हाक १०

Call 10



|| झगडा ||

झगडा म्हणजे दोन विरुध्द दिशांनी वापरलेले बळ. झगडा म्हणजे विरोध, असहमती किंवा संघर्ष. मतभिन्नता व्यक्त करण्याच्या प्रयत्नांचा परिपाक झगडा असू शकतो.

वेगवेगळे समूह, विविध विचारधारा, कलात्म अभिव्यक्ती आणि दृकश्राव्य भाषा यांच्यातील झगड्यातून अभिव्यक्तीची नानाविध रूपे आकाराला येतात. उदाहरणार्थ, वर्चस्वी आणि पर्यायी व्यवस्थेमधील संघर्षातून बंडखोरीची रूपे उदयाला येतात.

झगडा कशा प्रकारे सांस्कृतिक आणि कलात्म रूपांमध्ये अभिव्यक्त होतो? विशिष्ट काळ आणि अवकाशात झगडा कोणती रूपे घेतो? कोणती सांस्कृतिक, सामाजिक वा ऐतिहासिक पार्श्वभूमी झगड्याच्या निर्मितीला आकार देत असते? आपले दैनंदिन जीवन झगड्याने कसे प्रभावित होत असते? आपण त्या प्रभावाला कसे सामोरे जात असतो? दैनंदिन कृतीतून हा झगडा कसा आकाराला येतो? झगड्यातून नवी कथने वा अभिव्यक्तीची रूपे कशी आकार घेत असतात?

अशा काही मुद्द्यांना आणि प्रश्नांना सामोरे जात आम्ही ‘हाकारा’च्या दहाव्या आवृत्तीसाठी कलाकार, अभ्यासक आणि लेखकांकडून साहित्य व कलाकृती मागवित आहोत. तुम्ही कवी, कथाकार, संशोधक, समीक्षक, भाषांतरकार, छायाचित्रकार, दृकश्राव्य माध्यमात काम करणारे कलाकार असाल तर ‘झगडा’ या संकल्पनेला समोर ठेऊन आपले साहित्य फेब्रुवारी २८, २०२० पर्यंत info@hakara.in या ई-मेलवर पाठवा. तुमचे साहित्य मराठी आणि/किंवा इंग्रजी भाषेत असू शकते. लिखित साहित्य किंवा दृकश्राव्य कलाकृती पाठविण्यासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला www.hakara.in या आमच्या संकेतस्थळावर पाहाता येईल. निवडक कलाकृतींचा समावेश हाकारा । hākārā च्या येत्या अंकात केला जाईल. 

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā

___________________________________________________________________

|| Friction ||

Friction is a force that acts in opposite direction. Friction may arise as a result of voicing or expressing differences. Friction also means resistance, disagreement or conflict. 

Different forms emerge through friction between groups of people, different ideologies, artistic expressions or visual arts practices. For example, friction may give way to the dissent through a struggle between the dominant forms and the alternative forms. 

How does friction get expressed in varied artistic and cultural forms? In which ways friction emerges within certain time and space? What are the cultural, social or historical contexts that have lead to the formation of friction? How does friction impact our daily life and what are the ways in which friction is articulated through the everyday acts? The friction between two surfaces creates some amount of energy which can have dramatic consequences. In which ways friction create new narratives or forms of expressions?

With such questions and concerns, we would like to receive submissions from artists, scholars, researchers or writers for our tenth edition.

Are you a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, social scientist, translator, curator or anyone who is interested in addressing such questions and concerns about ‘Friction’? Do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by February 28, 2020 to info@hakara.in. For submission guidelines, please visit: www.hakara.in

Select works will be published in the forthcoming issue of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā

______________________________________________________________________________

लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

Submission Guidelines

  1. In response to primary focus of upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If contributor wants to maintain certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. For visual work submission, image size has to be 150 or more resolution. Please share details of art works including title, medium, size and year. In case, images included do not belong to the contributor, contributor should provide source of images.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
  6. We require a title page with contributor’s contact information, a short abstract and an contributor’s bio as part of the submission process.
  7. Submission must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from original writer/publisher if the work will be accepted by  हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from हाकारा । hākārā team in a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *