Skip to content Skip to footer

About

Discover An Author

About

हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;

a call, a general or a great and continued calling

हाकारा | hākārā  या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणा-या ऑनलाईन नियतकालिकाच्या अवकाश-निर्मितीमागे भवताल, आपण आणि आपली निर्मिती यामधील गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याची भूमिका आहे. जगणं, भाव-भावना, सौंदर्य आणि संस्कृतीविषयक विचार आपल्या कला-दृष्टी आणि निर्मितीवर, लिहिण्यावर आणि वाचण्यावर कसे आणि कोणते प्रभाव पाडत असतात? मानवी बदल कलाविषयक देवाण-घेवाणी आणि सौंदर्य- जाणिवांशी कसे जोडून घेत असतात? सतत बदलत्या आणि प्रवाही असणाऱ्या कला-जाणिवा आपला भवताल कसा घडवत असतात? या आणि इतर मुद्द्यांचं आकलन लिखित आणि दृश्य माध्यमातून हाकारा | hākārā च्या पारावरुन संवादी रीतीनं मांडण्याचा प्रयत्न आहे. काळ, संस्कृती आणि कला यांच्यातील देव-घेव नेहमीच बहुपदरी आणि बहुपेडी राहिलेली आहे. अभिव्यक्ती सद्यकालात घडत जात असते तर उद्याकडे पाहात आताचा काळ गतकाळाशी आपली नाळ जोडून असतो. कलाकृतीमध्ये तीनही काळ एकमेकांत अशा अनोख्या रीतीनं गुंतलेले असतात की त्यांच्यातील सीमारेषा धूसर होतात. त्रि-काळाच्या सत्य आणि आभासी खेळातून कला अभिव्यक्ती, सौंदर्यभान आणि तिचे बदलते निकष यातून समकालीन अभिव्यक्ती साकारत असते. अभिव्यक्तीने निरनिराळे घाट, शैली आणि रचना अंगिकारणं तसंच अशा अभिव्यक्तीचं सखोल आकलन करुन घेणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा तऱ्हेनं आकाराला येणारी नाविन्यपूर्ण निर्मिती आणि चिकित्सक प्रक्रिया ‘हाकारा’चा गाभा असेल.

हाकारा | hākārā च्या पारावरून बोलावण्यामागं लिखित आणि दृश्य कला माध्यमात ऐरणीवर असलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चिंतन आणि समग्र चर्चा घडवून आणणं हा उद्देश आहे. आशय, घाट आणि रचनेचे ‘संहिता’ अंतर्गत आणि ‘संहिता’ बाह्य भवतालाशी असलेल्या आंतरिक संबधांचं विश्लेषण इथं केलं जाईल. कला-माध्यमांचं आंतर-संवादी स्वरुप निरखणं जसं महत्त्वाचं ठरतं, तसंच त्यांची इतिहास, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानासारख्या ‘इतर’ विद्याशाखांशी घातली जाणारी सांगड मोलाची ठरेल.

हाकारा | hākārā चा पार वैविध्यपूर्ण शैलीतले लिखाण आणि मांडणी, समीक्षा, कविता, गाणी, कथात्म-साहित्य, वाद-विवाद, मुलाखती, दृक-श्राव्य आणि दृश्य रूपांची गुंफण अशा विविधांगी आविष्कारांतून आपल्याशी मुक्त आणि थेटपणे संवाद साधेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांनी केलेल्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो.

Our contemporary lives and actions have been radically influencing expressions of writing, image-making and publicizing. Conversely, the production, consumption and circulation of expressions have influenced the aesthetics, politics and networking today. With हाकारा | hākārā, our aim is to explore and practice newer ways of producing and appreciating creative expressions while encouraging dialogue between different fields of expressions. Considering a rich and diverse body of creative work, we focus on creative and critical writing in Marathi and English across literary and visual forms of expressions.

The peer-reviewed journal, हाकारा | hākārā is published online in freely accessible and interactive format by focusing on the area that may help us address the diversities and the synergies implicit in literary and visual cultures. The हाकारा | hākārā editors are interested in sharing of research, speculations, literary and visual work presented in innovative ways that respond to current debates while being attentive to the nuanced understanding and interconnectedness of content, form and society. We particularly encourage innovative nature of literary and visual images, critical artistic practices and developments that inform the contemporariness of the medium (and its pasts and futures), as well as the formal qualities of words and images in changing contexts.

Secrecy (August 2022) | Contributors

Repetition (December 2022) | Contributors

Myth (May 2023) | Contributors

Camouflage (September 2023) | Contributors

[author]

[mar-block]प्रकाशकाचे नांव व पत्ता: आशुतोष पोतदार, ए१/६, दीप ज्योती अवेन्यू, सर्वे क्रमांक ३३, हिस्सा १बी/१, वारजे गावठाण, वारजे, पुणे ४११०५२.

ISSN 2581-9976

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) केअर-लिस्ट मध्ये समावेश.

अंकात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.[/mar-block]

Publisher’s Name & Address: Ashutosh Potdar, A1/6, Deep Jyoti Avenue, S.No. 33, Hissa No. 1B/1, Warje Gavthan, Warje, Pune 411052.

ISSN 2581-9976

Included in the University Grants Commission (UGC) CARE-LIST.

Facts and opinions published in हाकारा । hākārā express solely the opinions of the respective contributors.

[/author]

Post Tags