Call 14
< हाक १४ । अडथळा >
अडथळा म्हणजे हालचाल थांबवणारी वा मर्यादित करणारी एखादी वस्तू वा कृती. ती मुक्त विचार किंवा कल्पनांवर नियंत्रण ठेवणारी एखादी शक्तीही असू शकते.
एखाद्या भिंतीसारख्या समोर उभ्या राहण्याऱ्या अडथळ्यामुळे हालचाल किंवा प्रगती शक्य होत नाही. म्हणजे, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित गोष्टीत अडथळा आणण्यातून एखाद्या निर्मिती वा विचारप्रक्रियेसमोर नवनवीन आव्हाने उभी राहू शकतात. पण, त्याच वेळेला, अडथळा म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण केलेली एखादी सुविधा किंवा व्यवस्था असू शकते.
‘हाकारा’च्या चौदाव्या आवृत्तीतून आम्ही ‘अडथळा’ या कृती आणि संकल्पनेला सामोरे जाऊ इच्छितो. आपल्या दैनंदिन जीवनात कोणकोणत्या प्रकारे आपण अडथळ्यांना सामोरे जात असतो? व्यक्तीच्या मानसिक वा शारीरिक स्वास्थ्यावर अडथळा कसा परिणाम करतो? सामाजिक सांस्कृतिक बदलाच्या प्रक्रियांवर हे अडथळे कसा प्रभाव पाडत असतात? सामाजिक उतरंडी, ऐतिहासिक कथने, आणि समकालीन धारणा याद्वारे अडथळ्यांना भिडण्याचे कोणते प्रयत्न झाल्याचे आपल्याला दिसते? सर्जनशील प्रक्रियेतून अभिव्यक्त होताना एखादे रूप, माध्यम किंवा भाषा अडथळा ठरू शकते काय? त्यांना सामोरे जात नवे मार्ग चोखाळण्याचे कोणते प्रयत्न असू शकतात?
याशिवाय अडथळ्याविषयी तुमचे चिंतन, विचार वा अभिव्यक्ती समजून घ्यायला आम्हाला आवडेल. तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतन रूपी मांडणी करणारे अभ्यासक किंवा कथा – कविता करणारे साहित्यिक असाल वा दृश्य-माध्यमातील कलाकार, गुंफणकार (क्युरेटर), किंवा समाजशास्त्राच्या अंगाने विश्र्लेषण करणारे संशोधक असाल, तर तुमचे ‘हाकारा’ चौदाव्या आवृत्तीच्या पारावर ‘अडथळा’ या हाकेसाठी स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती २७ ऑगस्ट, २०२१ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या.
निवडक साहित्याचा/कलाकृतींचा समावेश हाकारा । hākārā च्या येत्या अंकात केला जाईल. अधिक माहितीसाठी www.hakara.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā
<Call 14 | Barrier>
Barrier is an object or an act to block a movement. It may suggest a force that controls our free flowing activities or imagination.
It could also mean an impediment, natural or man-made, that may separate two entities or prevent access to an idea or a space. Barrier could also be understood as an impasse where there is no further movement or progress possible. Alternatively, barrier can be seen as a way to protect or defend oneself.
What are the ways in which we encounter a barrier in our everyday life? In which ways, does the barrier affect an individual? How does the barrier impact processes of social and cultural change in a society? What are the ways in which one breaks the barriers created by structures of social hierarchies, historical narratives, and contemporary practices? In creative practices, does a medium or a language become a barrier and how does one overcome them?
You may be a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, social scientist, or translator; you are invited to respond to our prompt ‘Barrier’, as you may perceive it. We accept entries in Marathi and/or English.
Please send in your work by August 27, 2021, to info@hakara.in. For submission guidelines, please visit: www.hakara.in.
Selected works will be published in the forthcoming edition of Hakara.
Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा। hākārā
लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना
१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.
२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.
३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.
४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.
५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.
६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.
७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.
८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.
९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.
१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.
११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.
१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.
१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.
१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.
Submission Guidelines
- In response to the primary focus of upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
- हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
- The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If a contributor wants to maintain a certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
- For visual work submission, image size has to be 150 or more resolution. Please share details of artworks including title, medium, size and year. In case, images included do not belong to the contributor, a source of images should be provided.
- Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
- We require a title page with contributor’s contact information, a short abstract of a submission and a contributor’s bio as part of the submission process.
- Submission must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
- For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, images in the Works Cited list.
- We request the contributor to obtain permission for illustrations, images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from original writer/publisher if the work will be accepted by हाकारा । hākārā for the publication.
- Contributors would hear from हाकारा । hākārā team in a month after the submission regarding the decision on consideration of the work.
- For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
- Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
- At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.