हाकारा | hākārāच्या सद्य अंकात ‘प्रवाह’ ह्या संकल्पनेच्या विविध आयामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना आम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे विख्यात गायक पंडित रघुनंदन पणशीकर ह्यांच्याशी संगीताचा प्रवाह आणि संगीतातील प्रवाहीपण ह्याबद्दल संवाद साधला. हाकारा | hākārāचे संपादक आशुतोष पोतदार ह्यांनी साधलेल्या ह्या संवादात पंडित पणशीकर ह्यांनी त्यांच्या गुरू आणि प्रतिभासंपन्न गायिका गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्यांचे सांगीतिक आविष्कार, त्यांच्याकडून मिळालेले गायन-संस्कार तसेच स्वतःचे गायन, आणि अनुभव ह्यांबद्दल सोदाहरण चर्चा करत संगीतातील ‘प्रवाहा’विषयी आपले चिंतन मांडले आहे. जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह, संगीतात नवे मानदंड निर्माण करणारे किशोरीताईंचे समृद्ध आविष्करण, स्वतःचा गायनप्रवास, तसेच त्या प्रवासात अवलंबलेल्या रियाज-पद्धती, आणि समाजाच्या बदलत्या अभिरुचीबरोबर सांगीतिक प्रवासात जाणवणारी आव्हाने ह्यांबद्दल पंडित पणशीकरांनी आपले विचार मांडले आहेत. ह्या संवादाची ध्वनिचित्रफीत इथे उपलब्ध करून देत आहोत. तसेच, पंडित पणशीकरांच्या सांगीतिक प्रवासाबद्दलचे मुक्त चिंतन ऐकून प्रभा कुलकर्णी ह्यांनी लिहिलेला इंग्रजी भाषेतील लेखही सोबत देत आहोत.
सहकार्य : राधिका जोशी, राहुल नरवणे.
संकलन : रे मिडिया अँड फिल्मस.
ध्वनिचित्रमुद्रण-स्थळ : जयपूर गुणीजनखाना, पुणे.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram