चंद्रकांत काळुराम म्हात्रे
चंद्रकांत काळुराम म्हात्रे हे नवी मुंबई येथे राहणारे द्विभाषिक कवी, व संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. व्यावसायिक भाषांतराच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका दशकाहून अधिक काळाच्या अनुभवाबरोबरच, प्राथमिक ते पदव्युत्तर स्तरांवरील इंग्रजीचे अध्यापन, आणि साहित्यिक व भाषाशास्त्रीय संशोधन ह्या क्षेत्रांतील दोन दशकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांचे वन हंड्रेड पोएम्स ऑफ चोखा मेळा हे पुस्तक जून २०२२पासून मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. ऑनर्स (इंग्रजी) ह्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, त्यांना संत सोयराबाई, संत कर्ममेळा आदींच्या लेखनाच्या इंग्रजी भाषांतरासाठी पेन (PEN) ह्या संस्थेची ‘SALT बुक सॅम्पल ग्रँट’ प्राप्त झालेली आहे. क्रम्ब्स ऑफ मी, वन हंड्रेड पोएम्स ऑफ तुकाराम, दि ऑटोबायोग्राफी ऑफ संत बहिणाबाई आणि निवडक संत चोखामेळा ही त्यांची इतर काही पुस्तके आहेत. सध्या ते संतसाहित्याच्या भाषांतराव्यतिरिक्त, सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या ‘संतसाहित्य युनिकोडमध्ये’ ह्या प्रकल्पाच्या समन्वयन-संपादनाचे काम करीत आहेत.

