पुनरावृत्ती
पुनरावृत्ती घडत असते. बदलत राहणारा काळ आणि घटना पुनरावृत्तीद्वारे एका रचनेत बांधले जात असतात. पृथ्वीच्या नियमित गतीतून ऋतुचक्र आकारते आणि दिवस-रात्रीची दिनचर्या ठरते. परत-परत होणाऱ्या बदलांना एखाद्या साच्यात बसवून त्यांचे वर्गीकरण करून स्वतःच्या सोयीसाठी त्यात सुव्यवस्था आणू पाहणे ही माणसाची सहज प्रवृत्ती असते.
‘पुनरावृत्ती’ या विषयाला मध्यवर्ती ठेवून ‘हाकारा’च्या सतराव्या आवृत्तीची मांडणी आम्ही करू इच्छितो.
एखादी कृती परत परत परत केली जात असते. उदाहरणार्थ, दात घासणे, आंघोळ करणे, जेवण करणे, निरनिराळ्या कामासाठी बाहेर पडणे किंवा खर्चाची बिले भरणे. असे करण्यातून, एखादी व्यक्ती मग ती एखाद्या व्यवसायात मग्न असेल किंवा कलानिर्मितीत गुंतलेली असेल, स्वतःला शिस्त लावत असते. कवितेत किंवा संगीतात एखाद्या विशिष्ट शब्दावर वा ध्वनींवर पुनःपुन्हा आघात होत असताना विशिष्ट असा आकृतीबंध किंवा ताल आकाराला येत असतो. किंवा, नाट्यात्म सादरीकरणात, नित्याच्या शारीरिक हालचाली आणि आवाजाच्या सरावातून सहभागी कलाकारांची तसेच त्यांच्या प्रयोगाची तयारी होत असते.
काही जणांना पुनरावृत्तीतून येणारा तोच तो पणा एकसुरी, कंटाळवाणा आणि नीरस वाटू शकतो. यातून, एकाच ठिकाणी आणि एकाच काळात अडकलेपणाची भावना शिरजोर होत जाते. न संपणाऱ्या दैनंदिन घरकामात अडकलेली स्त्री, रोजीरोटी मिळविण्यासाठी दररोजच्या काबाडकष्टात अडकलेले मजूर, सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच त्या कारकुनीत अडकलेला अधिकारीअसे सर्वजण वेगवेगळ्या कारणाने त्याच त्यापणाला वैतागलेले असतात.
काही जणांना तीच ती घडणारी कृती म्हणजे पाठांतराचा सराव असतो जो शिकण्याच्या आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरचा एक टप्पा ठरू शकतो.
व्यक्तीच्या आणि समाजाच्या घडणीत पुनरावृत्ती कोणते मूल्य प्रदान करत असते? आपल्या शारीरिक, बौद्धिक, सर्जनशील आणि सामाजिक व्यवहारात तोच तो पणा कोणती भूमिका निभावत असतो? परत परत घडणारी कृती आपले नेहमीचे जगणे आणि व्यवहार कशा तऱ्हेने बांधून त्यांना एक विशिष्ट रूप प्रदान करत असते? तुमच्या कलात्म जडणघडणीत पुनरावृत्ती कोणते योगदान देत असते? त्याच त्या घडण्यातून येणाऱ्या एकसुरीपणाला सामोरे जात असताना नवनिर्मितीच्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला कसे गुंतवून घेऊ शकता?
तुम्ही संगीतकार, दृश्य-माध्यमातील कलाकार, लेखक, गुंफणकार असाल किंवा समाजशास्त्रज्ञ किंवा तत्त्व -चिंतन मांडणारे असाल तर ‘हाकारा । hākārā’ च्या सतराव्या आवृत्तीच्या पारावर ‘पुनरावृत्ती’ च्या हाकेसाठी तुमचं स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती ऑक्टोबर ८, २०२२ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. निवडक लेख/कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल.
अधिक माहितीसाठी, इथे भेट द्या.
आशुतोष पोतदार
संपादक, हाकारा । hākārā
(‘हाकारा’च्या सतराव्या आवृत्तीच्या अतिथी संपादक पूर्वी राजपुरिया असतील.)
_____________________________________________________
Repetition
Repetition is an inescapable reality of our lives. It is the means through which we structure time and action. The repetitive pattern of the Earth’s movements gives rise to the routine of day and night, and the cycles of summer, spring, monsoon, and winter. The human instinct to categorise, classify, and organise latches on to these repetitive movements to bring order to the free flowing stream of time.
For our 17th edition, we are interested in exploring the theme of ‘repetition’.
We repeat the same tasks at regular intervals of time: we brush our teeth, bathe, pack our lunches, and leave for work on a daily basis; we pay our household bills every month; we keep annual reminders to file our taxes. For an artist or a working professional, the act of repetition is an attempt to discipline their instincts and maintain a consistent practice. In poetry or music, repetition can create emphasis, pattern and rhythm; in performance, it is a tool used to train the body and voice. Repetition can also be an exercise in memorisation, and a step toward learning, and the creation of a form of knowledge.
For some, repetition can be a source of drudgery, boredom, and frustration. It can lead to a feeling of being stuck in a time, place, or a situation. A housewife caught in the cycle of daily chores, a manual labourer bogged down by the need to earn her daily bread, an accountant with a desk job that is stable, but fails to stimulate.
What does a repetitive act mean to a society and an individual where progress is measured in continual production? What role does the act of repetition play in your physical, intellectual, creative, and social life? In what ways does it structure your daily lives, and the world at large? How does it feature in your art practice? How do you negotiate with the sameness of repetition along with the burden of creating something new?
You may be a musician, dancer, performance artist, fiction writer, social scientist, poet, social/political activist, visual artist, cartoonist, critic, photographer, translator, or curator; we invite you to reflect on the theme of ‘repetition’ and contribute to Hakara’s seventeenth edition. Send us your work in Marathi and/or English or in an audio-visual form by October 8, 2022 to info@hakara.in. For submission guidelines, please click here.
Ashutosh Potdar
Editor, हाकारा । hākārā
(Purvi Rajpuria will be Guest Editor for the 17th Hakara edition.)
_____________________________________________________
लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना १. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल. २. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा. ३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा. ४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि वर्ष याची माहिती सोबत जोडा. जर आपल्याला ‘दृश्यांगण’ या विभागात प्रकाशित करण्यासाठी कलाकृती पाठवावयाची असेल तर चित्र/प्रतिमा १००० x ६०० पिक्सेल्स मध्ये असावी. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या. ५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो. ६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा. ७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या. ८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत. ९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे. १०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी. ११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल. १२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल. १३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश पुढीलप्रमाणे जरूर करा. हाकारा | hākārā हे मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या. १४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. १५. आपल्याला काही विचारायचे असेल किंवा साहित्य पाठवायचे असेल तर कृपया info@hakara.in या इ मेल द्वारे आम्हाला संपर्क साधावा.
Submission Guidelines
- In response to the primary focus of the upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
- हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
- The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If the contributor wants to maintain a certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
- The image size has to be 150 dpi or more in resolution for visual work submission. Additionally, If you wish to submit your work to the ‘Panorama’ section, images must be at least 1000×600 pixels. Please share details of artworks including title, medium, size and year. In case, the images included do not belong to the contributor, the contributor should provide a source of the images.
- Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
- We require a title page with the contributor’s contact information, a short abstract and a contributor’s bio as part of the submission process.
- Submissions must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
- For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, and images in the Works Cited list.
- We request the contributor to obtain permission for illustrations, and images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from the original writer/publisher if the work will be accepted by हाकारा । hākārā for the publication.
- Contributors would hear from the हाकारा । hākārā team a month after the submission regarding the decision on consideration of the work.
- For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
- Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā, an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
- At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.
- For any queries and submissions, please e-mail us: info@hakara.in
नव्या अंकाचे स्वागत. नवी कल्पना.
विजयराज बोधनकर …विषय काळाशी अगदी सुसंगत आहे..आजचा माणूस स्थिर का राहू शकत नाही..हा प्रश्न मोठा जिकरीचा आहे..सतत बदल का हवा असतो यावर मला लिहायला नक्की आवडेल
When is the deadline for submissions for Edition 17?
October 08, 2022. Please see the call here: https://www.hakara.in/ashutosh-potdar-11/