हाक ११

Call 11


उलथापालथ

नैसर्गिक, सामाजिक वा सांस्कृतिक परिस्थितीत अचानक उद्भवलेल्या बदलांमुळे उलथापालथ घडून येत येते. ‘न भूतो न भविष्यती’ असे हे बदल गोंधळात टाकणारे असतात. अशा बदलांमुळे अख्खी नैसर्गिक व्यवस्था वा सामाजिक रचना उलटसुलट होऊ शकते. होत्याचे नव्हते होऊन जग समजून घेण्याच्या माणसाच्या धारणा बदलू शकतात. अर्थात, काळानुरुप आणि परिस्थितीनुसार उलथापालथीचे परिणामही वेगवेगळे असतात.

व्यक्ती आणि समाज म्हणून आपण या उलथापालथीकडे कसे पाहातो? अनपेक्षित बदलांमुळे आपण खचून जातो की आत्मनिरीक्षणाची संधी म्हणून आपण त्याकडे पाहातो? आपली प्रतिभाशक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि दूरदृष्टीच्या जोरावर भवताल बदलून टाकणाऱ्या बदलांबद्दल मानवी समाज काही आडाखे बांधू शकतो का? उलथापालथीला सामोरे जात असताना मानवी समाज-संस्कृती कशी उत्क्रांत होत असते? प्रचंड गोंधळात टाकणाऱ्या अशा बदलांचा माणसाच्या कलात्म अभिव्यक्तीवर काय परिणाम होतो?

‘हाकारा’ च्या अकराव्या आवृत्तीतून ‘उलथापालथ’ या संकल्पनेवर प्रकाश टाकण्याचा मानस आहे. तुम्ही दृश्य माध्यमात कार्य करत असाल, लिहीत असाल, किंवा ज्ञान-विज्ञान-समाज-संस्कृतीचे अभ्यासक असाल तर तुमचे साहित्य वा कलाकृती आमच्याकडे जरुर पाठवा.

‘उलथापालथ’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने व्यक्त होण्यासाठी तुमच्या मनातील विचार, कल्पनांचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला आमच्याशी चर्चा करायची असल्यासही आम्हाला info@hakara.in या ई-मेल वर जरुर कळवा. साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख जुलै १५, २०२० आहे.

निवडक कलाकृतींचा समावेश हाकारा । hākārā च्या येत्या अंकात केला जाईल. अधिक माहिती तुम्हाला www.hakara.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई

संपादक, हाकारा । hākārā

___________________________________________________________________________

Turbulence

Turbulence is a result of chaotic changes in the environment or in social and cultural contexts. A turbulent situation may lead to the disruption of existing systems and patterns. Its manifestations may vary from place to place and time to time. It could be inexplicable or it may have a series of events behind it that are embedded within and outside the human world. 

Turbulence could transform the way we perceive the world around us.

How have individuals and society been able to respond to turbulence? Have we been able to predict the manner of its unfolding with our imagination and scientific approach? Does the turbulent situation weaken us? Or, do we look at it as an opportunity to introspect about our own lives?

How do cultural and artistic practices shift, shape or evolve while taking these chaotic changes into their fold? With such questions and concerns, we would like to receive submissions from artists, scholars, researchers or writers for our upcoming eleventh edition.

Are you a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, social scientist, translator, curator or anyone who is interested in addressing such questions and concerns about ‘Turbulence’? Do send us your writing in Marathi and/or English or in audio-visual form by July 15, 2020 to info@hakara.in

You are welcome to engage with us in interaction and dialogue over your ideas and the development of your work.

Select works will be published in the forthcoming edition of हाकारा । hākārā. For submission guidelines, please visit www.hakara.in

Ashutosh Potdar and Noopur Desai

Editors, हाकारा । hākārā

____________________________________________________________________________

लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

Submission Guidelines

  1. In response to the primary focus of upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If a contributor wants to maintain a certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. For visual work submission, image size has to be 150 or more resolution. Please share details of artworks including title, medium, size and year. In case, images included do not belong to the contributor, a source of images should be provided.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
  6. We require a title page with contributor’s contact information, a short abstract of a submission and a contributor’s bio as part of the submission process.
  7. Submission must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from original writer/publisher if the work will be accepted by  हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from हाकारा । hākārā team in a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.

One comment on “Appeal for Call 11

  1. Padmini Mehta

    Thank you for the mail and info of call for submission.
    This is my first time written article with my original art works n taken photographs,which i m going to send soon on your mail ID.
    looking forward to have your response or suggestions.

    Regards

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *