Loading...
छायाचित्र सौजन्य: रोहन बांदेकर आणि वेन्सी मेन्डेस
कौस्तुभ सोमनाथ नाईक हे मराठी व इंग्रजीमध्ये लिहितात. गोव्यातील हंस संगीत नाट्यमंडळ ह्या नाट्यसंस्थेचे समन्वयक असून ते सध्या दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कला व सौंदर्यशास्त्र विभागात गोव्यातील मराठी रंगभूमीच्या इतिहासावर संशोधन करीत आहेत.
अभिषेक मजुमदार हे बेंगलुरू येथे राहाणारे नाटककार, दिग्दर्शक, नाट्यप्रशिक्षक आणि अभिनेते आहेत. त्यांच्या नाटकांना हिंदू मेट्रो प्लस नाट्य-सन्मान आणि द टोटो फंडस द आर्ट्स नाट्यसन्मान मिळाले आहेत. त्यांची नाटके भारत आणि इंग्लड मध्ये सादर केली गेली आहेत.
हाकारा वर येणारे मजकूर मला सवडीने वाचायची सवय लागली आहे. यावेळी मी नट म्हणून काम केलेलं ‘कौमुदी’ हे मराठी नाटक हाकारावर प्रकाशित झालेलं बघून आनंद झाला.
हे सुंदर नाटक मराठीत अनुवाद करणाऱ्या कौस्तुभचे कौतुक करावे तितके कमी. मराठी भाषेवरील त्याचे प्रभुत्व , सहजसुंदर शैली आणि स्थानिक संदर्भ यामुळे ते अत्यंत प्रयोगक्षम वाटतं