हाक ९

Call 9

प्रतिबिंब 

आरसा, पाणी किंवा आपल्या मनात उमटणारी प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब. अशी प्रतिमा प्रकाश किंवा नाद रूपातही आपल्याला जाणवू वा भासू शकते. विचारांच्या स्वरूपात उमटणारी प्रतिबिंबं पुढं जाऊन प्रतीकं, रूपकं किंवा विधी-रूपांमध्ये प्रकट होतात.

प्रतिबिंब हे वस्तू किंवा भवताल आणि त्याची प्रतिमा यांतलं नातं दर्शवितं. त्यामुळे ते आभासी असू शकतं, तसंच भवतालाचं भान देणारं, किंवा त्याचं सार सांगणारंही असू शकतं. कधीकधी ते वस्तूचं प्रतिरूप म्हणून आपल्यासमोर येतं आणि त्या वस्तूचं सखोल आकलन करून देतं. यातून तिचं वेगळंच रूप आपल्याला कळू शकतं. 

मग प्रतिबिंब म्हणजे नेमकं काय? एखाद्या वस्तूचं दिसणं, अंतरंग, सारतत्त्व की त्यापेक्षा वेगळं काहीतरी? प्रतिबिंब हे सत्य असतं की तो असतो एक आभास? बिंब आणि प्रतिबिंबातलं परस्परावलंबी आणि सहजीवी नात्याचं स्वरूप काय असतं? आपल्या भवतालाताचा वा जगण्यातल्या वास्तवाचा या नात्यावर कसा प्रभाव पडतो? मानवी समाज बिंब-प्रतिबिंबांकडे प्रतीकं, कला तसंच विधीरूपं, आणि सांस्कृतिक व्यवहारातून कसे पाहात असतात? 

तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतक, साहित्यिक, कवी, किंवा दृश्य-माध्यमातील कलाकार, समीक्षक, किंवा गुंफणकार (क्युरेटर) असाल आणि तुम्हाला ‘प्रतिबिंब/Reflection’ या विषयाच्या संकल्पना-निर्मिती-व्यवहारामध्ये रूची असेल, तर ‘हाकारा । hākārā’च्या नवव्या आवृत्तीच्या पारावर तुमचे स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती नोव्हेंबर ७ , २०१९ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. लिखाण व कलाकृती पाठविण्याच्या सूचनांसाठी पाहा: www.hakara.in. निवडक लेख/कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल.

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā


Reflection

Reflection is a mirror image. It could also be the essence of an object in the form of light, sound or thoughts. One may look at it as a dialogue between the object and its image that provides an illusionary reciprocation or a better understanding of the object. At times, it could be considered as a counterpart of an object that may provide a different understanding of the object itself. 

हाकारा । hākārā is interested in exploring the theme of reflection in its 9th edition.

Is reflection the self of the object or is it other than the object? Do we understand reflection as real or illusionary? How do the object and the reflection come in interdependent and symbiotic relationship to each other? In which ways do reflections in everyday life shape the ‘real’ in the world? How do the individual and community interpret reflection through rituals, symbols, artistic expressions or cultural forms? 

With such questions and concerns, we would like to receive submissions from artists, scholars, researchers and writers. Do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by November 7, 2019 to info@hakara.in. For submission guidelines, please visit: www.hakara.in

Select works will be published in the forthcoming 9th edition  of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā

Acknowledgement: The theme was suggested by Shreya Panchal in response to our appeal for Hakara’s new edition.


लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

Submission Guidelines

  1. In response to primary focus of upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If contributor wants to maintain certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. For visual work submission, image size has to be 150 or more resolution. Please share details of art works including title, medium, size and year. In case, images included do not belong to the contributor, contributor should provide source of images.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
  6. We require a title page with contributor’s contact information, a short abstract and an contributor’s bio as part of the submission process.
  7. Submission must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from original writer/publisher if the work will be accepted by  हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from हाकारा । hākārā team in a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.

7 comments on “Appeal for Call 9

  1. Asmita.revankar

    I like this book thot s and look

    Reply
  2. Asmita.revankar

    My art journey continues this way… I thought

    Reply
  3. Rohen Dumbre

    I would like to send my photography artwork to hakara

    Reply
    • adminhakara

      Thank you for your interest. Please share your work at info@hakara.in

      Best
      Team Hakara

      Reply
  4. Prachiti narayan parab

    संस्कृतीचा प्रवाह

    आरसा बनूनी प्रवाह,वाहतो शतके किती।
    वाहणाऱ्या जळी उमटली, भारतीय संस्कृती।

    एके काळी निर्मळ नभ हे निर्मळ पात्री वाहे।
    निळेशार सौंदर्य अपुले,या आरशात पाहे।
    पाहू म्हटले आता नभाने,तर प्रश्न उभा राहे।
    नदीत पाहतो मजला की कचऱ्यात पाहतो आहे!

    एकेकाळी वसली गावे, शेते बहरली किती।
    हिरवाईच्या छटा उमटल्या, या पात्रा भोवती।
    आज कंपन्या उदयोग अन इमारती वसती किती।
    आरशावर प्रदूषणाचे गढूळ थर हे साचती।

    शुभ्र,स्वच्छ अन परोपकारी, संस्कृती प्रवाही।
    गोडे खारे मिलावटीचे,जल पाश्चीमात्यही वाही।
    सामावूनी घेता प्रवाह,वागणे तयांचे साही।
    सहनशीलते अंती प्रवाह, रुद्रावतार घेई।
    -प्रचिती परब

    Reply
    • Prajakta Atul

      Tell me something about your upcoming issue. The central theme, the subject line, the idea behind the upcoming issue.

      Reply
      • adminhakara

        Thank you for writing. We will be announcing the next call soon.

        Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *