Skip to content Skip to footer

हाक १८ / Call 18

Discover An Author

॥ मिथक ॥

एखादा प्रसंग, समूह  किंवा व्यक्तीभोवती गुंफलेली गोष्ट मिथकाचे रूप घेते. इतिहास आणि स्मृती-पुराणातून चालत आलेले आणि सार्वकालिक आशयात रूपांतरित मिथक भवतालाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन प्रदान करत असते. निसर्ग आणि समाज-संस्कृती व्यवहार किंवा श्रद्धा आणि समजुती यांचे दर्शन मिथकं घडवत असतात. पुराणकं, आख्यायिका, लोककथा, रूपकं किंवा बोधकथा अशा विविध रूपात मिथके सांगितली आणि ऐकली जातात, दाखवली आणि पाहिली जातात किंवा लिहिली आणि वाचली जातात. 

मिथकं प्रवाही असतात: आकाराला येतात, तयार केली जातात. कधी अलौकिकात  संचार करणारे तर कधी दैनंदिन जीवनाला प्रभावित करणारे मिथक समाज आणि संस्कृतीचा आरसा असू शकते. पारंपरिक गोष्ट, मौखिक कथन, चित्र, सादरीकरण किंवा दृकश्राव्य माध्यमातून जनमानसात लोकप्रिय असलेले एखादे मिथक व्यक्ती आणि समाजाला नव्या विचारांची दिशा देत असते. कधी-कधी, एखादे मिथक रंगवलेली गोष्ट किंवा पसरवलेली अफवाही असू शकते.    

तुम्ही मिथकांकडे कसे पाहता? वैचारिक धारणा, भावविश्व किंवा सर्जनशील निर्मितीशी मिथकांचे नाते कसे असू शकते? विशिष्ट काळ आणि अवकाशाची  चौकट मोडून होणारा मिथकाचा मुक्त संचार व्यक्ती आणि समाजाला कसा प्रभावित करत असतो? सत्तेच्या केंद्रस्थानी असणारा समाज, व्यक्ती किंवा राज्य-व्यवस्था आपापल्या मिथकाची निर्मिती कोणत्या प्रकारे करत असतात? नाविन्यपूर्ण अभ्यास आणि पद्धतींद्वारे मिथकांचा शोध तसेच पुनर्शोध घेण्याच्या कोणत्या संशोधन आणि सर्जनशील निर्मितीच्या शक्यता असू शकतात?   

‘हाकारा‘च्या १८ व्या आवृत्तीतून मिथकांच्या वेगवेगळ्या रूपांचा आणि त्यांच्या कलात्म अभिव्यक्तीचा शोध/पुनर्शोध आम्ही घेऊ इच्छितो. 

तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतक, साहित्यिक, कवी, दृश्य-माध्यमातील कलाकार, समीक्षक किंवा गुंफणकार (क्युरेटर) असाल आणि तुम्हाला ‘मिथक’ या विषयात रूची असेल तर ‘हाकारा’च्या अठराव्या आवृत्तीच्या पारावर तुमचे स्वागत आहे.

तुमचे लिखाण/कलाकृती मार्च १५, २०२३ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. नियोजित अंकासाठी आपण पाठविलेले साहित्य समर्पक असेल तर आम्ही आपल्याशी संपर्क साधू. निवडक लेख/कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या अंकात केला जाईल.

अधिक माहितीसाठी, इथे भेट द्या. 

आशुतोष पोतदार  
संपादक, हाकारा । hākārā

(‘हाकारा’च्या अठराव्या आवृत्तीच्या अतिथी संपादक पूर्वी राजपुरिया असतील.)

 

॥ Myth ॥

For a story to be a myth, it must have travelled through time. It must have changed multiple hands on its meandering journey, with each hand shaping it in some way big or small. As this form of story travels from one point to another, it morphs into myriad ways. While the specificities of a myth that ground it in a certain socio-political or historical context may change, the ideas that form its core persist through time. 

You can tell a lot about a society from the mythology that it generates. These myths may serve as carriers of society’s dominant value system; they may reveal the things people feared, and the things they revered. A myth about a person can make them seem larger than life, or decimate their reputation; a myth about a place can draw people to it from far and wide, or it can drive people away. Present in all media, including oral, print, and electronic, myths have a way of affecting our psyche in deeply personal ways. 

At times, a myth is associated with falsification, a morphing of truth to support devious intentions. It is at odds with hard, empirical fact–data that seeks to reduce the world to pure information. While myth speaks to feelings, data speaks to rationale. While myth is characterised by fluidity, data remains unchanged. 

What do myths mean to you? How do you visualise a myth in your own creative work? How does the free circulation of myth — breaking the bounds of time and space — affect individuals and society? How do societies, individuals or state-systems at the centre of power create or rediscover a myth and provide their own meaning to it? What research and creative production possibilities might there be for exploring or reinterpreting a myth through innovative methodologies?

With such questions and concerns, we would like to receive submissions from artists, scholars, researchers or writers for our 18th edition.

If you are a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, social scientist, translator, curator or anyone who is interested in addressing the theme of ‘Myth’, do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by March 15, 2023 to info@hakara.in. Please see the submission guidelines here. Select works will be published in the 18th issue of हाकारा । hākārā. 

Ashutosh Potdar
Editor, हाकारा । hākārā

(Purvi Rajpuria will be the Guest Editor for the 18th Hakara edition.)

Post Tags