Call 21
हाक २१: मौन
मौन म्हणजे निःशब्दता, शांतता, स्तब्धता, अव्यक्त अवकाश, अबोला, शुकशुकाट किंवा सन्नाटा. मौन म्हणजे नीरवता. मौनात निर्मितीचे क्षण दडलेले असू शकतात. तिथे अलिप्ततेचा भावही लपलेला असू शकतो. विचारांच्या आणि भावनांच्या स्तरावर व्यक्तीशी किंवा भवतालाशी जोडून घेण्यासंबंधीची निरिच्छाही मौनातून व्यक्त होऊ शकते. अव्याहत व्यक्त होणाऱ्यांसमोर मौन राहणे हे आत्मविश्वासाचे प्रतीक असू शकते. पण शांत राहण्यामुळे एखादी भावना किंवा विचार दुर्लक्षिलाही जाऊ शकतो. आणि शोषणाच्या संदर्भातील मौन हे तर सत्ताधीशांविषयीच्या, शोषकांविषयीच्या भयातून जन्म घेत असते. असे मौन ही शोषणासमोर शरणागती पत्करण्याची किंवा मुस्कटदाबीकडे डोळेझाक करण्याची वृत्ती ठरू शकते. मौन स्वेच्छेने राखलेले असू शकते, तसेच ते बाहेरून लादलेले असू शकते, ते इतरांना स्वमर्जीप्रमाणे वागायला लावण्यासाठीचे शस्त्र असू शकते, किंवा गप्प राहणे ही एखाद्याची सवयही असू शकते. एकंदरीत, जे मानवी भाषेतून शब्दांकित होऊ शकत नाही, अशा अफाट भवतालातील आणि मानवी अनुभवविश्वातील गुंत्यांचे प्रतीक असणाऱ्या मौनाला समजून घेणे किंवा त्याचा अर्थ लावणे सहज शक्य नसते.
‘हाकारा’च्या एकविसाव्या आवृत्तीतून ‘मौन’ या संकल्पनेवर प्रकाश टाकण्याचा मानस आहे.
अपेक्षित साहित्य: निबंध, कथात्म साहित्य, कविता, दृश्य-कथन, कला-समीक्षा, पुस्तक-परीक्षण, समाज-संस्कृतीविषयीचे अभ्यासपर लेखन, अनुवाद, चर्चा, मुलाखत, इत्यादी.
साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख : जून ०५, २०२४.
अंक-प्रकाशन : ऑगस्ट २०२४.
साहित्य पाठविण्यासाठीच्या सूचना इथे पाहू शकता. कृपया आपले साहित्य इथे दिलेल्या गूगल-फॉर्मद्वारेच पाठवावे. इ-पत्राद्वारे आपले साहित्य पाठविणे अपेक्षित नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
आशुतोष पोतदार
संपादक, हाकारा । hākārā
पूर्वी राजपुरिया
सहयोगी संपादक, हाकारा । hākārā
Call 21: Silence
Silence is quietude, calmness, stillness and speechlessness: it is the absence of sound. It could be a moment of creation. It could point to a sense of deep understanding– the kind where words are redundant. In interpersonal relationships, it could signify aloofness: the desire to not engage with or neglect others. While silence in the face of incessant chatter is a sign of self-assuredness, silence in the face of oppression stems from fear: it denotes a submission to the powers that be and leads to complicity. It can be self-willed, externally enforced, manipulative or simply a matter of habit. Finally, silence is a reminder of the vastness of human experience, which cannot ever be fully articulated through language.
In Hakara’s 21st edition, we are interested in exploring the different facets of silence through visual, literary, critical, and other experimental forms.
Accepting Submissions for
Essays, Fiction, Poetry, Visual Narratives, Art Criticism, Book Reviews, Cultural Criticism or Translations.
Submission Deadline: June 5, 2024
Publication: August 2024.
Submission Guidelines: You can read the detailed submission guidelines here.
Please use this link to the google form to send us your work. We are not accepting email submissions.
Ashutosh Potdar
Editor, हाकारा । hākārā
Purvi Rajpuria
Associate Editor, हाकारा । hākārā
Your efforts are good and certainly appreciable. The platform will help creative writers. Wish you all the best.