हाक २०

Call 20



संचार 

व्यक्ती, कुटुंबे आणि समुदाय संचार करत असतात. कामाकरता, स्वतःचे जीवनमान बदलण्यासाठी किंवा वेगळ्या समुदायाचा किंवा सामाजिक-आर्थिक वर्गाचा भाग होण्यासाठी ते जागा बदलत राहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वावरतात. शारीरिक कृतीप्रमाणे, गतिशीलतेचे सामाजिक, आध्यात्मिक, भावनिक तसेच इतरही आयाम असतात. विशिष्ट विचार किंवा जीवनदृष्टीतूनही संचारी वृत्तीला चालना मिळत असते.  

किराणा सामान घेण्यासाठी बाहेर पडणे, शेतावर जाणे, कामासाठी बाहेर पडणे, सहकाऱ्यांबरोबर  फिरायला जाणे किंवा राहायची जागा बदलणे अशी कोणतीही कृती असो; गतिमान राहण्याला मानसिक आणि शारीरिक ऊर्जेची गरज असते. त्यासाठी, बळ, समन्वय आणि संतुलन आवश्यक असते. गतिशील असण्यातून कधी मजा, आनंद मिळतो तर कधी संघर्ष  किंवा अस्थिरता निर्माण होऊ शकते. कालौघात, नैसर्गिक कारणांमुळे किंवा आर्थिक आणि सामाजिक बदलांचा परिणाम म्हणून हालचालींवर मर्यादा येत जातात. वैचारिक धारणा तसेच विचार करण्याच्या नाना पद्धती संचाराच्या प्रक्रियांवर प्रभाव पाडत असतात. उदाहरणार्थ; शक्तिशाली  आणि विशेषाधिकारप्राप्त व्यक्ती किंवा गटाकडे वेगवेगळ्या समाजवर्तुळांमध्ये सहज संचार करण्यासाठी लागणाऱ्या क्षमता किंवा हालचाली नियंत्रित ठेवण्यासाठीची संसाधने उपलब्ध असतात. 

मानवी संचारासोबत, मानवेतरांमध्येही टिकून राहण्याच्या प्रेरणेतून उद्भवलेली संचारी वृत्ती असते. यातूनच मानवेतरांची स्थलांतरे घडतात, पृथ्वीचे स्वरूप बदलते आणि एकूणच जीवन गतिशील बनते.

हाकाराच्या २० व्या आवृत्तीत, गतिमान असण्याच्या संचारी वृत्तीला मध्यवर्ती ठेवून आम्ही मांडणी करू इच्छितो. 

विविध समाज आणि संस्कृतींमधून संचारी वृत्ती आणि कृती कशी विकसित झाली आहे? हालचालींचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होत असतो? वैयक्तिक आणि सामाजिक गतिमानतेला चालना देणाऱ्या कोणत्या प्रेरणा आणि शक्ती, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कार्यरत असतात?  एखादी व्यक्ती किंवा समुदाय वेगवेगळ्या सांस्कृतिक तसेच सामाजिक संरचनांमध्ये कोणत्या  प्रकारे वावरत असतात? जगभरात विविध सांस्कृतिक तसेच कलात्म रुपात गतिशीलता कशी व्यक्त केली गेली आहे?

तुम्ही संगीतकार, दृश्य-माध्यमातील कलाकार, लेखक, गुंफणकार असाल किंवा समाजशास्त्रज्ञ किंवा तत्त्व -चिंतन मांडणारे असाल तर ‘हाकारा । hākārā’च्या २० व्या आवृत्तीच्या पारावर ‘संचार’ या हाकेसाठी तुमचं स्वागत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये प्रकाशित होणाऱ्या या आवृत्तीसाठी तुमचे लिखाण/कलाकृती ऑक्टोबर ३०, २०२३ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवा. निवडक लेख/कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल. अधिक माहितीसाठी, इथे भेट द्या. 

आशुतोष पोतदार 
संपादक, हाकारा । hākārā

(‘हाकारा’च्या विसाव्या आवृत्तीच्या अतिथी संपादक पूर्वी राजपुरिया असतील.)


Mobility

Individuals, families or communities are on the move. They could be moving for work, to change their living conditions, or to become part of a different group or a socio-economic class. Besides being a physical action, mobility has social, spiritual, and emotional dimensions; it may begin with an idea or a vision through space and time.

Be it going out to get groceries, heading to the farm, commuting for work, stepping out with friends, or moving to a new home, mobility involves physical and mental work. It requires strength, coordination and balance. Mobility may bring joy, pleasure, friction or instability. Over time, mobility may fade away owing to natural causes, or economic and social changes. Diverse ways of living and thinking, along with various ideological forces influence the processes of mobility. For instance, a dominant and privileged individual or group may have more power, control and resources to move within different networks. 

Non-humans are also on the move due to their survival instincts. They migrate from place to place, over various seasons, and across different ecological conditions. This keeps the earth moving. 

We are interested in exploring different dimensions of “mobility” for our 20th edition, slated for publication in December 2023

How has mobility evolved through different societies and civilizations? How does it impact our daily lives? What are the forces that provoke individual and social mobility? And what are its dramatic and mundane consequences? What are the ways in which an individual or a community can move within different cultural spheres and social structures? How has mobility been expressed in varied artistic and cultural forms? 

With such questions and concerns about ‘mobility’, we would like to receive submissions from artists, writers, translators or researchers for our 20th edition, 

Do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by October 30, 2023 to info@hakara.in. For submission guidelines, please visit हाकारा । hākārā.

Select works will be published in the forthcoming issue of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar
Editor, हाकारा । hākārā

(Purvi Rajpuria will be the Guest Editor for the 20th Hakara edition.)

5 comments on “Appeal for Call 20

  1. Kiran Dongardive

    Its very good edition

    Reply
  2. Madhavi Deshpande

    Good initiative

    Reply
  3. Madhavi Deshpande

    Good work

    Reply
  4. Pravin Damle

    This is good social initiative and platform for writers.

    Reply
  5. Dr. Amar Chakraborrty, Assistant Professor of English, GACC, Sami

    In our increasingly digital world, where tweets, texts, and emojis dominate communication, the act of sitting down with a pen and paper seems almost archaic. Yet, there’s a timeless and powerful practice that continues to endure, providing solace, reflection, and a sense of connection to generations past: keeping a common journal. And the ‘Hakara’ gives a vista to the scholars to express their creative excellence.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *