- सुधा जोशी व रत्नाकर मतकरी ह्यांनी संपादित केलेल्या निवडक मराठी एकांकिका ह्या पुस्तकातील एकांकिकांची पाहणी केली असता, दिवाकरांपासून ते वृंदावन दंडवते ह्यांच्यापर्यंतच्या पिढ्यांतील लेखकांच्या मराठी एकांकिकांत नाट्यगत मौनाचा निर्देश करणारे खालील शब्द आढळून आले :
- पाहणीतील मराठी नाटकांत (ह्यांच्याविषयीचे तपशील संदर्भसूचीत समाविष्ट केले आहेत,) आढळलेले मौननिदर्शक शब्द :
- मोहन राकेश-लिखित आधे अधूरे, आषाढ का एक दिन आणि असगर वजाहत-लिखित जिस लाहौर नई देख्या ओ जम्याइ नई ह्या हिंदी नाटकांत आढळलेले मौननिदर्शक शब्द :
- सॅम्युएल बेकेटच्या कम अँड गो ह्या नाटुकल्यातील ‘सायलेन्स’ ह्या रंगसूचनेचा लेखाच्या आरंभी उल्लेख केला आहेच. बेकेटचेच त्याहूनही कमी म्हणजे अवघ्या तीस सेकंदांच्या प्रयोग-अवधीचे ब्रेथ नावाचे नाटुकले आहे. त्याच्या एक-पानी संहितेत एकही संवाद नसून केवळ अभाषिकासंबंधीच्या रंगसूचनाच येतात.
- समकालीन पिढीतील मराठी नाटककारांच्या लेखनात मौनरूपांविषयी ‘शांतता, विराम, पुतळ्यागत स्थिर’ ह्या मराठी शब्दांसोबत किंवा त्यांच्या ऐवजी ‘सायलेन्स, पॉज, फ्रीज’ हे इंग्रजी शब्दही योजले जाताना दिसतात.
- मौनाशी थेटपणे संबंधित असलेले शब्द (उदाहरणार्थ, मौन, शांत, स्तब्ध, गप्प इत्यादी) योजलेले दिसले, तसे अभिनयातून घ्यावयाचा विराम सूचित करणारी शब्दसरणीही (उदाहरणार्थ, विशिष्ट पात्र दुसऱ्या पात्राकडे पाहत राहते, अशी रंगसूचना) योजली गेलेली दिसली. ह्या दोन्ही पद्धती नाटकांत सहजतेने सह-अस्तित्वात सक्रिय असल्याचे आढळले.
- मौननिदर्शक शब्द नाम (स्तब्धता), विशेषण (स्तब्ध), पदबंध (दीर्घ स्तब्धता, जरा थांबून) अशा विविध स्वरूपांत योजलेले दिसले.
- मौननिदर्शक शब्द हे एकल शब्द (थांबून), दोन शब्दांचा पदबंध (जरा थांबून), दोनहून अधिक शब्दांचा पदबंध (किंचित कालाने भानावर येत) अशा विविध लांबींचे आढळले.
- मौननिर्देशासाठी त्या त्या भाषेतील (उदाहरणार्थ, हिंदीत ‘वकफा’, मराठीत ‘विराम’) शब्दच योजल्याचे दिसले, तसे काही मराठी व हिंदी नाट्यसंहितांमध्ये त्या त्या भाषेतील मौननिदर्शक शब्दांसोबत इंग्रजीतील ‘सायलेन्स, पॉज, फ्रीज’ हे शब्दही (सहसा देवनागरी लिपीत) योजले गेल्याचेही दिसले.
- सहसा ‘खंडविराम’[22] व ‘अपसारणचिन्ह’ ह्या विरामचिन्हांचे योजन नाटकांच्या पुस्तकांत विराम दर्शवण्यासाठी होताना दिसले. पण त्यांच्या योजनेबाबत निश्चित नियमिततेपेक्षा मनःपूतपणा, विस्कळीतपणा हेच चित्र प्रायः पाहावयास मिळाले.
- क्वचित मौनरूपाचा अपेक्षित अवधी निश्चित कालएककांतून निर्देशित केल्याचेही आढळले. (उदाहरणार्थ, सॅम्युएल बेकेट-लिखित ब्रेथमधील रंगसूचना, निवडक मराठी एकांकिकामध्ये समाविष्ट वृंदावन दंडवते-लिखित कुलवृत्तान्त ह्या एकांकिकेतील ‘चार-पाच सेकंद स्तब्ध’ ही रंगसूचना पण सहसा मौनरूपाचा निश्चित अवधी नाही, तर मोघम अवधीच (थोडे थांबून, किंचित कालाने, कुछ क्षण), तसेच तुलनेने कमी अवधी (विराम, वकफा, पॉज) व तुलनेने दीर्घ अवधी (शांतता, लंबा वकफा, सायलेन्स) असा अवधीतील मोघम फरकच संहितेत निर्देशित केला जात असल्याचे चित्र दिसले. विरामाचा अपेक्षित प्रयोग-अवधी मोघमपणे निर्देशित होण्याचे कारण, अशोक केळकर म्हणतात त्याप्रमाणे, “सांगीतिक विरामाचे कालवितरण निश्चित असते, तसे बोलण्यातील विरामाचे नसते,” हे असावे.[23]
- सहसा विरामाचा प्रयोगगत अवधी (भौतिक काळ) व कथावस्तुगत अवधी (भौतिक किंवा मानसिक कालगती) ह्यांत प्रयोगगत अवधीहून कथावस्तुगत अवधी अधिक असणे असा फरक असल्याचेच चित्र आढळले.
- मौननिदर्शक शब्दांपलीकडे, काही नाट्यकृतींबाबत दृश्यातील मोठ्या अवधीचा भाग अभाषिक किंवा निर्भाषिक (मोहन राकेश-लिखित आधे अधूरे, पृ. ३०), एखादे पूर्ण दृश्य अभाषिक किंवा निर्भाषिक (विजय तेंडुलकर-लिखित सखाराम बाइंडर), पूर्ण नाट्यरूप अभाषिक किंवा निर्भाषिक (सॅम्युएल बेकेट-लिखित ब्रेथ) असे दीर्घ-अतिदीर्घ मौनावकाश योजले गेल्याचेही दिसले.
- संवादांप्रमाणे स्वगतांतही तसेच पद्यभागांतही मौनस्थळे संयोजित केल्याचे आढळले.
- सदर पाहणी करता करता असे जाणवत गेले की स्थूल मौननिदर्शक शब्दांपलीकडे विचार करता, नाटकातील एका संवादाच्या किंवा स्वगताच्या तुकड्यान्तर्गत (उद्देशित किंवा लक्ष्य ग्रहणकर्ता बदलतो तेव्हा,), दोन संवाद-तुकड्यांच्या दरम्यान, पात्राच्या नावाचा उल्लेख होतो व ते पात्र रंगमंचावर प्रवेश करते ह्यांदरम्यान, दोन दृश्यांच्या दरम्यान, दोन अंकांच्या दरम्यान, तिसरी घंटा होऊन प्रेक्षागृहात अंधार केला जातो आणि पडदा उघडून एका वर्तमान बिंदूवर नाटक सुरू होते ह्या दोन कालबिंदूंच्या दरम्यान, नाट्यप्रयोगातील शेवटचे दृश्य, श्राव्य किंवा दृक्श्राव्य विधान सादर होते आणि पडदा पडतो ह्या दोन कालबिंदूंच्या दरम्यान, अशा नाट्यगत मौनाच्या प्रयोगामध्ये अनेक जागा असू शकतात.
संदर्भटिपा
[1] Beckett, Samuel. “Come and Go”. Modern Drama, Published by University of Toronto Press, Vol. 19, No. 3, Fall 1976, pg. 255-260.
[2] पाटील, गंगाधर. “नाटक : स्वरूपविचार”. रङ्गनायक (अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ), संपा. – नाईक, राजीव, विजय तापस, प्रदीप मुळ्ये, आविष्कार प्रकाशन, मुंबई, १९८८, पृ. २३५.
[3] पाटील, गंगाधर. “नाटक : स्वरूपविचार”. रङ्गनायक (अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ), संपा. – नाईक, राजीव, विजय तापस, प्रदीप मुळ्ये, आविष्कार प्रकाशन, मुंबई, १९८८, पृ. २३७.
[4] केळकर, अशोक रा. रुजुवात – आस्वाद : समीक्षा : मीमांसा, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०११, पृ. ९४-९५.
[5]भरताच्या नाट्यशास्त्रातील अष्ट सात्त्विक भावांविषयीचा श्लोक :
“स्तम्भः स्वेदोऽथ रोमाञ्चः स्वरभेदोऽथ वेपथुः |
वैवर्ण्यमश्रुप्रलय इत्यष्टौ सात्त्विका मताः ||” (अध्याय ७, श्लोक क्र. ९४.)
Kavi, M. Ramakrishna (Ed.). Natyasastra of Bharatamuni (Vol. 1). Gaekwad’s Oriental Series, Oriental Institute, Baroda, 1980, pg. 199.
[6] भरताच्या नाट्यशास्त्रातील स्तम्भ, वैवर्ण्य, स्वरभेद आणि प्रलय ह्या सात्त्विक भावांच्या संभवकारणांविषयीचे श्लोक :
हर्षभयशोकविस्मयविषादरोषादिसम्भवः स्तम्भः | (अध्याय ७, श्लोक क्र. ९६.)
शीतक्रोधभयश्रमरोगक्लमतापजं च वैवर्ण्यम् | (अध्याय ७, श्लोक क्र. ९८.)
स्वरभेदो भयहर्षक्रोधजरारौक्ष्यरोगमदजनितः |
श्रममूर्च्छामदनिद्राभिघात मोहादिभिः प्रलयः || (अध्याय ७, श्लोक क्र. ९९.)
भरताच्या नाट्यशास्त्रातील स्तम्भ, वैवर्ण्य, स्वरभेद आणि प्रलय ह्या सात्त्विक भावांच्या अपेक्षित अभिनयाविषयीचे श्लोक :
निःसंज्ञो निष्प्रकम्पश्च स्थितः शून्यजडाकृतिः |
स्कन्नगात्रतया चैव स्तम्भं त्वभिनयेद्बुधः || (अध्याय ७, श्लोक क्र. १०१.)
स्वरभेदोऽभिनेतव्यो भिन्नगद्गदनिस्वनैः | (अध्याय ७, श्लोक क्र. १०४.)
मुखवर्णपरावृत्त्या नाडीपीडनयोगतः |
वैवर्ण्यमभिनेतव्यं प्रयत्नात्तद्धि दुष्करम् || (अध्याय ७, श्लोक क्र. १०५.)
निश्चेष्टो निष्प्रकम्पत्वादव्यक्तश्वसितादपि |
महीनिपातनाच्चापि प्रलयाभिनयो भवेत् || (अध्याय ७, श्लोक क्र. १०७.)
Kavi, M. Ramakrishna (Ed.). Natyasastra of Bharatamuni (Vol. 1). Gaekwad’s Oriental Series, Oriental Institute, Baroda, 1980, pg. 199-200.
[7] केळकर, अशोक. मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार , मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६, पृ. २२५.
[8] रानडे, अशोक. भाषणरंग व्यासपीठ आणि रंगपीठ, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९५, पृ. २१४.
[9] Hodgson, Terry. The Batsford Dictionary of DRAMA. B. T. Batsford, London, 1988, pg. 270, 350.
[10] केळकर, अशोक रा. रुजुवात – आस्वाद : समीक्षा : मीमांसा, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०११, पृ. ९५.
[11] सावंत, कृ. रा.. रंगचर्या नाटक : स्वरूप, प्रकार, शैली, लेखनप्रक्रिया, प्रयोग, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९९८, पृ. ५८.
[12] नाईक, राजीव. खेळ नाटकाचा (एक पडदा आणि तीन घंटा), अक्षर प्रकाशन, मुंबई, २००३, पृ. १६६-१६७.
[13] “There are three different types of silences that can be categorised under Pinter Pauses and they are referred to as: an ellipsis, a pause, and silence. In a Pinter script, an ellipsis is denoted by three dots and was used by the playwright to indicate slight hesitation. A pause was a much longer hesitation used by Pinter to more accurately depict the careful construction of an utterance. Generally, during a pause, the character is in the middle of a deep thought process and the use of this device helped Pinter to create tension and an unsettling atmosphere. A full-on silence, also known as a pregnant pause, is a dead stop during which no word is uttered because the character has encountered a conflict so absurd that they have nothing to say, and they are left in a completely different mental state from where they started.”
Daniels, Nicholas Ephram Ryan. What are Pinter Pauses? And other Pinteresque devices | London Theatre Direct, 06.06.2024.)
[14] Lutterbie, John. “Subjects of Silence”. Theatre Journal, Published by The Johns Hopkins University Press, Vol. 40, No. 4, Dec., 1988,, pg. 473.
[15] केळकर, अशोक. मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार , मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६, पृ. २२५-२२६.
[16] नाईक, राजीव. खेळ नाटकाचा (एक पडदा आणि तीन घंटा), अक्षर प्रकाशन, मुंबई, २००३, पृ. १६७-१६८.
[17] अशोक केळकर ह्यांनी केलेली शरीरभावदर्शनविषयक मांडणी :
स्स् पूरक श्वास : वेदना
हाय् रेचक उच्छ्वास : दाह, वेदना
यॅक्क् : वमन, किळस सूचित
कातर, गद्गद्घोष
हसणे, रडणे, धाप लागणे, जांभई, हुंदका, खोकला, नाकातून खोकणे (शिंकणे), आवंढा, उचकी इत्यादी अल्पनियंत्रित क्रिया …
केळकर, अशोक. मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार , मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६, पृ. २२७.
[18] भोसले, शाहराजे. “लक्ष्मीनारायणकल्याण”. मराठी रंगभूमीचा उषःकाल, सरदेसाई, माया (संपा.)., मराठी विभाग, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, १९७२, पृ. ४०.
[19] भावे, विष्णु अमृत. नाट्यकवितासंग्रह, विष्णु अमृत भावे, पुणे, १८८५, पृ. ५६.
[20] फुले, जोतीराव. तृतीयरत्न, नीलकंठ प्रकाशन, पुणे, प्रकाशनवर्ष नमूद नाही, पृ. २४.
[21] पोतदार, आशुतोष. “सदासर्वदा पूर्वापार : स्फुरणे, रचणे आणि मांडणे”. युगवाणी, प्रका. – विदर्भ साहित्य संघ, नागपूर, वर्ष ७६वे, एप्रिल-मे-जून २०२१, पृ. ३२.
[22] खंडविराम – “अर्थसूचन परिणामकारक व्हावे म्हणून व्याकरणी दृष्टीने अर्धवट वाटणारे वाक्य तसे सोडले असल्याची सूचना देणारी तीन आडवी टिंबे…”
रानडे, अशोक. भाषणरंग व्यासपीठ आणि रंगपीठ, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९५, पृ. ९१.
[23]. केळकर, अशोक. मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार , मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६, पृ. २२६.
[24] “Silence, in a pure state, is absolute absence, and therefore beyond representation; it can be thought of only as a space defining the interface of opposites.”
Lutterbie, John. “Subjects of Silence”. Theatre Journal, Published by The Johns Hopkins University Press, Vol. 40, No. 4, Dec., 1988, pg. 468.
[25] “It is perhaps ironic that these explorations are presented in the theatre; that, in a form founded upon representation, the audience is asked to consider what is beyond representation.”
Lutterbie, John. “Subjects of Silence”. Theatre Journal, Published by The Johns Hopkins University Press, Vol. 40, No. 4, Dec., 1988, pg. 481.
[26] उद्धृत : Lutterbie, John. “Subjects of Silence”. Theatre Journal, Published by The Johns Hopkins University Press, Vol. 40, No. 4, Dec., 1988, pg. 473.
संदर्भसूची
संहिता (मराठी)
कार्नाड, गिरीश. हयवदन, अनु. – देशपांडे, सरोज, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २००७.
जोशी, सुधा, रत्नाकर मतकरी (संपा.). निवडक मराठी एकांकिका, साहित्य अकादेमी, नवी दिल्ली, २०१३.
तेंडुलकर, विजय. कावळ्यांची शाळा, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २००५.
तेंडुलकर, विजय. शांतता ! कोर्ट चालू आहे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९८.
त्रिलोकेकर, सोकर बापूजी. संगीत सावित्री नाटक, केशव भिकाजी ढवळे बुकसेलर, मुंबई, १९२३.
पोतदार, आशुतोष. “सदासर्वदा पूर्वापार : स्फुरणे, रचणे आणि मांडणे”. युगवाणी, प्रका. – विदर्भ साहित्य संघ, नागपूर, वर्ष ७६वे, एप्रिल-मे-जून २०२१, पृ. ११-३३.
फुले, जोतीराव. तृतीयरत्न, नीलकंठ प्रकाशन, पुणे, प्रकाशनवर्ष नमूद नाही.
भोसले, शाहराजे. “लक्ष्मीनारायणकल्याण”. मराठी रंगभूमीचा उषःकाल, सरदेसाई, माया (संपा.)., मराठी विभाग, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, १९७२, पृ. २६-५२.
राकेश, मोहन. “कदाचित”. द्विदल, अनु. – देशपांडे, पु. ल., मौज प्रकाशन गृह, मुंबई, २००४, पृ. ५९-७६.
रूपकथ्थक (पु. शि. रेगे). रङ्गपाञ्चालिक आणि दोन नाटकें, कलापद, मुंबई, १९५८.
सरकार, बादल. “सारी रात्र”. द्विदल, अनु. – देशपांडे, पु. ल., मौज प्रकाशन गृह, मुंबई, २००४, पृ. ०१-५७.
संहिता (हिंदी)
राकेश, मोहन. आधे-अधूरे, राधाकृष्ण प्रकाशन, दिल्ली, २००४.
राकेश, मोहन. आषाढ का एक दिन, राजपाल एण्ड सन्ज, दिल्ली, २०२२.
वजाहत, असगर. “जिस लाहौर नई देख्या ओ जम्याइ नई”. असगर वजाहत के आठ नाटक, किताबघर प्रकाशन, नयी दिल्ली, २०१९, पृ. १४५-२०१.
संहिता (इंग्रजी)
Beckett, Samuel. “Come and Go”. Modern Drama, Published by University of Toronto Press, Vol. 19, No. 3, Fall 1976, pp. 255-260.
Beckett, Samuel. “Breath”. breath.pdf (slowwritinglab.nl), 06.06.2024.
Gokhale, Shanta. Avinash. Seagull Books, Calcutta, 1994.