Skip to content Skip to footer
Picture of Adrienne Rich

Adrienne Rich

एड्रीएन रिच् (१९२९- २०१६) ह्या नामवंत अमेरिकन कवीच्या या दोन अनुवादित कविता. कवी, लेखक, विचारवंत, शिक्षक, प्रेयसी, आई अशा अनेक भूमिका रिचने साकारल्या. तिच्या लेखणीत स्त्रीवादी आणि डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो. सामाजिक विषमता, अन्याय, युद्ध, क्रांती, स्वत्त्व, लैंगिकता, प्रेम इ. विषयांवर भाष्य करणारी रिचची लेखणी आधुनिक जगाशी सरळ भिडते, प्रश्न विचारते. लग्न आणि तीन मुलं झाल्यानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी आपली प्रेयसी मिशेल क्लीफ् ह्या जमैकन लेखिकेबरोबर रिचने राहण्यास सुरूवात केली. समलिंगी प्रेमावरच्या तिच्या ‘ट्वेंटी वन लव्ह पोएम्स’, तसेच “कम्प्लसरी हेट्रोसेक्शुअॅलीटी अॅंड लेस्बिअन एक्सपीरीएंस” हा लेख प्रसिद्ध आहे. ह्या शिवाय ए चेंज ऑफ वर्र्ल्डडायमंड कटर्स अॅंड अदर पोएम्सस्नॅपशोट्स ऑफ ए डॉटर-इन-लॉडायविंग इन टू द रेक  इत्यादि कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.