हाक २

Call 2

back

| बाहेरचं, आतलं, अधलं-मधलं |

 

जंगलातली पायवाट, भरवस्तीतलं घर, हॉटेलमधे मांडून ठेवलेले खाद्यपदार्थ, रस्त्यावरुन फिरणारे हातगाडीवाले, चकचकीत दुकानं, कर्कश्य आवाजात भाषण देणारे नेते वा आध्यात्मिक गुरु आणि त्यांचे बेहोश कार्यकर्ते… जंगल, वास्तू, माणसं, गर्दी अशा बाहेरुन दिसणा-या अगणित दृश्यांना आपण पाहात असतो. नानाविध रंग-रुपं, ऋतुमानानुसार बदलत जाणारे पोत, सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातले विविध संदर्भ अशातून ‘बाहेरचं’ जग आपल्या समोर येत असतं. पण, न दिसणारं, न वाचता येणारं, अ-स्पर्श असं काही तरी ‘आतलं’ असतं. ते काय असतं? कलाकाराच्या, तत्ववेत्याच्या वा एखादीच्या मनातल्या घडण्या-बिघडण्यातून सहजी ठाव घेता येणार नाही अशा कोणत्या अव्याहत प्रक्रियांची मालिका सुरु असते? ‘आतलं’ जग आणि ‘बाहेरचं’ जग असं सुट्टं पाहाता येईल काय? बदलत्या भवतालानुसार ‘आतलं’ किंवा ‘बाहेरचं’ असणं तसंच राहातं की बदलत जातं वा त्यांची अदलाबदल होते? ‘बाहेर’ आणि ‘आत’ होत असताना ‘अधल्या-मधल्या’ अवस्थेतही हे जग खेळ खेळत असतं. मग, ‘अधल्या-मधल्या’ अवस्थेतील खेळाचं अाविष्करण काय असू शकतं? बाहेरच्या आणि आतल्या जगात होणा-या या खेळाचा ठाव घेणा-या कोणत्या पध्दती असू शकतात?

तुम्ही चित्रकार असाल, तत्व-चिंतन मांडणारे असाल किंवा कथात्म साहित्य वा कविता लिहिणारे असाल, तुम्ही दृश्य-माध्यमातील कलाकार असाल किंवा गुंफणकार (क्युरेटर) असाल तर ‘हाकारा’ दुस-या आवृत्तीच्या पारावर ‘बाहेरचं, आतलं, अधलं-मधलं’ च्या हाकेसाठी तुमचं स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती जुलै १५, २०१७ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. निवडक लेख / कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल.

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā

| Outside, Inside, In-between |

We experience innumerable visuals every day. A deep forest trail, a building in the middle of the happening neighbourhood, surreptitiously arranged food counter in a restaurant, glossy shops with piercing light, street-vendors passing through the corners of a city, deafening speeches by the leaders, gurus and their diehard followers. All have different colours, shapes, sizes and textures.

This is the ‘outside’ world that’s evolved through the natural processes and contexts of socio-political changes. But, there is something deep ‘inside’ that one can’t easily read, touch or share. What’s that? It’s intriguing to articulate a number of processes taking place in unfathomably deep mind of an artist, a scientist, a philosopher or any other person. Do these processes change with changing time and place? Can one articulate intrinsically merged world of ‘outside’ and ‘inside’ independent of each other? Do ‘outside’ and ‘inside’ change with new contexts? Are they interchangeable? How do we perceive the in-between moment of the interchangeability? What could be the expression of in-betweenness of ‘outside’ and ‘inside’? For an artist, what could be methods to articulate outside, inside and in-between?

If you are a fiction writer, poet, visual artist, critic, photographer, translator or a curator; you are invited to send your work in Marathi and/or English in response to our second edition of ‘Outside, Inside, In-between’, as you may perceive it. You may send your work by July 15, 2017 to info@hakara.in. Select works will be published in the forthcoming issue of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar & Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā


 

लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. ‘हाकारा’ हे अॉनलाइन जर्नल अाहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

 

Submission Guidelines

  1. In response to primary focus of upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If contributor wants to maintain certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. For visual work submission, image size has to be 150 or more resolution. Please share details of art works including title, medium, size and year. In case, images included do not belong to the contributor, contributor should provide source of images.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.   
  6. We require a title page with contributor’s contact information, a short abstract and an contributor’s bio as part of the submission process.
  7. Submission must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from original writer/publisher if the work will be accepted by  हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from हाकारा । hākārā team in a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.

11 comments on “Appeal for Call 2

  1. Kumkum

    I want to be part of this.. Beautiful.. World

    Reply
  2. Mandakini Mathur

    A pebble dropped in the silent pool of the mind creating ever widening circles…

    Reply
  3. Mandakini Mathur

    A pebble dropped in the silent pool of the mind creating ever widening circles…
    Thought provoking brief!

    Reply
    • Hakara Team

      Thank you for your appreciation.

      Reply
  4. Pradeep Vilas Kamble

    good

    Reply
  5. e. rajarao

    Wonderful site for vreative writers. Thanks a lot……

    Reply
  6. anushree

    Images and art works are accepted also right?

    Reply
    • adminhakara

      Yes, Anushree. We accept images and art works. Please send you bio and artist statement along with images. Thanks

      Hakara Team

      Reply
  7. अतुल पेठे

    हा अंकही मोठया नजाकतीने काढला आहे. उत्तम साहित्यमुल्य आणि सौंदर्यदृष्टीचा मिलाफ आहे. अभिनंदन !

    Reply
  8. Ayush mishra

    Hi, if I’m sending photographs what should I write into it , and what other things, I’ve to send with email.

    Reply
  9. लतिका जाधव

    मराठी मुलाखत ‘फाळणी’ बद्दल घेतलेली आवडली. संपादक व सर्व सहकारी मित्रांचे अभिनंदन!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *