Pt. Raghunandan Panshikar
Pandit Raghunandan Panshikar is one of India's leading vocalists, trained in the Jaipur-Atrauli gharana. He is the son of the renowned thespian Prabhakar Panshikar. After beginning his training under Shri. Vasantrao Kulkarni, Pandit Raghunandan Panshikar spent two decades under the tutelage of one of India’s most respected musicians, Gaansaraswati Kishori Amonkar. He is an exponent of various genres of Indian music, including abhang, ghazal, thumri, and even Carnatic music. Pandit Panshikar has performed at several prestigious venues in India and abroad, including the Sawai Gandharva Mahotsav (Pune), the Dover Lane Music Conference (Kolkata), Hari Vallabh Sangeet Sammelan (Jalandhar), Tansen Samaroh (Gwalior), and the Kesarbai Kerkar Sangeet Samaroh (Goa). He is the recipient of several awards, including the Smt. Manik Varma Puraskar (Pune), Sangeet Kala Ratna Puraskar (Patna), Prabha Atre Gaurav Puraskar, and the Pt. Ramkrishnabua Vaze Puraskar.
पंडित रघुनंदन पणशीकर हे जयपूर-अत्रौली घराण्याचे विख्यात गायक आहेत. ते प्रसिद्ध मराठी रंगकर्मी प्रभाकर पणशीकर ह्यांचे चिरंजीव असून, त्यांनी श्री. वसंतराव कुलकर्णी ह्यांच्याकडे सुरुवातीचे संगीत-शिक्षण घेतले, आणि त्यानंतर थोर भारतीय गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर ह्यांच्याकडे दोन दशके संगीताचे शिक्षण घेतले. पंडित पणशीकर अभंग, गझल, ठुमरी, आणि कर्नाटकी संगीतासह भारतीय संगीताच्या विविध शैलींचे गायक म्हणून मान्यता पावले आहेत. पंडित पणशीकर ह्यांनी देशात आणि परदेशात, ‘सवाई गंधर्व महोत्सव’ (पुणे), ‘डोव्हर लेन म्युझिक कॉन्फरन्स’ (कोलकाता), ‘हरी वल्लभ संगीत- संमेलन’ (जालंधर), ‘तानसेन समारोह’ (ग्वाल्हेर), आणि ‘केसरबाई केरकर संगीत- समारोह’ (गोवा) इत्यादी अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांत आपली कला सादर केली आहे. पंडित पणशीकरांना ‘श्रीमती माणिक वर्मा पुरस्कार’ (पुणे), ‘संगीत कलारत्न पुरस्कार’ (पाटणा), ‘प्रभा अत्रे गौरव पुरस्कार’ आणि ‘पं. रामकृष्णबुवा वझे पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.