हाक १५

Call 15


<हाक १५: प्रवास>

प्रवासाची विविध रूपे असतात. दैनंदिन जगण्यात आपल्यापैकी बहुतेकजण  रोज प्रवास करत असतात, कधी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, भाजीपाला आणायला, तर कधी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना भेटायला. वर्षानुवर्षे ठरावीक मार्गांवरून  पुनःपुन्हा आपला प्रवास होत असतो.  त्यामुळे आपल्याला मार्ग ओळखीचे होतात आणि ठिकाणे आरामदायी वाटू लागतात. काहीवेळेला, क्वचित केलेले प्रवास हे खास असू शकतात किंवा वेदनादायीसुद्धा, अर्थात तो तो प्रवास कसा आणि कुठे संपतो त्यावरही अवलंबून असते. बऱ्याचवेळा, कुठे पोहोचायचे आहे त्यापेक्षा प्रवासच अधिक घटनापूर्ण ठरू शकतो. निरनिराळ्या संस्कृतींमध्ये प्रवासाबद्दल बऱ्याच रीतीभाती रुळल्या आहेत. उदाहरणार्थ, काही ठिकाणी सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून त्या पाळल्या जातात किंवा लांबवरच्या प्रवासाला जाताना तहान आणि भुकेसाठी जिन्नसही घेऊन जायच्या पद्धती आहेत. 

आपल्या आयुष्यातले काही प्रवास हे रूपकात्मकही  असतात. आपला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आणि त्यात येणाऱ्या असंख्य महत्त्वाच्या घटना; लहान मुलांचा निरागसतेपासून परिपक्वतेपर्यंतचा आणि अजाणतेपणापासून  आत्मभानापर्यंतचा प्रवास; आणि तरुणपणीच्या हालचालीपासून म्हातारपणातील जखडलेपणापर्यंतचा आणि जाणतेपणापासून स्मृतिभ्रंशापर्यंतचा प्रवास. तसंच, प्रत्येक वस्तूचाही एक प्रवास असतो.  त्यांचाही प्रवास स्वतंत्रपणे घडत असतो. मग, काही वस्तूंना आपल्या आयुष्यात महत्त्व प्राप्त होते, तर काही वस्तू वापरातून बाद होत जातात. 

व्यक्ती म्हणून अथवा समाज म्हणून आजवर कुठले उल्लेखनीय प्रवास आपण पार पाडले आहेत? या प्रवासाच्या अनुभवातून आपण काय शिकलो किंवा कसे घडलो? आपल्या आजूबाजूला काही अव्यक्त प्रवास तुम्हाला दिसतात का आणि त्यावर तुम्ही प्रकाश टाकू इच्छिता का? ऐतिहासिकदृष्ट्या, विविध माध्यमात ‘प्रवासा’चे चित्रण कसे केले गेले आहे आणि त्यातून आपली समज कशी घडत गेली आहे? प्रवासाचा आपल्या जगण्यावर, समाजावर आणि संस्कृतीवर कसा प्रभाव पडतो? कलाकार आणि लेखकांनी प्रवासाकडे कसे पाहिले आहे?  

तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतन रूपी मांडणी  करणारे अभ्यासक किंवा कथा – कविता करणारे साहित्यिक असाल वा दृश्य-माध्यमातील कलाकार, गुंफणकार (क्युरेटर), किंवा समाजशास्त्राच्या अंगाने विश्र्लेषण करणारे संशोधक असाल, तर तुमचे ‘हाकारा’ पंधराव्या आवृत्तीच्या पारावर ‘प्रवास’ या हाकेसाठी स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती फेब्रुवारी १५, २०२२  पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. 

निवडक साहित्याचा/कलाकृतींचा समावेश हाकारा । hākārā च्या येत्या अंकात केला जाईल. अधिक माहितीसाठी www.hakara.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.  

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई 
संपादक, हाकारा । hākārā

पूर्वी राजपुरिया ‘हाकारा’च्या पंधराव्या आवृत्तीच्या अतिथी संपादक असतील.  

चित्र सौजन्य: अमितेश ग्रोवर

_______

Call 15: Journey

We encounter journeys in  various forms. In our everyday lives most of us undertake physical journeys  to home, to work, to school, to buy vegetables, or to meet friends and family. We go. We come back. The repetition of these journeys along the same routes, over long periods of time, is integral to our familiarity, comfort, and at times, monotonous unease with a place. Other one-off journeys might be more special or painful, depending on the nature of the destination they take us closer to or distance us from. Sometimes  journeys can even be more eventful than the destinations. Several cultures have developed traditions surrounding these journeys through the  rituals that promote safe travels, or common foods that are carried over long distances. 

At the same time, we go through several figurative journeys in our lives. Each of us journeys from birth to death, with multiple milestone moments along the way; we journey from innocence to maturity; from ignorance to consciousness; from mobility to immobility; and from awareness to oblivion. Even objects have journeys, sometimes independent of the people that use them. Overtime they may gain prominence in our lives, or wear away from disuse. 

What are some significant journeys that we have taken as a society, or as individuals? What have we learnt along the way, and how have they shaped who we are today? What are some unspoken journeys of the things around us that you would like to shed light on? How have journeys historically been depicted in the media that surrounds us, and how has this shaped our views about them? How do journeys impact our lives, culture and society? How have artists and writers responded to journeys in their work? 

You may be a fiction writer, social scientist, poet, social/political activist, visual artist, critic, photographer, translator, or a curator; you are invited to send your work in Marathi and/or English in response to our fifteenth edition of ‘Journey’, as you may perceive it. 

Please send in your work by February 15, 2022, to info@hakara.in. For submission guidelines, please visit: www.hakara.in. Selected works will be published in the forthcoming edition of Hakara. 

Ashutosh Potdar and Noopur Desai

Editors, हाकारा। hākārā

(Purvi Rajpuriya will be Guest Editor for the 15th Hakara edition)

Image courtesy: Amitesh Grover


लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

Submission Guidelines

  1. In response to the primary focus of upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If a contributor wants to maintain a certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. For visual work submission, image size has to be 150 or more resolution. Please share details of artworks including title, medium, size and year. In case, images included do not belong to the contributor, a source of images should be provided.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
  6. We require a title page with contributor’s contact information, a short abstract of a submission and a contributor’s bio as part of the submission process.
  7. Submission must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from original writer/publisher if the work will be accepted by  हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from हाकारा । hākārā team in a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.


5 comments on “Appeal for Call 15

  1. sunit kumar barui

    I am a research scholar from west bengal. I would like to be informed about the next call for papers, publication frequency etc about this much appreciated journal.

    Reply
    • adminhakara

      Please keep watching the Next Call space on Hakara Journal’s website as well as our social media handles for regular updates. Thanks

      Reply
  2. Dipak Dharne

    I am Dr Dipak Dharne, assistant professor of English, working at Karanja College, Wardha. I humbly request you to keep me updated whenever with the new themes hakara journal comes up. If I possess the expertise in the related theme, I would like to contribute as per my capacity. Thanking you.

    Reply
  3. kajal kumari

    Can I submit a research paper related to Call 15 now?

    Reply
    • adminhakara

      Hello, Kajal! We have closed to call for submissions for 15th edition. We’ll announce our next open call soon. Please keep watching this space for more updates.

      Thanks,
      Hakara Team

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *