Skip to content Skip to footer

हाक २३ / Call 23

Discover An Author

हाक २३ : प्रवाह 

दगडधोंड्यांतून खळाळत वाहणारा ओढा, मैत्रीतला ओघवता संवाद, आणि जगण्याच्या विविध स्तरांतून झिरपणाऱ्या भावना आणि पसरणारे विचार — निरनिराळ्या कल्पनांनिशी आणि कृतींनिशी पुढे वाहत जातो तो प्रवाह आणि प्रवाहीपण माणसाचा काळ आणि अवकाश व्यापून टाकतात.

हाकारा | hākārāच्या २३व्या आवृत्तीतून आम्ही ‘प्रवाह’ आणि ‘प्रवाहीपण’ यांच्या विविध आयामांचा  दृश्यरूपांतून आणि कथनरूपांतून, सर्जनशील निर्मितीतून आणि तात्त्विकक मांडणीतून शोध घेऊ इच्छितो.  

मानवी जीवनात प्रवाही असणं नैसर्गिक असतं आणि ते सतत बदलत असतं. नातेसंबंधांतलं आणि संवादातलं छानसं प्रवाहीपण आपल्याला मोकळेपणा देतं, आपलं दुःख सुसह्य करतं, मनाचं भरणपोषण करतं, आणि आपल्याला काळाशी सुसंगत ठेवतं. प्रवाह नेहमी सौम्य व खेळकरच असेल असं नाही. तो कधीकधी महापूर, वादळं, बेभान समुद्राच्या लाटा यांतून रुद्रावतार घेऊन, निर्मम बनून होत्याचं नव्हतं करून टाकतो. आयुष्य म्हणजे घटनांचा आणि कृतींचा अव्याहत, एकरेषीय प्रवाह नसतो, आणि तो तसा असूही शकत नाही. विसंगती आणि व्यत्यय या गोष्टी प्रवाहाचा भाग असतात. त्या आपल्याला थांबायला आणि विचार करायला भाग पाडून बदलत्या काळात आणि बदलत्या परिस्थितीत घटितांचा पुनर्शोध घेण्यास प्रवृत्त करतात.

काही वेळेस, विशिष्ट व्यक्तींना आणि समुदायांना उतरंडीच्या सत्ताकारणात प्रवाहाचा भाग बनण्यापासून वंचित ठेवलं जातं. त्यांना बाजूला सारत गप्प बसवलं जातं, आणि दुर्लक्षिलं जातं. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उतरंडीच्या व्यवस्थेत, फक्त मर्जीतील निवडक व्यक्तींना आणि समुदायांना प्रवाहात सामील करून घेतलं जातं. पण दूरदृष्टी असलेले विचारवंत, कलाकार आणि कार्यकर्ते बंड करत, नवे विचार मांडत आणि क्रांतिकारी बदल घडवत साचलेल्या आणि नियंत्रित प्रवाहाला मुक्त करतात, नवे मार्ग दाखवतात आणि वेगळे दृष्टिकोन प्रदान करतात.

तुमच्या मते प्रवाह आणि प्रवाहीपण म्हणजे काय? भवतालातील प्रवाहीपण तुम्हाला रोमांचित करतं का ? अव्याहत आणि सातत्यपूर्ण असणाऱ्या प्रवाहाचं सर्वव्यापीपण तुम्हाला जाणवतं का ? व्यक्तींचे आणि समाजाचे प्रस्थापित प्रवाह आणि प्रतिप्रवाह यांच्याशी कोणत्या प्रकारचं नातं असतं ? तुमच्या सर्जनशील आणि चिंतनशील निर्मिती-प्रक्रियांतून आणि कृतींमधून तुम्ही प्रवाहाच्या आणि प्रवाहीपणाच्या नोंदी कशा प्रकारे ठेवता ? तसंच, सर्जनशील आणि चिकित्सक विचारप्रक्रियेतून त्यांना कसे सामोरे जाता आणि त्यांचे अन्वयार्थ लावता?

अपेक्षित साहित्य आणि कलाकृती: कथात्म साहित्य, नाट्यात्म कथनरूपं, चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक लेखन, प्रवासवर्णनं, दृश्यरूपात्मक अभिव्यक्ती, चित्रकृती, छायाचित्रं, चित्रपट आणि चित्रफिती, प्रयोगात्म सादरीकरणं, आणि काष्ठ, कागद इत्यादी विविध साधनद्रव्यांचे सर्जक आविष्कार.

साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०२५.

अंक-प्रकाशन : ऑगस्ट २०२५.

इ-पत्राद्वारे आपले साहित्य पाठवणं अपेक्षित नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

साहित्य पाठवण्यासंबंधीच्या सूचना इथे पाहू शकता. कृपया आपलं साहित्य इथे दुवा दिलेल्या गूगल-फॉर्मद्वारेच पाठवावं.

इ-पत्राद्वारे आपले साहित्य पाठवणं अपेक्षित नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

आशुतोष पोतदार 
संपादक, हाकारा । hākārā

पूर्वी राजपुरिया
सहयोगी संपादक, हाकारा । hākārā 

संपादन-सहकार्य: अनघा मांडवकर आणि पल्लवी सिंग 

Call 23: Flow

The gentle rhythm of a stream through rocks, the ease of friendly conversation, and the pervasive flow of emotions and thoughts. It’s the flow — to move forward with ideas and actions and flowness — that has been part of our lives marking the passage of time, space and people. 

हाकारा | hākārās 23rd call aims at reflecting upon the idea of ‘flow’ and ‘flowness’ through visual and narrative forms, artistic and reflective practices.

In our lives, flow is natural and change is constant. At its best, flow is release. It softens grief, nourishes spirit, and reminds us that we belong to time. However, flow isn’t always gentle. It can be uncontainable — the flood, the storm, the ocean, a rumour and an anger — wild and ruthless, changing the course of the action. Life is not and cannot be seen as an unbroken, linear flow of events and actions. Aberrations and disruptions are part of every journey, sometimes forcing us to pause, reflect, and reinvent in the face of changing times and contexts. 

At times, certain individuals and communities are denied to be part of the flow within the hierarchical power structure. They are stunted, silenced, and left unseen. Social, cultural, and economic hierarchies often determine the flow available to various individuals and communities. Through revolutionary changes; dreamers and visionary-activists protest and break the flow that is stagnant and manipulative. They show new ways and vision to humanity.

What does flow mean to you? How are you excited by the flowness in life? Do you feel the persistent, relentless, and omnipresent existence of flow? How have individuals and societies responded to established movements and countermovements? How do you document and reflect on flow through your creative and critical practices?

Accepting Submissions for: 

Essays, Fiction, Poetry, Visual Narratives, Art Criticism, Book Reviews, Cultural Criticism or Translations.

Submission Deadline: July 15, 2025.

Publication: August 2025.

Submission Guidelines: You can read the detailed submission guidelines here: https://www.hakara.in/submission-guidelines/

Please use the following link to the google form to send us your work.

We are not accepting email submissions.

Ashutosh Potdar
Editor, हाकारा | hākārā

Purvi Rajpuria
Associate Editor, हाकारा | hākārā

Editorial Support: Anagha Mandavkar and Pallavi Singh 

Image credit: Artwork by Ravikumar Kashi. Photography by Philipe Calia for the Museum of Art & Photography (MAP).

Post Tags

1 Comment

  • Leena Stanley
    Posted 12 मे , 2025 at 7:34 am

    Sir, I would like to know the topic/theme intended for the upcoming edition.

Leave a comment