आवृत्ती ७ : सीमा / Edition 7 : Boundary
May 2019
आवृत्ती ०७ : हद्द / Edition 07: Boundary
‘हद्द’ म्हणजे दाखवता येणारी रेघ किंवा न दिसणारी लक्ष्मणरेषाही असू शकते. एखादा टापू, अभ्यासाचे कार्यक्षेत्र, विशिष्ट सांस्कृतिक जग वा भौगोलिक प्रदेश, ज्ञानाची वा एखाद्या चित्राची चौकट हद्दीतून ठरत जाते. ‘हद्द’ असते, पण हद्दीला लांघून सर्वव्यापी बनण्याची प्रक्रियाही सुरू असते. ह्यातून नव्या दृश्यांची आणि कथनांची निर्मिती होण्याच्या शक्यता बळावतात. हद्द आखणे आणि पुसणे ह्या प्रक्रियांना समजून घेऊन हाकारा ।hākārā-च्या ७व्या अंकाची मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
‘Boundary’ is a line, physical or abstract, that defines the limit of something: an area of study, geographical location, cultural field, discipline or even a frame of a painting. By looking at historical narratives, cultural practices and contemporary art forms, artists and writers in हाकारा । hākārā’s seventh edition look into the complex nature of a ‘Boundary’ that is being re-defined and re-negotiated.