परतणे
गतकाळाकडे पाहत आणि भविष्याचा अंदाज घेत वर्तमानकाळातील आपला प्रवास सुरू असतो. ह्या प्रवासात, अनेकदा आपण थांबतो आणि एखाद्या वस्तूकडे, क्षणाकडे किंवा स्मृतीकडे परत जातो. उदाहरणार्थ, पूर्वी कधीतरी पाठीवर पडलेली एखादी कौतुकाची थाप आपल्याला पुन्हा हवी असते, किंवा एखाद्या चविष्ट पदार्थाची जिभेवर रेंगाळणारी चव आपल्याला पुन्हा घ्यायची असते. ह्याउलट, एखाद्या ओंगळवाण्या नजरेचा स्पर्श मात्र आपण विसरू पाहतो. असे हे ‘परतणे’ निर्मिती-प्रक्रियेतही दिसून येते; एखादे लेखनकार्य पूर्ण झाल्यानंतर सुद्धा लेखक ते पुन्हा वाचतो आणि त्यातील अधिक अर्थच्छटा असणारं रूप त्याला गवसू शकतं. त्याचप्रमाणे, एखादी गायिका समेवर येण्यातून सौंदर्यतत्त्वाचा शोध घेते. व्यापक पातळीवर विचार करताना, चिंतनशील व्यक्ती आणि समाज दोघेही भूतकाळातील क्षणांकडे परतत, त्यांकडे चिकित्सक आणि डोळस नजरेने पाहत समृद्ध जीवनदृष्टी देताना दिसतात.
हाकारा । hākārāच्या २४व्या आवृत्तीत आम्ही तुमच्यासोबत ‘परतणे’ ह्या संकल्पनेला समजून घेत त्याविषयीच्या चिंतनपर साहित्याची आणि कलाकृतींची गुंफण मांडू इच्छितो. हे करताना, आमच्या मनात उपस्थित होणारे काही प्रश्न आणि मुद्दे आहेत, ते पुढीलप्रमाणे :
तुमच्या मते, विविध समाजांमधील आणि संस्कृतींमधील ‘परतून पाहण्या’च्या वृत्तींचे आणि कृतींचे स्वरूप कशा प्रकारे वेगळे आहे, आणि त्यांचा विकास कसा झाला आहे ? मागे वळून पाहण्याच्या ह्या सवयीचा आपल्या दैनंदिन जीवनाच्या ओघावर कोणता परिणाम होत असतो ? सरून गेलेल्या क्षणांकडे, मागे पडलेल्या अनुभवांकडे किंवा सोडलेल्या जागेकडे परतणे म्हणजे नेमके काय असते ? परतण्याच्या कृतीत, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे (क्षण, अनुभव, वस्तू) परततो, तेव्हा खरोखर नेमके काय बदलते — ती गोष्ट स्वतः, की तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ? केवळ मागे वळून पाहणे हेच परतणे आहे, की त्याचा अर्थ त्या मागे पडलेल्या अनुभवात पुन्हा एकदा जगणे असा आहे ? ‘परतणे’ ह्या संकल्पनेतून कलेचे कोणते नवे घाट आकारू शकतात ? सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितींमुळे ओढवलेल्या मानहानीकारक अनुभवांकडे संवेदनशील व्यक्ती आणि समाज कशा पद्धतीने परतून पाहतात ? अशा अनुभवांकडे परतण्याची प्रक्रिया त्यांच्यासाठी कशा प्रकारे घडते ?
अपेक्षित साहित्य आणि कलाकृती : कथात्म साहित्य, नाट्यात्म कथनरूपं, चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक लेखन, प्रवासवर्णनं, दृश्यरूपात्मक अभिव्यक्ती, चित्रकृती, छायाचित्रं, चित्रपट आणि चित्रफिती, प्रयोगात्म सादरीकरणं,आणि काष्ठ, कागद इत्यादी विविध साधनद्रव्यांचे सर्जक आविष्कार.
साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख : ऑक्टोबर ३०, २०२५.
अंक-प्रकाशन : डिसेंबर २०२५
लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना
इ-पत्राद्वारे आपले साहित्य पाठवणं अपेक्षित नाही. आपलं साहित्य इथे दुवा दिलेल्या गूगल-फॉर्मद्वारेच पाठवावं, ह्याची कृपया नोंद घ्यावी. साहित्य पाठवण्यासंबंधीच्या सूचना खाली पाहू शकता.
आशुतोष पोतदार
संपादक, हाकारा । hākārā
पूर्वी राजपुरिया
सहयोगी संपादक, हाकारा । hākārā
पल्लवी सिंग
साहाय्यक संपादक, हाकारा । hākārā
संपादन-सहकार्य : अनघा मांडवकर आणि अस्मिता चौधरी.
To Return
Looking to the past and anticipating the future, we continue our journey in the present. Along the way, we sometimes pause and return to an object, a moment, a memory. For instance, we might long again for a congratulatory pat on the back we once got, or seek to relish the lingering taste of a delicious dish. Conversely, we may try to forget the touch of a lewd gaze. This principle of returning extends into creative processes; even after a writer finishes a piece of work, revisiting it may reveal a more nuanced form. Similarly, a vocalist can discover beauty by returning to a sam or a refrain. On a broader level, contemplative individuals and societies alike return to the past moments to reflect on them with a discerning gaze, thereby cultivating a richer vision for life.
In the 24th edition of हाकारा | hākārā, we wish to explore and curate contemplative writings and artistic works centered around the concept of ‘to return’ with you with the following points and questions:
How, in your view, have the impulses and actions of returning developed in different societies and cultures? How does the act of turning back affect our everyday lives? What does it mean to return to moments passed, to experiences left behind, or to places we have abandoned? When we return to something, does that thing itself change, or does our way of seeing it transform? Is returning simply about re-turning back, or does it mean reliving previous moments and experiences anew? What artistic forms take shape by responding to the act of return? And how do sensitive individuals and societies deal with looking back at humiliating experiences in specific social and economic circumstances?
Accepting Submissions for: Essays, Fiction, Poetry, Visual Narratives, Art Criticism, Book Reviews, Cultural Criticism or Translations.
Submission Deadline: October 30, 2025.
Publication: December 2025.
Submission Guidelines: You can read the detailed submission guidelines given here. Please use the following link to the google form to send us your work. We are not accepting email submissions.
Ashutosh Potdar
Editor, हाकारा | hākārā
Purvi Rajpuria
Associate Editor, हाकारा | hākārā
Pallavi Singh
Assistant Editor, हाकारा | hākārā
Editorial Support: Anagha Mandavkar and Asmita Chaudhary.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
1 Comment
Subhasis Chakraborty
I am pursuing PhD at the Department of History of Art, Kala Bhavana, Visva Bharati, Santiniketan on indian Video Art. Please notify me about the next Call for Submission. Thanks in advance.