Bhaskar Hande
भास्कर हांडे हे चित्र-शिल्पकार, मुद्रा-चित्रकार तसेच दृश्य-माध्यमातील इतर वेगवेगळ्या रूपांत काम करणारे कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते कवी असून भाषा, संत-साहित्य आणि इतिहास विषयक लेखनही करतात. नेदरलँडमध्ये चाळीस वर्षे वास्तव्यास असलेल्या हांडेंनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा विशेष अभ्यास करून त्यांच्या रंग, रूप आणि आकारातुन ‘तुझे रूप माझे देणे’ या प्रकल्पातून दृश्य-दर्शन घडविले आहे. हा प्रकल्प चित्र-शिल्प संग्रहालय रुपात वैश्विक कला पर्यावरण, औंध (पुणे) येथे अभ्यासक व रसिकांसाठी प्रदर्शन रूपात मांडण्यात आला आहे.