Skip to content Skip to footer

राजकुमार श्रेयांशची आठ स्वप्नं : रवी निंबाळकर

Discover An Author

  • कलाकार

    रवी निंबाळकर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद (धाराशिव) येथे राहणारे दृश्यकला-माध्यमात काम करणारे कलाकार आणि चित्रपट-निर्माते आहेत. ते त्यांच्या प्रभावी दृश्यात्म-कथनासाठी आणि वास्तवदर्शी कथानकांसाठी ओळखले जातात. त्यांनी सामाजिक-सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक विषयांवर आधारित लघुपट आणि माहितीपट तयार केले आहेत. निंबाळकर ह्यांनी ‘दै. लोकसत्ता’साठी 'नो युवर सिटी : पुणे' ही शंभर भागांची लेखमालिका लिहिली होती. चित्रपटक्षेत्रातील योगदानाकरिता त्यांना  विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले आहे. सखोल संशोधन, तळागाळातील माणसांच्या जगण्याबद्दलचे विषय, आणि प्रभावी दृश्यरूपे ह्यांचा मिलाफ साधत त्यांनी आपली स्वतःची अशी अनोखी चित्रपट-शैली विकसित केली आहे. ह्या शैलीमुळे त्यांचे चित्रपट माहितीपूर्ण असतात आणि त्याबरोबर भावनिक स्पंदनंही प्रभावीपणे व्यक्त करतात.   Ravi Nimbalkar is a visual artist and filmmaker based in Osmanabad (Dharashiv), Maharashtra. Known for his strong visual storytelling and rooted narratives, he has created a wide range of short films and documentaries that explore social, cultural, and historical themes. His most acclaimed project is the "Know Your City: Pune" series — 100 episodes produced for Loksatta. Ravi's work has earned recognition at various national and international film festivals. His unique approach combines research, grassroot-storytelling, and strong visuals, making his films both informative and emotionally resonant.

‘राजकुमार श्रेयांशची आठ स्वप्नं’ ही मी मांडलेली दृक्श्राव्य मालिका म्हणजे एक नावीन्यपूर्ण दृक्श्राव्य कथन आहे. इथे मी चित्रांचे केवळ वर्णन करत नाही, तर त्यांमागील सखोल कथा, प्रतीकात्मक अर्थ आणिभावना ह्यांना एकमेकांशी जोडून मांडू पाहत आहे.  माझ्या मांडणीतून, रसिक चित्राकडे केवळ एक कलाकृती म्हणून न पाहता, त्यातील प्रत्येक तपशील आणि संदर्भ अधिक प्रभावीपणे समजून घेत, त्यात लपलेले विश्व समजून घेऊ शकतो, असे मला वाटते. भारतातील प्राचीन दृश्यकलेला आधुनिक दृष्टिकोनातून सादर करून, प्रेक्षकांना एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देण्याचा माझा प्रयत्न आहे. 

मूळ प्रतिमा:

१६७०-८०, उत्तर-पश्चिम भारत, राजस्थान.
गम टेम्परा, शाई, चांदी आणि सोन्याचा वापर कागदावर केलेला आहे.
आकार : २६.७ सें.मी. × ४२.५ सें.मी. (१० १/२ इंच × १६ ३/४ इंच).
संग्रहालय : क्लीव्हलँड म्युझियम ऑफ आर्ट, जो हर्षी सेल्डेन फंड २०२१.१२

Post Tags

Leave a comment