्साहन देतो.

मुक्तावकाश/ Open Space
कविता, गीते, ललितनिबंध, ललितगद्य इत्यादी.

चिंतन / Reflection
कला, समाज, संस्कृती ह्यांविषयी परीक्षणे, समीक्षा, वैचारिक निबंध, वादविवाद, आणि चिंतनपर लेखन.

संवाद / Conversation
श्राव्य, दृक्श्राव्य, किंवा पाठ्य माध्यमातील चर्चा, मुलाखती.

हाकारा । hākārā समूह

Editorial Team

सहयोगी संपादक​

मार्गदर्शक सल्लागार-समिती

अंजली नेर्लेकर

नॅन्सी डिमेरडॅश

अभिकल्प

मितवा अभय वंदना

संकेतस्थळ-विकास

सौरभ गावडे

सहयोगी सहकारी

मयूर सलगर

सृजन इनामदार

सहकार्य

अनघा मांडवकर

कृत्तिका सुसरला

पल्लवी सिंग

सविता गणेश

वेणी खरे

अधिक माहितीसाठी कृपया साहित्य पाठवण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना पाहा. शंकानिरसनाकरिता तसेच संपादनाशी संबंधित संदेशनाकरिता info@hakara.in ह्या इ-पत्त्यावर संपर्क साधावा.

हाकारा । hākārā (ISSN 2581-9976) हे विद्वत्प्रमाणित नियतकालिक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यूजीसी केअर-लिस्ट ह्या मान्यताप्राप्त नियतकालिकांच्या यादीत समाविष्ट आहे. हाकारा । hākārāच्या अंकांमध्ये मांडली गेलेली तथ्यात्मक विधाने आणि मते ही संबंधित लेखक-कलाकारांची, संशोधक-अभ्यासकांची प्रतिपादने असून, त्यांकरिता हाकारा । hākārā जबाबदार आणि उत्तरदायी नाही.

प्रकाशकाचे नाव आणि पत्ता :

आशुतोष पोतदार. ए १ / ६, दीपज्योती ॲव्हेन्यू , सर्वे क्र. ३३, हिस्सा क्र. १ बी / १, वारजे गावठाण, वारजे, पुणे ४११०५२.