अभिधा निफाडे
अभिधा निफाडे ह्या व्यवसायाने वकील असून, त्या ‘अरुणा एज्युकेशन फाउंडेशन’च्या संस्थापक आहेत. ‘अरुणा’च्या माध्यमातून अभिधा ग्रामीण आणि असंघटित क्षेत्रातील महिलांबरोबर कायदेविषयक साक्षरता, आर्थिक स्वावलंबन, सुरक्षितता आणि कामगार-हक्क ह्या विषयांवर काम करतात. तसेच, त्या महाविद्यालयीन मुलींबरोबर कौशल्यविकास, स्व-जाणीव, आणि नेतृत्वनिर्मिती ह्यांसंबंधीच्या उपक्रमांत कार्यरत आहेत. महिलांना केवळ लाभार्थी बनवणे नव्हे, तर त्यांना परिवर्तनाच्या प्रक्रियेतील सक्रिय घटक म्हणून सक्षम बनवणे ही अभिधा ह्यांच्या कामामागची प्रेरणा आहे.

