
Arvind Jadhav
अरविंद जाधव यांनी इंग्रजी व भाषाविज्ञान या विषयांतून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते दोन्ही विषयांतून विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथून बोधात्मक अर्थविज्ञान या विषयातून पी.एचडी. प्राप्त केली आहे. ते यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असून ते विविध विषयांवर इंग्रजी व मराठी भाषांतून लेखन करतात. त्यांना मराठी व इंग्रजी भाषा, वाङ्मय, संस्कृती, व भाषांतर यांची आवड आहे.