Manik Naik
माणिक नाईक या आपल्या कॉलेजच्या दिवसांपासून मराठी नाटकात सक्रिय राहिलेल्या असून त्या सद्या ‘आजी’ असण्याच्या सर्व भूमिका आवडीने पार पाडत आहेत. नाटकात अभिनय करत आणि महाराष्ट्र राज्याच्या खो-खोच्या संघातुन खेळत त्यांनी मराठी साहित्यातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑल इंडिया रेडिओ वर लेखन तसेच अनुवादाची विविध कामे केलेल्या माणिक नाईक वेळ मिळेल तसं नातवंडांना गृहपाठ करायला मदत करतात आणि अनुवादाची कामेही करतात.