
Gayatri Lele
गायत्री लेले सध्या मिठीबाई महाविद्यालय, मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्या मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात, तसेच रुईया महाविद्यालय, मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पी.एचडी. प्राप्त केली आहे. त्यांचा पीएच.डी.चा अभ्यास 'ईशान्य भारतातील नागा अस्मिता, त्यांचा राष्ट्रवाद आणि भारतीय राज्यसंस्थेचे धोरण' ह्या विषयाशी संबंधित होता. गायत्री लेले ह्यांना लेखन, शास्त्रीय संगीत आणि कविता-साहित्य ह्यांची आवड आहे.